सांगली जिल्ह्यातील धनगाव येथील घटना
आयर्विन टाइम्स / सांगली
दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा पती गणपत दाजी पवार (वय ५०, मूळ गणपत पवार आंबेगाव, ता. मावळ, जि. पुणे, सध्या रा. धनगाव, ता. पलूस) यास दोषी धरून विटा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड सुनावण्यात आला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले.
आरोपी गणपत पवार याने त्याची पत्नी कांताबाईने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन चिडून शिवीगाळ करून काठीने तिचे तोंड पाय व पाठीवर मारले, तसेच कोयत्याने कपाळावर उजव्या बाजूस, हनुवटी, गळ्यावर मारून गंभीर जखमी केले. त्यात तिचा मृत्यू झाला होता. १८ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे चारच्या सुमारास धनगाव गावच्या हद्दीत शेतजमीन गट नंबर ४१२ मध्ये असलेल्या झोपडीमध्ये ही घटना घडली होती.
हे देखील वाचा: Jat News : जत तालुक्यातील उमदी येथील कन्नड क्रमांक 5 शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप; शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी
याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड (तागडखेल, ता. आष्टी, जि. बीड) यांनी भिलवडी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी गणपत पवार यास अटक करण्यात आली होती. ७ ऑक्टोबर २०२१ पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. त्याची सुनावणी सुरू होती. आज आरोपीस दोषी धरून त्यास वरील शिक्षा सुनावण्यात आली, असे श्री. पालवे यांनी सांगितले.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे, तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, चंद्रकांत कोळी, मंगेश गुरव, तानाजी देवकुळे, धीरज खुडे, विशाल पांगे यांनी केला. सदर गुन्ह्याचे सुनावणीकामी सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे, कोर्ट अंमलदार अंकुश लुगडे, माधुरी सदाकळे यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.
सांगली-पलूस बसमधून प्रवासी महिलेचे १५ तोळे दागिने चोरले; भरदुपारची घटना
एसटीत गर्दीचा गैरफायदा घेऊन सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेचे दागिने आणि पैशांची पर्स चोरट्याने हातोहात लांबविली. आज दुपारी साडेचारच्या सुमारास सांगली – पलूस एसटीत ही घटना घडली. त्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर एसटी थांबवण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर महिलेने शहर पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी पंधरा तोळे सोने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. शहर पोलिसांनी गांभीर्य ओळखून तातडीने पथके रवाना केली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळ, तक्रारदार व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नीलोफर मुबारक रायबाग या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहेत. त्या मिरजेत नातेवाइकांच्या लग्नसाठी काल आल्या होत्या. त्यानंतर लग्नसोहळा झाल्यानंतर त्या सांगली बसस्थानकात आल्या होत्या. त्यावेळी पलूसकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या, त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. जागा पकडण्यासाठी त्यांनी पर्स सीटवर ठेवली. त्यावेळी चोरट्याने पर्समधील रुमालात गुंडाळलेले सोने आणि दोन हजार रुपये असलेली छोटी पर्स चोरट्याने चोरून नेली.
दरम्यान, नीलोफर यांनी तातडीने शहर पोलिस ठाणे गाठले. पंधरा तोळे सोने चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पाठवण्यात आले. तोपर्यंत दागिने खरेदीच्या पावत्या मागवण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सांगली बसस्थानक परिसरातून वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. याठिकाणी एसटी प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवण्यात यावे, तसेच पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवाशांची आहे.
बाजारातून मोबाईल चोरला
■ नीलोफर यांच्या नातेवाइकांची पोलिस ठाण्यात गर्दी असतानाच एक महिला रडत पोलिस ठाण्यात आली. महिन्यापूर्वी घेतला मोबाईल पोलिस ठाण्याजवळील बाजारातून चोरट्याने चोरल्याचे त्यांनी सांगितले. एकापाठोपाठ दोन चोरीच्या घटना घडल्याने पोलिसही चक्रावले आहेत. तातडीने गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. चोरीच्या घटना वाढत असून पोलिसांनी गस्ती पथके वाढवावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दसरा चौकात बंद घर फोडून ३५ हजाराचा ऐवज लंपास
उत्तर शिवाजीनगर येथील दसरा चौकातील बंद घर फोडून चोरट्यांनी रोख ३० हजार आणि पाच हजाराचे दागिने असा एकूण ३५ हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकणी मोरेश्वर अशोक भंडारे व्यवसाय पेन्टींगकाम रा. उत्तरशिवाजी नगर, दत्त चौक यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे भारत सुतगिरणीजवळ स्वत:चे घर बांधले आहे. या घरी ते १९ जुलै रोजी रात्री गेले होते. त्यावेळी त्यांनी दसरा चौक येथील घराचे दरवाजाला कुलूप लावले होते.
२० जुलै रोजी सकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विनोद केंगार यांने फोन करुन तुमच्या घराचा दरवाजा उघडा दिसतो आहे असे सांगितले. त्यामुळे ते घरी आले असता त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा व कुलुप तोडलेले दिसून आले. तिजोरीचे लॉक तोडून साहित्य घरामध्ये पडलेले होते. तिजोरीतील ३० हजार रुपये रोख आणि पाच हजार रूपयांचा चांदीचा कमरपट्टा, गळ्यातील चांदीचे लिंगम असा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वरी कॉलनीतील घराचे तिघांकडून नुकसान
शहरातील वारणाली येथील ज्ञानेश्वरी कॉ लनी येथे राहणाऱ्या विजय राजाराम जाधव यांच्या घरातील कुंड्या तसेच गेटचे नुकसान तिघांनी केले. याप्रकरणी विजय जाधव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तिघा संशयिताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अजय सुरेश जाधव रा. बामणोली आणि त्याचे दोन साथीदार आले आणि त्यांनी विजय जाधव यांच्या घरासमोरील कुंड्या आणि गेटचे नुकसान केले.