Sangli Crime ; सांगलीत गुन्ह्याची आकडेवारी घसरली: यापुढे देखील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्न
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली जिल्हयातील पोलीस ठाणे हद्दीत नवीन अदयावत करण्यात आलेली बिट मार्शल पेट्रोलिंग व्यवस्था, रात्र गस्तीमध्ये केलेले बदल, सराफ कट्टा, बाझार अशा गर्दीच्या ठिकाणी चालु केलेली पायी पेट्रोलिंग तसेच वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी राबविण्यात आलेली कोम्बींग ऑपरेशन्स् अशा विविध उपायामुळे जुन २०२३ अखेरच्या तुलनेत जुन २०२४ अखेर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यास सांगली पोलीसांना यश मिळाले आहे.
सन २०२३ जून आणि जून २०२४ अखेर सांगली जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांचा तुलनात्मक आढावा घेतला असता २०२४ च्या पहिल्या सहामाहीत जिल्ह्यात गुन्ह्यात घसरण झाली आहे.
सांगली जिल्हयातील पोलीस ठाणेमध्ये सन २०२३ जुन अखेर व सन २०२४ जुन अखेर दाखल झालेल्या गुन्हयांचा तुलनात्मक आढावा खालीलप्रमाणे: २०२३ च्या सहामाहीत जिल्ह्यात ४१ खुनाच्या घटना घडल्या होत्या. २०२४ मध्ये यात घट झाली असून जून २०२४ अखेर २६ खुनाचे गुन्हे घडले आहेत. यात १५ ने घट झाली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या घटना ४२ घटना (२०२३) घडल्या, तर यंदा सहामाहीत २९ घटना घडल्या आहेत.
जिल्ह्यात २०२३ बलात्काराच्या ८५ घटना घडल्या होत्या तर यंदा जून २०२४ अखेर ६८ घटना घडल्या असून १७ ने घाट झाली आहे. दरोड्याचा ५ (२०२३) घटना घडल्या होत्या, यंदा २ घटना घडल्या आहेत. चोरीच्या २०२३ मध्ये ७७० घटना घडल्या होत्या, यात २०२४ मध्ये घसरण झाली असून ६५१ घटना घडल्या आहेत. ११९ ने गुन्हे घटले आहेत. जबरी चोरीच्या ४८ घटना घडल्या होत्या, यात यंदा १७ ने घाट होऊन ३१ घटना घडल्या आहेत.
घरफोडीच्या २३३ घटना २०२३ मध्ये जून अखेर घडल्या होत्या, यात तब्बल ८३ ने घट झाली आहे. घरफोडीच्या १५० घटना घडल्या आहेत. गर्दी/मारामारीच्या (Roit) १६२ घटना घडल्या होत्या, यंदा जून अखेर ११३ घटना घडल्या आहेत. फसवणुकीच्या १७० घटना २०२३ मध्ये सांगली जिल्ह्यात घडल्या होत्या. यात २०२४ मध्ये होऊन ९७ घटना घडल्या आहेत. दुखापतीच्या ७१९ घटना घडल्या. तर २०२४ मध्ये ६५१ गुन्हे घडले.
अपहरणाच्या १७७ घटना २०२३ च्या जुना अखेर घटना घडल्या होत्या. २०२४ मध्ये यात ३७ ने घट होऊन १४० गुन्हे घडले आहेत. जिल्ह्यात सरकारी कामात अडथळा या प्रकारच्या २०२३ मध्ये २२ घटना घडल्या होत्या. त्यात घट होऊन ही संख्या १२ वर आली आहे. अपघाताच्या २०२३ मध्ये ६०० आणि जून २०२४ अखेर ५४० अशा घटना घडल्या आहेत. इतर गुन्हे ९३५ घडले आहेत. तर २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ८४३ घटना घडल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापुढे भविष्यात देखील घडणाऱ्या गुन्हयास प्रतिबंध करणेकरीता पोलीस ठाणे हद्दी मार्शल पेट्रोलिंग, पायी गस्त, प्रभावी रात्र गस्त, कोम्बींग ऑपरेशन राबवून त्यावर नियत्रंण मिळविण्याच्या अनुशंगाने सर्वांना आदेशीत केले असल्याचे सांगण्यात आले.