सांगली

सांगलीतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला हा प्रकार

आयर्विन टाइम्स / सांगली
बदलापूर व कोल्हापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, शनिवारी सांगलीतही अशीच घटना घडली आहे. शहरातील एका उपनगरातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याचा प्रकार घडला. संजय प्रकाश माने (वय ३४) असे संशयिताचे नाव असून, तो काही महिन्यांपूर्वी पॅरोलवर कारागृहातून बाहेर आला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्याला जेरबंद केले. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

सांगली

दरम्यान, या संतापजनक घटनेचे पडसाद पोलिस ठाण्यात उमटले. लोकप्रतिनीधींसह नागरिकांनी एकत्रित येत संशयित नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी केली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगलीतील संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाल लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यासह पोक्सो अन्य कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती की, मागील महिन्यात माने याने पीडित मुलीस तू मला आवडतेस, ‘ असे म्हणून तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत तिने कुठेही वाच्यता केली नाही; मात्र काल रात्री साडेनऊच्या सुमारास ती दुकानात गेली होती. त्यावेळी संशयिताने तिला बोलावले.

हे देखील वाचा: Suicide : जत शहरात 2 तरुणांच्या आत्महत्या; जतजवळील बिरनाळ तलावात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला; दुसऱ्याने घरात घेतला गळफास

जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकीही दिली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. सांगलीतील संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तातडीने संशयितास अटक केली. पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे अधिक तपास करत आहेत.

संशयितावर कडक कारवाईची मागणी

या संतापजनक घटनेनंतर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली. संशयितास तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी दोन तासांत संशयित माने याला अटक केली. पोलिस ठाण्यात परिसरात दुपारपर्यंत मोठी गर्दी होती. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह अनेकांनी भेट देऊन संशयितावर कडक कारवाईची मागणी केली.

हे देखील वाचा: bribery: सांगली जिल्ह्यात महिला तलाठ्यासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; सात-बारा उताऱ्यावर नोंदीसाठी 7 हजारांची मागणी

सांगली

दरम्यान, सांगली शहरातील घटना घडलेल्या परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने दंगल नियंत्रण पथकास पाचारण केले होते. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे देखील वाचा: miraj crime: मिरज तालुक्यातील निलजी येथील सशस्त्र जबरी चोरीच्या घटनेत महिलेवर अत्याचार करणारा जेरबंद; 27 जुलै रोजी घडली होती घटना

गुन्हेगाराला झाली आहे १४ वर्षांची जन्मठेप

संशयित संजय माने याचा २०११ मध्ये सांगली शहरातील प्रिया हॉटेलसमोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग होता. एप्रिल २०२३ मध्ये त्याला न्यायालयाने दोषी ठरवून १४ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासह खुनी हल्ल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. दोन महिन्यांपूर्वी तो पॅरोलवर कारागृहातून बाहेर आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !