सांगली: बाप रे! एकट्या चोरट्याने

सारांश: सांगली जिल्ह्यात २१ मोटारसायकली चोरी करणाऱ्या सुदीप चौगुलेला पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व भिलवडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ६.६३ लाखांच्या मोटारसायकली जप्त केल्या. चोरीचा तपास करत आरोपीकडून वाहन चोरीची कबुली मिळाली व पुढील तपास सुरू आहे. वाहन मालकांना सुरक्षितता उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि भिलवडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत मोठा यश मिळाले आहे. मोटारसायकल चोरी करणारा आरोपी सुदिप अशोक चौगुले (वय ३७ वर्षे, रा. पाटील गल्ली, भिलवडी) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ६.६३ लाख रुपये किमतीच्या २१ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या हिरो कंपनीच्या आहेत.

गुन्ह्याचा तपशील:
गुन्हेगारी प्रकरणांत २१ मोटारसायकली चोरीला गेल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली होती. यात भिलवडी, पलूस, सांगली शहर, जत, कडेगाव, विश्रामबाग, आष्टा, चिंचणी वांगी आणि तासगाव पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवले होते.

सांगली: बाप रे! एकट्या चोरट्याने

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्था. गु. अ. शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी विशेष पथक तयार केले. या पथकाने २५ डिसेंबर २०२४ रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीस सांगलीवाडी येथील सिद्धीविनायक चौकात जेरबंद केले.

हे देखील वाचा: jat crime news: तरुणाच्या मृत्यूने जत हादरले: 2 मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल; जत शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दोन दिवसांपूर्वी झाली होती मारहाण

कारवाईची हकीकत:
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक | कुमार पाटील यांचे पथकातील पोकों/ ऋतुराज होळकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, सांगलीवाडी येथील सिध्दीविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम बिना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल विक्री करण्याकरीता येणार आहे.

माहितीनुसार एक इसम ठरलेल्या वेळेत एका हिरो होंडा स्पेलण्डर गाडीजवळ थांबलेला दिसला. पोलीस खाक्या दाखवल्यावर त्याने काही दिवसापूर्वी माळवाडी गांवातील आठवडा बाजारातून सदरची मोटार सायकल चोरी केली होती. आणि ती मोटर सायकल विक्री करण्यासाठी तो सांगलीवाडी येथे आला असल्याची कबूली दिली. आणखी विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता सांगितले की, त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरुन आणखी काही मोटर सायकली चोरी केलेल्या आहेत.

त्या मोटरसायकली त्याने त्याचे वसगडे गावचे हद्दीत असले शेतात लावलेल्या आहेत. त्या मोटार सायकली विक्री करावयाच्या आहेत. म्हणुन त्यातील एक मोटर सायकल घेवुन तो आज रोजी विक्री करीता आलो असल्याचे सांगितले. लागलीच दोन ९ मोटार सायकल ताब्यात घेऊन त सविस्तर पंचनामा करण्यात आला. सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीबाबत पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले असता, भिलवडी, पलूस, सांगली शहर, जत, कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.

हे देखील वाचा: Action against 2 in bribery case: सांगली: शिक्षक, क्लार्कवर लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी भिलवडी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आलेनंतर भिलवडी पोलीस ठाणे व स्था. गु. शाखा, सांगली यांनी आरोपी हा अटकेमध्ये असताना त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरुन आणखी काही मोटर सायकली चोरी बाबतची कबूली दिली. लागलीच भिलवडी पोलीस ठाणेकडील गुन्हयांचे तपासी अंमलदार यांनी आणखीन १२ मोटार सायकली जप्त केल्या असून सदर आरोपी कडून आतापर्यंत एकूण २१ मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करीत आहेत.

सांगली: बाप रे! एकट्या चोरट्याने

सदर आरोपी यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसून तो आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, जास्त वाहने असलेली पार्कींगची ठिकाणे, बिअर बार अशा ठिकाणांहून मोटार सायकली चोरीत असे. त्यामुळे स्था. गु. शाखा, सांगली तसेच जिल्हयातील पोलीस ठाणेकडून वेगवेगळे पथके नेमण्यात आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलीस प्रशासना मार्फत अवाहन करण्यात येते की, आपल्या मोटार सायकलीचे जुने लॉक खराब झाले असल्यास ते वेळेवर बदलून घ्यावे तसेच मोटार सायकलीला दुसरे लॉक लावलेस वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध घालता येईल.

जप्त मुद्देमाल:
आरोपीकडून हिरो होंडा, हिरो कंपनीच्या विविध मॉडेल्सच्या २१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकलींची एकूण किंमत ६,६३,०००/- रुपये इतकी आहे. सर्व मोटारसायकली विना नंबर प्लेट होत्या, आणि त्यांचे चेसिस व इंजिन क्रमांक तपासणीअंती चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले.

हे देखील वाचा: Happy New Year 2025: बहुतांश सण गेल्या वर्षांच्या तुलनेत 10 ते 15 दिवस आधीच; सरकारी कर्मचाऱ्यांचा काही ठिकाणी हिरमोड; जाणून घ्या नव्या वर्षाची वैशिष्ट्ये

सहभागी अधिकारी व कर्मचारी:
कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्था. गु. अ. शाखेचे पोलीस कर्मचारी – ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, नागेश कांबळे, बसवराज शिरगुप्पी, संदीप पाटील आणि इतर अधिकारी सहभागी होते.

पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी:
सांगली जिल्ह्यातील वाहन चोरी प्रकरणांचा तपास वेगाने लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *