लवकर

दोस्तांनो, तुम्ही लहान असाल किंवा मोठे मात्र तुम्ही अनेक यशस्वी लोकांचं चरित्र वाचलं किंवा त्यांच्या सवयी पाहिल्या असतील तर असं लक्षात येतं की ते लवकर उठतात आणि आपल्या कामाची सुरुवात करतात. अनेक प्रसिद्ध लेखक पहाटेच लेखन करतात, गायक पहाटे उठून रियाज करतात, आणि इतर यशस्वी लोक देखील पहाटे उठून आपला दिवस सुरू करतात. त्यामुळे, रात्री जागण्याची सवय सोडून आपण सकाळी लवकर उठण्याची सवय लावायला हवी.

सकाळी लवकर उठण्याचे फायदे घ्यायचे असतील तरदिवसाचे वेळापत्रक बनवा

सांगायचा मुद्दा असा की फक्त पहाटे लवकर उठणं पुरेसं नाही; त्या दिवसाचं वेळापत्रक तुम्ही कसं ठरवता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यश प्राप्त करण्याच्या दृष्टीने दिवसाची योजना करा. मुलांसाठी सांगायचं तर जर परीक्षा असेल तर त्यासाठी मन लावून अभ्यास करा, किंवा वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषणाची तयारी असेल तर ती मनापासून करा. तुमचं ध्येय ठरवा आणि त्यानुसार दिवस घालवा. थोडक्यात, सकाळी उठून तुमच्या यशाचा पाया घाला.

लवकर

सकाळी उठून आळस नका करू

दोस्तांनो, आपल्या आई-वडील नेहमी सांगतात की लवकर उठून अभ्यास करा, काहीतरी चांगलं करा; पण आपल्याला पांघरुणात गुडूप राहायला आवडतं, बरोबर ना? ते मस्त वाटणारच; पण लवकर उठूनही जर तुम्ही फक्त लोळतच राहिलात, तर त्याचा काय फायदा? तो आळस झटका आणि ताजेतवाने होऊन कामाला लागा. अभ्यास करा, काहीतरी लेखन करा, वाचन करा. तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट करा. तुम्ही लक्षात घ्याल की पहाटे केलेली गोष्ट जास्त छान होते. व्यायाम केल्यामुळे नैराश्य कमी होईल, हार्मोन्समुळे दिवसही आनंदी जाईल. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्याची सवय लागेल.

हे देखील वाचा: my favorite teacher : तुमचे आवडते शिक्षक तुम्हाला माहीतच असतील. माझे आवडते शिक्षक जाणून घ्या, या माझ्या निबंध 1 मधून …

दिवसाची सुरुवात आनंदाने होते

तुमचा दिवस कसा सुरू होतो, त्यातला पहिला तास खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही हा तास आळसात घालवला, तर सारा दिवस आळसात जाईल. पण जर तुम्ही हा तास उत्पादक आणि उपयुक्त घालवला, तर दिवसही उपयुक्त ठरेल. पहिल्या तासात पूर्ण ऊर्जा लावून काम करा, यामुळे तुम्हाला एक वेगळं चैतन्य जाणवेल, ज्याचा उपयोग तुम्ही दिवसभर करू शकाल. सकाळी उठण्याची सवय लावलीत, तर नंतरचे मोह मात्र टाळले पाहिजेत. रात्री जागरणं करणं, मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करणं वगैरे गोष्टी टाळा. जितके हे मोह टाळाल, तितकी सकाळी  उठण्याची सवय पक्की होत जाईल.

लवकर

वेळेचा सदुपयोग करायला शिका

पहाटे लवकर उठणं खूप चांगलं आहे; पण पहिल्या तासाचं उत्तम नियोजन करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा तास तीन भागात विभागला आणि त्याचा योग्य उपयोग केला, तर तो अत्यंत उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्ही २०-२०-२० असा फॉर्म्युला वापरू शकता: वीस मिनिटं व्यायामासाठी, वीस मिनिटं काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा कौशल्य आत्मसात करण्यासाठी, आणि वीस मिनिटं मनन किंवा चिंतनासाठी. अशा पद्धतीनं हा तास विभागल्यास तुमच्यात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आणि आत्मिक बदल जाणवतील

हे देखील वाचा: Why is saving necessary? : बचत का आवश्यक आहे? बँकेतच बचत का करावी? आणि जाणून घ्या बँकेतील खात्यांचे प्रकार किती? आणि जाणून घ्या कोणत्या कार्डासाठी 1 लाख रूपयाच्या विम्याचा अंतर्भाव आहे…

सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत:

1. उत्पादकता वाढते: सकाळी लवकर उठल्यास आपण अधिक ताजेतवाने आणि ऊर्जावान असतो. त्यामुळे कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येते आणि दिवसाची सुरुवात उत्पादकतेने करता येते.

2. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते: सकाळी  उठल्यामुळे आपण नियमित व्यायाम, योगा, किंवा ध्यान करण्यासाठी वेळ काढू शकतो. यामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात.

लवकर

3. आहार सुधारतो: सकाळी लवकर उठल्यास आपण आरोग्यदायी नाश्ता वेळेवर करू शकतो, जो संपूर्ण दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करतो.

4. मानसिक शांती: लवकर उठल्यामुळे सकाळच्या शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. हे मानसिक शांती प्रदान करते आणि दिवसभराच्या तणावाशी लढण्यास मदत करते.

हे देखील वाचा: The wonderful cave of Baba Amarnath : बाबा अमरनाथ यात्रा मार्ग : अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम; यात्रा 19 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार

5. वेळेचे व्यवस्थापन: दिवसाची सुरुवात लवकर केल्यास कामे वेळेवर पूर्ण करता येतात आणि उर्वरित दिवसभरासाठी वेळ मिळतो. यामुळे कामे आणि व्यक्तिगत आयुष्यातील संतुलन राखणे सोपे जाते.

6. सूर्यप्रकाशाचा फायदा: सकाळी  उठल्याने आपल्याला नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळतो, जो शरीरातील व्हिटॅमिन डी ची गरज भागवतो आणि मूड सुधारतो.

7. सक्रिय दिनचर्या: लवकर उठल्याने आपण अधिक सक्रीय राहतो, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवता येते.

सकाळी लवकर उठण्याची सवय शरीर आणि मनासाठी खूप फायदेशीर असते आणि यामुळे जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतो. सकाळी उठल्याने नेमके कोणकोणते फायदे होतात? हे जाणून घेण्यासाठी ‘द फाइव्ह एएम क्लब’ हे रॉबिन शर्मा यांचे पुस्तक जरूर वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !