सांगलीत घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथकाची स्थापना
आयर्विन टाइम्स / सांगली
चोरीचे दागिने विक्री करण्यास आलेल्या चोरट्याकडून सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून या प्रकरणी मंगेश येताळा भारते (वय २७ वर्षे, रा. माधलमुठी, ता. खानापुर, जि. सांगली) यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास संजयनगर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सांगलीत अॅक्टीव्हा वरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती
सांगली, कवलापुर, विटा शहर परीसरात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे मोठया प्रमाणात घडत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देवून घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिन्हें अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व कर्मचारी यांचे एक पथक नियुक्त केले आहे.
२५ जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकातील प्रकाश पाटील,अनिल ऐनापुरे, हणंमत लोहार यांना मंगेश भारते (रा. माधलमुठी) हा मोरपंखी रंगाच्या दुचाकी मोपेड अॅक्टीव्हा वरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी लोकल बोर्ड कॉलनी, सांगली येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने त्यानुसार लोकल बोर्ड कॉलनी परीसरात सापळा लावून थांबले असता, मोरपंखी रंगाच्या मोपेड अॅक्टीव्हा मोटार सायकल (क्र. एम एच १० डी ई ४४५२ ) वरुन एक इसम संशयीतरित्या येवून थांबलेला दिसला.
हे देखील वाचा: Jat Local News : जत तालुक्यातील उटगी येथे गुटखा वाहतूक करणारा ट्रक, 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
विटा, कवलापूर व सांगलीत घरफोडी चोरी केल्याची कबुली
पथकाने त्याला ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव मंगेश येताळा भारते, (वय २७ वर्षे, रा. माधलमुठी, ता. खानापुर, जि. सांगली) असे असल्याचे सांगितले. त्याची व गाडीची झडती घेतली असता मौल्यवान ऐवज मिळून आला. त्याचेकडे मिळालेल्या सोन्या- चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सागिंतले की, त्याचेजवळ मिळुन आलेले सोन्या चांदीचे दागिने त्याचे ओळखीचे १) बबलुसिंग टाक, २) संगतसिंग कल्याणी (दोन्ही रा. पुणे) यांनी काही दिवसापुर्वी विटा, कवलापुर व सांगलीत घरफोडी चोरी केली होती. या चोरीत मिळालेले दागिने हे विक्री करणेकरीता त्याचेजवळ दिले होते. ते दागिने विक्री करणेकरीता तो आला असल्याची कबूली दिली.
हे देखील वाचा: Horoscope / राशिभविष्य आजचं 27 जुलै: कन्या, तूळ राशीसह 4 राशींना अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळेल, इतरांनी देखील जाणून घ्या आपले भविष्य
पुढील तपासासाठी गुन्हा संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग
सदर चोरट्याकडून १६ लाख ६६ हजार रु. किंमतीचे एकूण २४५ ग्रॅम वजनाचे दागिने त्यात सोन्याची बोरमाळ, मंगळसुत्र, चेन, गंठण, कर्णफुले, वेल, रिंग, बदाम, वेढण, नथ, झुबे, ब्रासलेट, नेकलेस , २,५०० रु. किंमतीचे एकूण २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने त्यात २ पैजंण ७५,००० रु. किंमतीची होण्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोरपंखी रंगाची मोटार सायकल असा एकूण १७ लाख ४३ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत विटा, सांगली ग्रामीण व संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जात मिळालेले सोन्या- चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले.
सदर आरोपीव जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.