श्रीपती शुगर कारखाना

श्रीपती शुगरच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ आमदार कदम यांच्या हस्ते

जत / आयर्विन टाइम्स
“येणाऱ्या काळात श्रीपती शुगर कारखाना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवावा,” असे आवाहन माजी मंत्री आणि आमदार विश्वजित कदम यांनी केले. डफळापूर येथे नव्याने उभारलेल्या श्रीपती शुगर आणि पॉवर कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार कदम यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात शेतकरी वर्गाची मोठी उपस्थिती होती.

श्रीपती शुगर कारखाना

रोजगार आणि विकासावर भर

जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा श्रीपती शुगर कारखाना आशेचा किरण ठरत असून तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले. “श्रीपती शुगर आमच्यासाठी एक छोटे बाळ आहे. भविष्यात या कारखान्याचा विकास होईल आणि इथेलॉन प्रकल्प देखील सुरु होईल,” असे ते म्हणाले. पुढील गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन अर्धा किलो साखर दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.

हे देखील वाचा: Success news: जतच्या 8 वीत शिकणारा ओम टेंगले व 9 वीत शिकणारी सोनाली कोटी यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे निवड

महत्त्वाचे उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, महेंद्र लाड यांसारखे मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी सांगितले की, “विस्तारित म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि त्याचे काम सुरु आहे.”

गळीत हंगामाचे उद्दिष्ट

महेंद्र लाड यांनी सांगितले की, “मागील वर्षी कारखान्याने तीन लाख टन ऊसाचे गाळप केले होते. यावर्षी नऊ हजार हेक्टर ऊस नोंदवला गेला असून, भविष्यात उसाचे उत्पादन वाढवले पाहिजे.” तसेच आमदार विक्रम सावंत यांनी सांगितले की, “चाचणी हंगामात ७२ हजार टन ऊस गाळप करण्यात आले आहे. दुष्काळी तालुक्यात या वेळी पाणी उपलब्ध झाल्याने ऊस पिकावर चांगला परिणाम झाला आहे.”

हे देखील वाचा: Beautiful, Colorful Golden Pheasant/ सुंदर, रंगबिरंगी गोल्डन फेजंट: लांबी साधारणतः 60 ते 115 सेंटीमीटरपर्यंत; लांब आणि नक्षीदार शेपटी हे त्याच्या सौंदर्यातील मुख्य आकर्षण

काँग्रेस आमदारांची एकजूट

तालुक्याच्या पाणी समस्येबाबत बोलताना आमदार कदम यांनी सांगितले की, आमदार विक्रम सावंत यांनी जत तालुक्याच्या पाणीप्रश्नावर मोठी कामगिरी केली आहे. सर्व काँग्रेस आमदारांनी विधिमंडळात एकत्र येऊन पाण्यासाठी निधी मंजूर करवून घेतला, ज्यामुळे तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

शेतकऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमात विजयमाला कदम, रघुनाथ कदम, शिवाजीराव कदम, स्वप्नाली कदम, ऋषिकेश लाड, नाना शिंदे, सुभाष गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश जोशी यांनी केले.

हे देखील वाचा: new car news: टेस्लाची पहिली रोबोटॅक्सी ‘सायबरकॅब’ सादर: एआय फिचर्ससह चालकाविना चालणारी स्वयंचलित टॅक्सी; अंदाजे किंमत 30,000 डॉलर

श्रीपती शुगर कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण करत असून, त्यांच्यासाठी उच्चांकी दर देण्याचे आश्वासन आमदार कदम यांनी दिले आहे. या गळीत हंगामातून तालुक्याच्या विकासाची नवी दिशा निश्चित होत असल्याचे जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !