सांगली : शिक्षिकेस विकलेली जमीन अन्य व्यक्तीला विक्री केल्याचे समोर
आयर्विन टाइम्स / सांगली
मिरज तालुक्यातील नांद्रे (जि. सांगली) येथे शेतजमीन खरेदीच्या नावाखाली शिक्षिकेस २१ लाख ८२ हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. बाळासो मलगोंडा पाटील, अमोल बाळासो पाटील, अभय बाळासो पाटील, मनीषा महावीर चौगुले (सर्व रा. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
शिक्षिका कमल सज्जन पाटील (वय ६८) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कमल पाटील या शिक्षिका होत्या. त्या बुधगाव येथील लक्ष्मीनगर येथे राहण्यास आहे. नांद्रे येथील शेतजमीन गट नंबर ६२९ च्या खरेदीपोटी वेळोवेळी धनादेश आणि आरटीजीएसद्वारे संशयित अमोल पाटील याच्या खात्यावर २१ लाख ८२ हजारांची रक्कम दिली. अन्य संशयितांच्या सांगण्याप्रमाणेच ही रक्कम देण्यात आली.
त्यानंतर सदरची जमीन खरेदी करून देण्याबाबत फिर्यादी पाटील यांनी तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी टाळाटाळ करीत ही जमीन अन्य व्यक्तीला विक्री केल्याचे समोर आले. फिर्यादी पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
बलगवडेत पोषण आहारात उंदराच्या लेंड्या; ऑनलाइन तक्रार : दुसऱ्यांदा प्रकार
तासगाव तालुक्यातील बलगवडे (जि. सांगली) येथे पोषण आहारात उंदराच्या लेंड्या पोषण” आढळल्याची तक्राराजा कथन प्राप्त आली आहे. दोन घटना ताजी असतानाच आता तासगाव तालुक्यातील बलगवडेत पोषण आहारात उंदराच्या लेंड्या आढळल्याची तक्रार समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी ही तक्रार ऑनलाइन करण्यात आली आहे. आठवडाभरात दुसरा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा: Jat Crime: खून करून पसार झालेल्या आरोपीस जेरबंद करण्यात उमदी पोलीसांना यश; खंडनाळ येथील 40 वर्षीय महिलेचा खून आर्थिक व्यवहारातून
तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील एका मुलीच्या घरात पोषण आहाराचे पाकीट देण्यात आले होते. या पाकिटात उंदराच्या लेंड्या आढळून आल्याची तक्रार करण्यात आली आहे. याची दखल घेतली आहे. उद्या (रविवारी) एक पथक बलगवडेत जाऊन या संपूर्ण प्रकाराची माहिती घेणार आहे. त्यानंतरच यात नेमके काय घडले आहे, ते समोर येईल.
गर्भवती माता आणि बालकांना शासनाच्या वतीने हा पोषण आहार देण्यात येतो. हा पोषण आहार काळजीपूर्वक तयार करून दिला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र गेल्या आठवड्यात पलूसमध्ये पोषण आहारात मेलेला साप आढळला होता.
तर आता तासगाव तालुक्यातील बलगवडेमध्ये पोषण आहारात उंदराच्या लेंड्या आढळल्या आहेत. त्यामुळे हा पोषण आहार आहे की शासन गर्भवती माता, बालकांच्या जीवाशी खेळ करत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
.
अशी तक्रार मिळाली असल्याचा दुजोरा: जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी दिला आहे. पलुस येथे पोषण आहारात साप आढळल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने हा आहार जप्त केला होता. त्यानंतर तासगाव तालुक्यात जेथे हा पोषण आहार येतो त्या गोदामाचीही तपासणी करण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, हे समोर येण्यापूर्वीच दुसरा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.