जादूटोणा

सांगली : गेल्या वर्षापासून दोन मित्रांमध्ये निर्माण झाला होता वाद

आयर्विन टाइम्स / सांगली
पूर्ववैमनस्यातून दोन मित्रांच्या गटात झालेल्या हल्ल्यात राहुल मोहन नाईक (वय २५, मायाक्कानगर, रा. बामणोली, ता. मिरज) या तरुणाच्या छातीवर, पोटावर धारदार शस्त्राने वर्मी वार करून खून करण्यात आला. नाईक गटाकडून झालेल्या प्रतिहल्ल्यात धोंडीराम वसंत दुधाळ (वय ३०, रा. मायाक्कानगर, बामणोली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर सुधाकर वसंत दुधाळ (वय २८) हा किरकोळ जखमी झाला आहे.

गंभीर जखमीवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी कुपवाड औद्योगिक वसाहतमधील एका हॉटेलमध्ये या दोन्ही मित्रांचे गट वेगवेगळ्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर काही वेळ गेल्यावर बामणोली येथील मायाक्कानगरमधील रस्त्यावर पुन्हा दोन्ही गटात वाद चिघळला.

सांगली

दोन्ही गट धारदार शस्त्रे घेऊन एकमेकांवर धावले. या हल्ल्यात राहुल नाईक याच्या छातीवर, पोटावर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडला. नातेवाइकांनी त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

नाईक गटाकडून झालेल्या प्रतिहल्ल्यात धोंडीराम दुधाळ हा गंभीर मंगळवारी दुपारी कुपवाड जखमी झाला, तर त्याचा भाऊ औद्योगिक वसाहतीमधील एका सुधाकर दुधाळ हा किरकोळ जखमी झाला. जखमी दुधाळ बंधूंना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सुधाकर याच्यावर उपचार करून बामणोली डॉक्टरांनी त्याला घरी सोडले तर मायाक्कानगरमधील धोंडीराम दुधाळ याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 24 जुलै: मिथुन, कर्क राशीसह 7 राशीच्या व्यावसायिकांची होईल प्रगती / progress ; कोणाकोणाला होईल आर्थिक लाभ जाणून घ्या आजच्या राशिभविष्यातून

वर्षभरापासून वाद : मृत राहुल नाईक व हल्लेखोर धोंडीराम व सुधाकर दुधाळ यांच्यात पूर्वीपासून मैत्रीचे संबंध होते. गेल्या वर्षापासून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यावरून त्यांच्यात वेळोवेळी खटके उडत होते. दोन्ही गटांत जुन्या वादाचे कारण सतत धुमसत होते.

सांगली

बनावट पिस्तूल व जिवंत काडतुसासह पोलिसांनी केली दोघांना अटक

अट्टल गुन्हेगार नितीन संजय पालकर (वय ३६, किसाननगर, इस्लामपूर) याच्यासह एकास मंगळवारी इस्लामपूर (जि. सांगली) येथे बनावट पिस्तूल व जिवंत काडतुसासह पोलिसांनी अटक केली. पालकरसह अमेय सताप्पा पाटील (वय २७, आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याला अटक करून गुन्हा दाखल केला. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. पालकरवर सहा मारामारी, खुनीहल्ल्याचा गुन्हा आहे.

अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हेगारीस आळा बसावा, याकरिता विशेष मोहीम राबवण्याबाबतचे आदेश दिले. पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने इस्लामपूर हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरवात केली असता गोपनीयरीत्या माहिती मिळाली, की पेठनाका परिसरात पिकअप शेडजवळ एकजण पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी, सहकाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. एकजण फिरताना आढळला. हवालदार दीपक ठोंबरे यांनी त्याला ओळखले. तो नितीन पालकर असल्याचे स्पष्ट झाले.

हे देखील वाचा: The wonderful cave of Baba Amarnath : बाबा अमरनाथ यात्रा मार्ग : अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम; यात्रा 19 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार

झडती घेतली असता दोन जिवंत काडतुसे सापडली. आदमापूर येथील अमेय पाटीलकडे एक पिस्तूल ठेवल्याचे त्याने सांगितले. पथकाने आदमापूर येथे अमेय पाटील याच्यावर छापा टाकला. उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, उपनिरीक्षक सोमनाथ घुगे, सतीश मिसाळ, सागर गायकवाड, दीपक ठोंबरे, विजय वीर, सजन पाटील, प्रकाश सांगोलेकर, संतोष शिंदे, अमर जंगम, सतीश खोत, उदयसिंह पाटील, अभिजित पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

स्वतःचेच वाहन चोरल्याच्या बनावाबद्दल फिर्यादीवर गुन्हा

सांगली जिल्ह्यातील कासेगाव ( वाळवा तालुक्यातील निनाईनगर, इस्लामपूर) येथील निवास नथुराम मोहिते (२७) याने स्वमालकीचा टेम्पो (एम. एच, ०८ एपी ०५०१) कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याची फिर्याद दिली. पाच महिन्यांपूर्वी मोहिते याने स्वतःच पलूस तालुक्यातील एका भंगार व्यावसायिकाला टेम्पो विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. स्वतःचेच वाहन चोरी झाल्याचे झाल्याची फिर्याद देणाऱ्याला कासेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की निवास मोहिते याने मालकीचा टेम्पो कासेगाव येथून १७ जुलै रोजी कचरा डेपो कासेगाव येथून चोरीला गेल्याची फिर्याद कासेगाव पोलिसात केल्यानंतर पोलिस आनंद देसाई यांना गोपनीयरीत्या चोरीला गेलेले वाहन स्वतः फिर्यादीने एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीकडे तक्रारीबाबत अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फिर्यादीस खाक्या दाखवताच मोहिते याने हा टेम्पो एका पलूस येथील भंगार व्यावसायिकाला विकला असून चोरीचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले.

हे देखील वाचा: Sangli Crime : सांगलीत ट्रक चोरी प्रकरणी 2 जणांना अटक ‘एलसीबी’ची कारवाई

पोलिसांनी टेम्पोसह मोहितेला ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, जयकर सुतार, सचिन चव्हाण, अविनाश लोहार, सचिन पाटील, शरद कुंभार, संदीप सावंत, तुषार जाधव, दीपक शिंदे, विजय पाटील यांनी तपासात भाग घेतला.

सांगली जिल्ह्यातील आरळा-बेरडेवाडी मार्गावर मोटार २०० फूट दरीत पडली

आरळा- बेरडेवाडी (ता. शिराळा) येथील घाटात दोनशे फूट दरीत मोटार कोसळून मणदूर धनगरवाडा येथील संजय रामचंद्र शेळके (वय २७), अर्चना संजय शेळके (२३), रूद्र संजय शेळके (१ वर्ष), रमेश तुकाराम शेळके (१३), भारती भागोजी डोईफोडे (१५) हे पाच जण जखमी झालेत. आज दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली.

मिळालेली माहिती अशी, की मणदूर – धनगरवाडा येथील शेळके कुटुंब मोटारीतून शिराळ्याहून आरळा बेरडेवाडीमार्गे मणदूर धनगरवाड्याकडे निघाले होते. दुपारी बाराच्या आरळा- बेरडेवाडी घाटमार्गावर पावसामुळे मोटार दहा ते बारा पलट्या घेत दोनशे फूट खोल दरीत उलटून अपघात झाला. पाच जखमींना सोनवडे येथील बाळासाहेब बागडे, नथुराम पवार, प्रताप नाईक, सचिन नाईक, अक्षय पाटील, तुकाराम पाटील, विशाल नाईक, प्रताप जाधव, सुरेश बाबर, गुढेचे श्रीपती सुतार, आरळा पोलिसपाटील नीलम सूर्यवंशी व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

‘१०८ रुग्णवाहिकेतून कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल केले. घटनेची रात्री उशिरापर्यंत कोकरूड पोलिसांत नोंद झाली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed