शोले

शोले‘ कितीदा पाहिला तरी मन भरत नाही

हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध आणि सर्वाधिक चर्चित चित्रपट कोणता असेल तर तो ‘शोले’. अनेक विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा एक असा चित्रपट आहे जो पुन्हा-पुन्हा कितीदा जरी पाहिला तरी मन भरत नाही. 15 ऑगस्ट 1975 रोजी ‘शोले‘ (Sholay) रिलीज झाला, आता त्याला 50 वर्षे होत आहेत.

शोले

‘शोले’चा सार्वकालिक दहा सर्वश्रेष्ठ (टॉप टेन) भारतीय चित्रपटांच्या श्रेणीत समावेश

या चित्रपटातील काही कलाकार अजूनही जीवित आहेत, तर काहींनी या जगातून एक्झिट घेतली आहे. ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि कलाकार धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमामालिनी, जया भादुरी, हेलन, जगदीप, असरानी, तसेच पटकथा लेखक सलीम-जावेद या सर्वांनी हा चित्रपट संस्मरणीय केला आहे. 2002 मध्ये ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने ‘शोले’चा सार्वकालिक दहा सर्वश्रेष्ठ (टॉप टेन) भारतीय चित्रपटांच्या श्रेणीत समावेश केला.

हे देखील वाचा: स्टार प्रवाहवर नवी मालिका : ‘उदे गं अंबे … कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेचा पार पडला मुहूर्त सोहळा; विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर 3 नंबरची मालिका ‘उदे गं अंबे …’

चित्रपट पूर्ण व्हायला लागली अडीच वर्षे

हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यामध्ये स्टीरियोफोनिक साउंड ट्रॅकचा वापर करण्यात आला होता. 70 एमएम पडद्यावर दाखवला गेला. या चित्रपटाचे शुटिंग 3 ऑक्टोबर 1973 रोजी सुरू झाले होते, आणि जवळपास अडीच वर्षे हा चित्रपट पूर्ण व्हायला लागले. चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावण्यात आली होती, आणि शेवटी 15 ऑगस्ट 1975 रोजी भारतभर प्रदर्शित झाला.

शोले

शोले च्या निर्मितीसाठी त्यावेळी 30 कोटी खर्च

शोले‘चे कॅमेरामन द्वारका दिबेचा आणि कला दिग्दर्शक राम यादेकर होते. दोघेही आपल्या क्षेत्रात निपुण होते. त्यांनी अक्षरशः या चित्रपटात आपला जीव ओतला. आर्ट डायरेक्टर यादेकर यांनी ‘शोले’च्या शुटिंगसाठी बंगळुरू हायवेवर, म्हणजेच कर्नाटकातील दक्षिण क्षेत्रातील एका निर्जन भागात रामनगर नावाचे एक पहाडी गावच वसवले होते. अजूनही हा भाग ‘शोले’च्या शुटिंगसाठी ओळखला जातो. ‘शोले’ (Sholay) 198 मिनिटांचा होता, आणि त्याच्या निर्मितीसाठी त्यावेळी 30 कोटी रुपये इतका खर्च आला होता. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींची कमाई केली. परदेशातही या चित्रपटाने मोठी कमाई केली.

हे देखील वाचा: ‘बोलायचं राहून गेलं’ या मराठी चित्रपटाची घोषणा: प्रेक्षकांना पाहायला मिळणार एक अजब-गजब प्रेमकहाणी

मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांनी कथा नाकारली

असं म्हटलं जातं की, हा चित्रपट पाहण्यासाठी सोव्हिएत रशियामध्ये लोकांच्या अक्षरशः उडया पडत होत्या. मुंबईतील मिनर्वा थिएटरमध्ये हा चित्रपट सलग पाच वर्षांपेक्षा अधिक काळ चालला. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासारख्या दिग्गजांनी याची कथा आणि पटकथा नाकारली होती. तेव्हा याचे पटकथा लेखक सलीम-जावेद यांनी जी. पी. सिप्पी यांच्याशी संपर्क साधला. ते या चित्रपटासाठी पैसा घालायला तयार झाले, आणि त्यांच्या मुलाने रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. ‘शोले’ (Sholay) चा आणखी एक इतिहास असा की 50 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचा ‘गेल्या पन्नास वर्षातील सर्वश्रेष्ठ भारतीय चित्रपट’ म्हणून गौरव करण्यात आला.

शोले

‘सेवन सामुराई’ या गाजलेल्या जपानी चित्रपटावर आधारित

संगीतकार आर. डी. बर्मन यांनी या चित्रपटाचा ओरिजिनल साउंड ट्रॅक तयार केला होता. या साउंड ट्रॅक आणि ‘शोले’ (Sholay) च्या गब्बरसिंग व कालियावाल्या डायलॉगने विक्रीचा अनोखा रेकॉर्ड बनवला. 2014 च्या जानेवारीत या चित्रपटाचा 3डी फॉर्मॅट रिलीज करण्यात आला. असे म्हटले जाते की हा चित्रपट जपानचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या ‘सेवन सामुराई’ या गाजलेल्या चित्रपटावर आधारित होता.

हे देखील वाचा: Sangli Crime: मिरजेतील 57 वर्षीय वृद्धाचा भोसकून खून; रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक; बसस्थानकात बसण्यावरून वाद

शोले

शत्रुघ्न सिन्हा आणि दिलीप कुमार यांचा योगायोग जुळला नाही

अभिनेता अमजद खान यांनी गब्बरसिंगची क्रूर भूमिका साकारली होती, परंतु या भूमिकेसाठी पहिल्यांदा डॅनी डोंगझोंप्पा यांना विचारण्यात आले होते. पण त्यावेळी डॅनी फिरोज खानच्या ‘धर्मात्मा’ (1975) मध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी हा चित्रपट नाकारला आणि तो अमजद खान यांना मिळाला. अशाच प्रकारे अमिताभ बच्चनच्या ‘जय’ भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हा यांची निवड करण्यात आली होती, तर ठाकूर यांच्या भूमिकेसाठी दिलीप कुमार यांना पसंद करण्यात आले होते. परंतु, काही योगायोग जुळले नाहीत, आणि या भूमिका अमिताभ बच्चन व संजीव कुमार यांच्या वाट्याला आल्या.

हे देखील वाचा: Lion King of the Jungle : सिंह: नैसर्गिक संतुलनाचे महत्त्वाचे अंग असल्याने त्यांच्या संवर्धनाने पर्यावरणाची समृद्धी टिकून राहण्यास होते मदत; भारतात आहेत 674 सिंह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !