सांगली

घरफोड्या करणाऱ्याकडून २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

आयर्विन टाइम्स /सांगली
सांगली बातम्या: सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार राहुल प्रकाश माने, (वय ३० वर्षे, मुळ रा. उरुण, इस्लामपुर सध्या दत्त वसाहत, आष्टा, ता. वाळवा.) याला चोरीच्या मालासह अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे एकूण ४० ग्रॅम वजनाचे दागिने त्यात सोन्याचे काळया मण्यासह गंठण व खडा असलेली सोन्याची अंगठी , १५ हजार रुपये किंमतीच्या वेगवेगळया रंगाच्या १५ नग साडया, ७ हजार किंमतीचे ५०० रुपये दराच्या १४ भारतीय चलनी नोटा, ५० हजार रुपये किंमतीची हिंरो होंडा कंपनीची काळया रंगाची स्प्लेण्डर प्लस मोटार सायकल असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपुर विभागात पेट्रोलिंग करीत असताना, पथकातील पोहेकॉ अरुण पाटील व पोशि सुरज थोरात यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, राहुल चोरी करुन मिळालेला माल विक्री करीता मोटार सायकलवरुन पेठनाका येथील हायवेच्या पुलाखाली येणार आहे. यानुसार सापळा रचण्यात आला. मोटार सायकलवरुन एक इसम संशयीतरित्या पुलाखाली येवून थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.

त्याने त्याचे नाव राहुल प्रकाश माने (वय ३० वर्षे, मुळ रा. उरुण इस्लामपुर सध्या दत्तवसाहत, आष्टा, ता. वाळवा) असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची अंगझडती घेतली असता, पँटचे उजव्या खिशात एक सोन्याची अंगठी, गंठण व ७००० रु. रोख रक्कम मिळुन आली व मोटार सायकलीस कापडी पिशवीत १५ साडया मिळून आल्या. त्याचेकडे मिळालेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पैसे व साडयाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागिंतले की, त्याचेजवळ मिळुन आलेली सोन्याची अंगठी, गंठण, पैसे व साडया हया त्यांने काही दिवसापुर्वी सुरूल गावात दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी केली होती त्यातीलच असल्याची कबूली दिली.

याबाबत इस्लामपुर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साडया व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले. राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर सांगली जिल्हयात वेगवेगळया पोलीस ठाणेमध्ये चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपीव जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपुर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास इस्लामपुर पोलीस ठाणे करीत आहेत.

सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोरून दुचाकी लंपास; चोरट्यांचे धाडस वाढले

कुठल्याही शहरात पोलीस ठाणे आवार सुरक्षित मानला जातो. मात्र पोलीस ठाण्याच्या आवारातूनच दुचाकी चोरीला गेल्यावर काय म्हणायचं? असाच काहीसा प्रकार सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. चोरट्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोर लावलेली दुचाकी लंपास केली. नवीन अधीक्षक कार्यालयासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे.

अलिकडच्या काळात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले आहे. कोठेही दुचाकी पार्किंग करून दुसरीकडे गेल्यास दुचाकी गायब केली जाते. मग दुचाकी चोरीला आळा घालायचा असेल तर पोलिस ठाण्याचा परिसर सुरक्षित समजला जातो. त्यामुळे पोलिस ठाण्यातील पार्किंगमध्ये तसेच सांगलीत शहर पोलिस ठाणे आवारात अनेकजण दुचाकी पार्किंग करून बिनधास्त जातात.

वारणाली येथील नझीर अब्दुल जितेकर (वय ३२, रा. गंगानगर) हा मित्राबरोबर विश्रामबाग येथे आला होता. तेथून न्यायालयात काम असल्यामुळे त्याची दुचाकी विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पार्किंगमध्ये लावली. पुन्हा पार्ट आल्यावर त्यांना त्यांची गाडी दिसून आली नाही. आजूबाजूला दुचाकी लावली असेल म्हणून शोध घेतला. परंतु दुचाकी सापडली नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात जाऊन हा प्रकार सांगितला.

हे देखील वाचा: Sangli News: Shocking! मिरज तालुक्यात दोन मुलींचे बालविवाह; चाईल्ड लाईन संस्थेच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की : संजयनगर पोलिसांची धाव  

दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान चोरट्याने पोलिस ठाण्याच्या आवारातून दुचाकी (एमएच १० डीए ४६७१) ही लॉक तोडून लंपास केली. सायंकाळी पाच वाजता नझीर पोलिस ठाण्यासमोर आला तेव्हा जागेवर दुचाकी आढळली नाही. सुरुवातीला पोलिसांनी कच्ची नोंद घेतली. त्यानंतर नझीर यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी सापडली नसल्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद नोंदवली.

दरम्यान पोलिस ठाणे आवारातूनच दुचाकी लंपास केल्याची फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फुटेज बघितले. परंतु प्राथमिक पाहणीत चोरटा काही आढळला नाही. परंतु पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. अधीक्षक कार्यालय व पोलिस ठाण्याच्या मध्ये पार्किंगचे ठिकाण आहे. चोरट्याने थेट येथे दुचाकी लंपास केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !