🚨सांगली, (आयर्विन टाइम्स (प्रतिनिधी) :
सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १२ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची किंमत सुमारे ७ लाख २० हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांची माहिती
मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत ३१ जुलै रोजी दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयितांना पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
जेरबंद आरोपी
१. सूरज उमेश ओमासे (१९, रा. बेडग, मिरज)
२. ओंकार महेश तांदळे (२१, रा. बेडग, मिरज)
३. योगेश विजय मिरजे (२३, रा. आरग, मिरज)
४. वैभव प्रकाश रोमन (२९, रा. आरग, मिरज)
जप्त मोटारसायकली
* हिरो होंडा स्प्लेंडर प्लस – १० (किंमत ₹५,७०,०००)
* हिरो एचएफ डिलक्स – १ (किंमत ₹५०,०००)
* होंडा युनिकॉर्न – १ (किंमत ₹१,००,०००)
एकूण किंमत : ₹७,२०,०००
उघडकीस आलेले गुन्हे
या टोळीने चोरी केलेल्या मोटारसायकलींविषयी सांगली जिल्ह्यातील **मिरज शहर, मिरज ग्रामीण, तासगाव, एमआयडीसी कुपवाड, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, कुरुंदवाड आणि कर्नाटकातील **रायबाग पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारवाईचा थोडक्यात तपशील
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ३१ जुलै रोजी मिरजमधील ढोर गल्ली येथे सापळा लावून पहिला आरोपी सूरज ओमासे याला चोरीच्या स्प्लेंडर मोटारसायकलसह पकडले. चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितल्यानंतर पोलीस पथकाने पुढील छापेमारी करून बेडग, बोलवाड व आरग परिसरातून आणखी ११ मोटारसायकली जप्त केल्या.
पुढील तपास
जप्त केलेल्या मोटारसायकली व आरोपींना पुढील तपासासाठी मिरज शहर आणि एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.
या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, रुपाली बोबडे (सायबर पोलीस), तसेच पोहवा संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, अतुल माने, मच्छिद्र बर्डे, उदय सांळुखे, संदीप पाटील यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील जवानांनी मोलाची भूमिका बजावली.
👉 ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली असून, जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.