सांगलीत हिट अ‍ॅन्ड रनचा थरार:

सांगलीतील बालाजी मिल मार्गावर चुकीच्या दिशेने आलेल्या स्कोडा कारने सलग पाच वाहनांना जोरदार धडक देत हिट अँड रनची भीषण घटना घडवली. या अपघातात सात जण जखमी तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक. नागरिकांचा संताप, चालकाला बेदम मारहाण; पोलिसांनी ताब्यात घेतले.

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):

सांगली शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या बालाजी मिल मार्गावर रविवारी रात्री भीषण हिट अ‍ॅन्ड रन प्रकार घडला. भरधाव वेगात चुकीच्या दिशेने आलेल्या स्कोडा कारने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक देत परिसरात अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण केलं. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

सांगलीत हिट अ‍ॅन्ड रनचा थरार:


घटनेचा थरार असा उलगडला

रविवार, 23 तारखेला रात्री सुमारे नऊ वाजता एक कार चालक स्कोडा वाहन कॉलेज कॉर्नरकडून भरधाव वेगात बालाजी मिल मार्गावरून कल्पतरू मंगल कार्यालयाच्या दिशेने निघाला होता. मात्र या प्रवासादरम्यान चालकाने अचानक चुकीच्या दिशेने वाहन चालवायला सुरुवात केली.

चुकीच्या दिशेने येत असताना त्या कारने समोरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला जबर धडक दिली. काही क्षणांतच कारने सलग चार ते पाच वाहनांना धडक देत आणखी दोन गाड्या ओरबाडल्या, त्यानंतर रस्त्याच्या कडेला जाऊन ती प्रचंड आवाज करत थांबली.

धडकेचा जोर एवढा भीषण होता की—

  • एक कार उलटून पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली
  • अनेक दुचाकी चक्काचूर
  • रस्त्यावर ओरड, गोंधळ आणि भीतीचे वातावरण

नागरिकांचा संताप अनावर

हिट अ‍ॅन्ड रनचा प्रकार पाहताच परिसरातील नागरिकांनी चालकाचा पाठलाग करून त्याला पकडलं. संतापलेल्या नागरिकांनी कारचालकाला बेदम चोप देत वाहनाची तोडफोड केली. ही घटना पाहून उपस्थितांची सहज अंगावर काटा उभा राहिला.

सांगलीत हिट अ‍ॅन्ड रनचा थरार:


एअरबॅगमुळे चालकाचा जीव वाचला

गाडीचे एअरबॅग उघडल्याने चालकाचा बचाव झाला. परंतु त्याच्या निष्काळजी आणि बेफिकीर वाहनचालानामुळे निरपराध नागरिक जखमी झाले.

हेदेखील वाचा: crime news: विट्यात 35 वर्षीय तरुणाचा खून: धारदार शस्त्राने हल्ला, एक संशयित ताब्यात — तपास सुरू


पोलीस आणि नागरिकांनी मिळून जखमींना मदत

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.


हिट अ‍ॅन्ड रनमुळे शहरात चिंता

या थरारक घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. चुकीच्या दिशेने धावणाऱ्या वाहनामुळे कोणत्याही क्षणी किती मोठा अनर्थ घडू शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *