जत नगरपरिषद निवडणूक

जत नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून भव्य शक्तिप्रदर्शन करत चिनगीबाबा दरग्यात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ. डॉ. रविंद्र आरळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, ११ प्रभागांत २३ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात. पडळकर यांची विकासावर भाष्य.

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
जत नगरपरिषद निवडणुकीचा राजकीय ताप वाढू लागला असून, आज भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला. जतचे ग्रामदैवत अवलिया सुफी संत चिनगीबाबा दरग्यात सर्व उमेदवारांनी श्रीफळ वाढवून आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात केली.

या शुभारंभ कार्यक्रमाला आ. गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रविंद्र आरळी, तसेच सर्व प्रभागातील उमेदवार, मान्यवर आणि हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

जत नगरपरिषद निवडणूक


पहिल्यांदाच उमेदवारांची मोठी संख्या

यंदाची जत नगरपरिषद निवडणूक विशेष ठरणार हे निश्चित. कारण—

  • नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ७ उमेदवार
  • ११ प्रभागांतील २३ जागांसाठी एकूण ९४ उमेदवार रिंगणात

राजकीय दृष्टीने ही परिस्थिती अतिशय रोचक आणि रंगतदार बनली आहे.


भाजपचे उमेदवार – प्रभागनिहाय यादी

या निवडणुकीत भाजपकडून पुढील उमेदवार मैदानात उतरले आहेत:

  • नगराध्यक्ष पद:
    डॉ. रविंद्र आरळी
  • प्रभाग १: राजकुमार कल्लाप्पा साळे, लक्ष्मीबाई आण्णाप्पा कैकाडी
  • प्रभाग २: गौतम रामचंद्र ऐवळे, सीमा संतोष पट्टणशेट्टी
  • प्रभाग ३: प्रमोद सदाशिव हिरवे, वीणा शंकर तंगडी
  • प्रभाग ४: सुभाष कुमार कांबळे, हेमलता बसवराज चव्हाण
  • प्रभाग ६: विक्रम शिवाजी ताड, संगीता अविनाश सोनुले
  • प्रभाग ७: प्रवीण रंगराव वाघमोडे, रंजना विलास बाबर
  • प्रभाग ८: रविंद्र विलास मानवर, शारदा चंद्रकांत कुंभार
  • प्रभाग ९: दिपक तुकाराम मोटे, स्वप्ना अशोक स्वामी
  • प्रभाग १०: पवन चंद्रकांत कुंभार, सुप्रिया संतोष बाबर
  • प्रभाग ११: मिथुन रमेश भिसे, नंदिनी सोमशेखर मठपती, सुप्रिया स्वप्नील कोळी

सर्व उमेदवारांनी चिनगीबाबांचे आशीर्वाद घेत एकत्रितपणे प्रचार रॅलीला प्रारंभ केला.

जत नगरपरिषद निवडणूक


उमेदवारांचे संदेश – विकासाचा निर्धार

कार्यक्रमात बोलताना डॉ. रविंद्र आरळी म्हणाले—
“जत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी या निवडणुकीत उतरलो आहे. भाजपने सर्व प्रभागांत जनतेशी नाळ असणारे व जनसेवा करणारे उमेदवार दिले आहेत. चिनगीबाबांचे आशीर्वाद घेतले आहेत, आता जनतेचा आशीर्वादही आम्हाला मिळेल अशी आशा.”


पडळकरांचे भाष्य – “भाजपच सक्षम पर्याय”

आ. गोपीचंद पडळकर यांनीही सर्व उमेदवारांवर विश्वास व्यक्त करताना सांगितले—
“हे सर्व उमेदवार सक्षम असून उत्तम मताधिक्याने विजयी होतील. जतच्या विकासासाठी जे काम झाले ते भाजपनेच केले आहे. पुढील मोठ्या विकासकामांसाठीही भाजपच योग्य पर्याय आहे.”

ते पुढे म्हणाले की, इतरही पक्षांनी विकासाच्या कामाकरिता भाजपसोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेदेखील वाचा: jat crime news: जत पोलिसांची मोठी कारवाई: सहा देशी पिस्तूलांसह दोघांना अटक | 3.46 लाखांचा मुद्देमाल जप्त


मोठे शक्तिप्रदर्शन – कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट

आजच्या भव्य रॅलीत भाजपचे हजारो समर्थक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात उमेदवारांनी जत शहरात भव्य शक्तिप्रदर्शन केले. या उत्साहामुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *