अमेरिकेत

शिक्षिका अमेरिकेत राहून गुजरात सरकारचा पगार लाटते

आयर्विन टाइम्स / अहमदाबाद
गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजीजवळील एका सरकारी शाळेशी संबंधित हा धक्कादायक प्रकार आहे. इथली एक शिक्षिका अमेरिकेत राहते पण ती येथील सरकारी शाळेत शिक्षिका आहे. विशेष म्हणजे ती पगारही घेत आहे. भावना पटेल असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. अजब तुझे सरकार, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. असं कसं घडू शकतं असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अमेरिकेत

या शाळेतील शिक्षिका तिची इच्छा असेल तर 10 महिन्यांनी दिवाळीला या शाळेत येते. आणखीही धक्कादायक बाब म्हणजे ती त्यानंतर 21 दिवसांची सुट्टीही घेते. हा डोकं गरगरायला लावणारा प्रकार नुकताच तपासात समोर आला आहे. बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथे अमेरिकेत राहणाऱ्या आणि शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेची चलाखी उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात आणि सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. ही शिक्षिका दोन महिने भारतात आणि 10 महिने अमेरिकेत राहत असल्याचेही समोर आले आहे.

हे देखील वाचा: सांगली जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’साठी साडेचार लाख अर्ज; अपात्र किती ठरले जाणून घ्या: 3 हजार रुपये रक्षाबंधनापूर्वीच होणार खात्यावर जमा

बनासकांठा जिल्ह्यातील दांता तहसीलचे प्रकरण

ही खळबळजनक घटना बनासकांठा जिल्ह्यातील दांता तालुक्यातील अंबाजीजवळील पंच प्राथमिक शाळेतील आहे. शाळेतील शिक्षिका भावनाबेन पटेल या गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. ती क्वचितच शाळेत येते. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, भावना पटेल हिच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड आहे, तरीही तिचे नाव भारतातील या सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोंदवले गेले आहे.

हे देखील वाचा: Lion King of the Jungle : सिंह: नैसर्गिक संतुलनाचे महत्त्वाचे अंग असल्याने त्यांच्या संवर्धनाने पर्यावरणाची समृद्धी टिकून राहण्यास होते मदत; भारतात आहेत 674 सिंह

शाळेच्या फलकावर या शिक्षिकेच्या नावाचा उल्लेख आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकेचे म्हणणे आहे की, ही शिक्षिका दिवाळीच्या काळात वर्षातून एकदा येते. दोन महिन्याच्या कालावधीतीत २० दिवसांची रजादेखील काढते.

दोन वर्षांपासून शाळेत आली नाही

शाळेतील शिक्षिका पारुलबेन यांच्या म्हणण्यानुसार, मुलांनी दोन वर्षांपूर्वी भावना बेन पटेल यांना शाळेत पाहिले होते. ती ज्या वर्गाची वर्गशिक्षिका आहे. त्या वर्गातील मुले आता पाचवीपर्यंत पोहोचली आहेत. ती बऱ्याच दिवसांपासून गैरहजर आहे. पारुल बेन म्हणाल्या की, सध्या तिच्याकडे पाचवीच्या वर्गाची जबाबदारी आहे. प्रदीर्घ काळ अमेरिकेत असूनही शिक्षिका भावनाबेन पटेल यांच्या नोकरीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे देखील वाचा: important benefits : सकाळी लवकर उठण्याचे फायदे जाणून घ्या; महत्त्वाचे 7 फायदे माहीत आहेत का?

पगाराची वसुली होणार का?

नोकरी कशी चालू ठेवली, असे प्रश्न विचारले जात आहेत या शाळेत कधीच तपासणी होत नाही का, भावनाबेन पटेल यांचा अधिकाऱ्यांशी काही संबंध आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे कारवाई झाली नाही. या खुलाशावर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुजरात शिक्षण विभाग काय भूमिका घेणार आहे, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण गुजरातच्या शिक्षण विभागाला विचारत आहे.स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे शक्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

संबंधित शिक्षिकेला गेल्या आठ वर्षांपासून पगार दिला जात आहे. त्याची वसुली होणार का, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *