📰 जत नगरपरिषद निवडणुकीच्या सहाव्या दिवशी एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले. डॉ. रवींद्र आरळी, सुरेश शिंदे, अमित दुधाळ व सलीम गवंडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
जत नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज सहावा दिवस उत्साहात पार पडला. आज एकूण 28 उमेदवारी अर्ज विविध पक्ष व अपक्षांच्या वतीने दाखल करण्यात आले. सकाळी दहा वाजताच निवडणूक विभागाबाहेर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसू लागली होती. तसेच अर्ज भरण्याच्या प्रक्रिये पासून आज अखेर नगरसेवक पदासाठी 40 जणांनी तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज निवडणूक विभागात प्राप्त झाले आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी चार जणांचे दमदार शक्तिप्रदर्शन
आज नगराध्यक्ष पदासाठी चारही प्रमुख उमेदवारांनी जोरदार शो ऑफ करत अर्ज दाखल केले.
1️⃣ डॉ. रवींद्र आरळी – भाजप
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रवींद्र शिवशंकर आरळी यांनी मोठ्या रॅलीसह निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी शहराध्यक्ष आण्णा भिसे, अनिल पाटील, राजू कामतगी आदी नेते उपस्थित होते.
2️⃣ सुरेश शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनीही भव्य शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत माजी आमदार विलासराव जगताप, संग्राम जगताप, बंदेनमाज पटाईत, शफिक इनामदार, मच्छिंद्र वाघमोडे, आप्पा पवार आदींची उपस्थिती दिमाखदार होती.
3️⃣ अमित दुधाळ – शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अमित दुधाळ यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला.
4️⃣ सलीम गवंडी – शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
शिंदे गटाचे नेते व बांधकाम कामगार संघटनेचे प्रमुख सलीम गवंडी यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
प्रभागानुसार उमेदवारांची मोठी नोंदणी
आज विविध प्रभागांमधून नगरसेवक पदासाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले.
प्रभागनिहाय व पक्षनिहाय अर्जांची झलक:
- प्रभाग 1: मेघा देवकर (राष्ट्रवादी), योगेश कांबळे (राष्ट्रवादी)
- प्रभाग 3: विशाल कांबळे (काँग्रेस)
- प्रभाग 4: प्रमोद सावंत (शिवसेना)
- प्रभाग 5: शिवकुमार तंगडी (अपक्ष), आशुतोष कांबळे (अपक्ष)
- प्रभाग 6: सचिन मदने (राष्ट्रवादी), राघवेंद्र चौगुले (भाजप)
- प्रभाग 7: नागेश मदने (अपक्ष), राहुल कोळी (काँग्रेस), अर्चना केंगार (राष्ट्रवादी), स्वप्नील शिंदे (राष्ट्रवादी), प्रवीण वाघमोडे (भाजप), मनीषा साबळे (काँग्रेस), रंजना बाबर (भाजप), स्नेहल हवीनाळ (शिवसेना शिंदे)
- प्रभाग 8: शारदा कुंभार (भाजप), रवींद्र मानवर (भाजप), शारदा तोडकर (अपक्ष)
- प्रभाग 9: स्वप्ना स्वामी (भाजप)
- प्रभाग 10: मोहिद्दीन इनामदार (राष्ट्रवादी), अर्चना शेंडगे (भाजप), शबाना अपराज (शिवसेना ठाकरे), एक अपक्ष
- प्रभाग 11: नंदिनी मठपती (भाजप), आरती वास्टर (काँग्रेस – एक अर्ज व एक अपक्ष)
तसेच नगराध्यक्ष पदासाठी आणखी एक अपक्ष उमेदवार – मल्लिकार्जुन हत्ती यांनीही अर्ज दाखल केला.
पक्षनिहाय अर्जांची संख्या – सहावा दिवस
- भाजप: 8
- राष्ट्रवादी काँग्रेस: 4
- काँग्रेस: 4
- अपक्ष: 4
- शिवसेना ठाकरे: 1
- शिवसेना शिंदे: 1
एकूण 22 अर्ज आज दाखल झाले.
रविवारीही कार्यालय सुरू — अर्ज स्वीकारले जाणार
रविवार हा सरकारी सुट्टीचा दिवस असला, तरीही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी रविवारीही निवडणूक कार्यालय सुरू राहील, तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी दिली.
