वेळेचे महत्त्व: काय फायदे होतात? जाणून घ्या
‘कल करे सो आज कर, आज करे सो अब.. अशी हिंदी म्हण किंवा ‘आजचे काम आजच करा’ हे मराठी वाक्यही आपल्याला बालपणापासून ऐकायला मिळते. ही म्हण साधी असली तरी त्यातील अर्थ अतिशय गहन आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, हे सूत्र आपल्याला उद्देश, प्रेरणा, आणि शिस्त देऊ शकते. आजच्या युगात, जिथे प्रत्येकाला स्वतःचे उद्दिष्ट गाठायचे आहे, तेथे या म्हणीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. असं का म्हणतात बरं? कारण, करू, बघू, नंतर करू, होईल, वेळ येईल तेव्हा बघू… अशा अनेक कारणांमुळे कामे लांबणीवर पडतात.
अनेकदा तर एखादं काम पूर्ण करण्याची मुदतही संपून जाते. केवळ आळस केल्याने आपण ते काम करू शकत नाही. त्यामुळे जे काम हातात आहे, ते लगेच पूर्ण करण्याची सवय लावून घ्या. यामुळे काय फायदे होतात? ते आपण बघूया. वेळेचे महत्त्व जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
वेळेचे महत्त्व
वेळेचे व्यवस्थापन हे यशाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे. ज्यावेळी आपण कोणतेही काम पुढे ढकलतो, तेव्हा त्याचे अनेक परिणाम होऊ शकतात. सर्वप्रथम, आपल्याला त्या कामाचे ओझे सतत जाणवते आणि मनावर ताण येतो. दुसरे म्हणजे, काम पुढे ढकलल्यामुळे, त्याच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होऊ शकतो. कधी कधी कामाची घाई घाईत केली जाते, ज्यामुळे त्यामध्ये चुका होण्याची शक्यता वाढते. वेळेचे महत्त्व जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
हे देखील वाचा: wood apples: कवठ: चवीला आंबट-गोड असलेल्या या फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
शिस्तीचे महत्त्व
कोणतंही काम त्याच क्षणी करणं हा स्वयंशिस्तीचा भाग आहे. एकदा ही सवय तुमच्या अंगवळणी पडली की, तुम्ही आपोआप काम वेळच्या वेळी पूर्ण करू लागता. त्यामुळे तुम्हाला कामाचा ताण येत नाही आणि ते रखडतही नाही. उदा- तुम्हाला शाळेत शिक्षकांनी गृहपाठ दिला असेल आणि तुम्ही घरी आल्यावर लगेच तो केला, तर पुढचा वेळ तुम्हाला खेळायला मिळतं. तुम्ही निर्धास्त राहू शकता. मात्र, नंतर करू असं म्हणत तुम्ही केलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याची वेळ आली तर…? असा प्रश्न आलाच नसता. त्यामुळे काम त्याच क्षणी केलं की, विसरण्याची भीती राहत नाही.
विसरण्याची भीती नाही
कोणतंही काम वेळीच पूर्ण केलं, की ते विसरण्याची भीती राहत नाही. महत्त्वाची कागदपत्रे शाळेत मागितली आहेत आणि तुम्ही ती नंतर दप्तरात ठेवू, असे म्हणून विसरता आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावरच तुम्हाला आठवतं. मात्र, तुम्ही तेव्हाच ती कागदपत्रं दप्तरात ठेवली असती, तर विसरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जे काम जेव्हा आठवेल ते तेव्हा लगेच करा.
विलंबाचे अजून एक मोठे नुकसान म्हणजे, आपल्या दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम. प्रत्येकाच्या आयुष्यात काम, कुटुंब, मित्र, आणि स्वतःसाठी असलेल्या वेळेचा समतोल साधणे आवश्यक असते. काम पुढे ढकलल्याने हा समतोल बिघडू शकतो, आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, मानसिक स्थितीवर, आणि एकूणच जीवनशैलीवर होतो.
तुमचा प्राधान्यक्रम काय?
एकाच वेळी ३-४ कामे तुम्हाला करायची असतील आणि तुम्ही ती टाळत असाल, तर दोन-तीन दिवसांनी खूप गोंधळ उडतो आणि एकाच वेळी ५-६ कामं डोळ्यांसमोर दिसू लागतात. त्यामुळे नेमकं कोणतं काम आधी पूर्ण करू? असा प्रश्न पडतो. असं होऊ नये, यासाठी कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. जे महत्त्वाचं आणि तातडीचं काम आहे ते लगेच पूर्ण करा. त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करा.
प्रगती आणि संधी
“आजचे काम आजच करा” हे विचार पुढे जाण्याची प्रेरणा देतात. प्रत्येकाला काहीतरी मोठे साध्य करायचे असते. ही साध्य करणारी छोटी छोटी पावले म्हणजेच आपले दररोजचे कार्य. जेव्हा आपण आपली कामे वेळेत पूर्ण करतो, तेव्हा आपण आपल्या उद्दिष्टांच्या जवळ जातो. याशिवाय, वेळेत काम पूर्ण केल्याने आपल्याला नवीन संधीही मिळू शकतात. आपले काम वेळेत पूर्ण केल्याने आपली विश्वासार्हता वाढते आणि इतरांना आपल्यावर विश्वास ठेवायला प्रवृत्त करते.
शिस्त आणि जबाबदारी
आजचे काम आजच करणे हे आपल्या शिस्तीचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. एक व्यक्ती जी वेळेत काम करते ती इतरांच्या दृष्टीने आदरणीय ठरते. अशा व्यक्तींना सर्वजण विश्वासार्ह मानतात आणि त्यांच्या निर्णयक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतात. जबाबदारी घेण्याची तयारी दाखवणे आणि वेळेत काम पूर्ण करणे हे आपल्या जीवनातील यशाचे महत्त्वाचे घटक ठरू शकतात.
मोकळा वेळ मिळवा
अनेक विद्यार्थी तक्रार करतात की, त्यांना मोकळा वेळ मिळत नाही. याचं कारण म्हणजे, ते त्यांचं काम किंवा अभ्यास वेळेत पूर्ण करत नाहीत. त्यामुळे सतत तो अपूर्ण राहतो किंवा सतत ‘तो पूर्ण करायचा आहे’, याच विचारात ते राहतात. त्यामुळे मोकळा वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला, तरी ते त्यात निर्धास्तपणे मजा करू शकत नाहीत. हे टाळण्यासाठी काम पूर्ण करा आणि निर्धास्तपणे खेळा, बागडा, मजा करा.
उपाय आणि सल्ले
1. कामाचे नियोजन: आपल्या कामाचे महत्व ओळखून त्याची प्राथमिकता ठरवा. ज्या कामांना तातडीची गरज आहे त्यांना सर्वप्रथम पूर्ण करा. वेळेचे महत्त्व सगळ्यांनाच कळलं पाहिजे.
2. समय मर्यादा ठरवा: प्रत्येक कामासाठी एक निश्चित समय मर्यादा ठरवा आणि ती पाळण्याचा प्रयत्न करा. यातून वेळेचे महत्त्व लक्षात येईल.
3. कामाची विभागणी: मोठे काम छोटे छोटे टप्पे ठरवून पूर्ण करा. यामुळे काम सोपे वाटते आणि ते वेळेत पूर्ण करण्याची शक्यता वाढते. वेळेचे महत्त्व सगळ्यांनाच कळलं पाहिजे.
4. विलंबाचे कारण ओळखा: आपल्याला काम पुढे ढकलण्याची सवय असेल तर त्यामागील कारण शोधून त्यावर उपाययोजना करा. वेळेला प्राधान्यक्रम द्या.
5. स्वतःला प्रोत्साहित करा: काम पूर्ण केल्यावर स्वतःला बक्षीस द्या किंवा एखादा छोटा ब्रेक घ्या. यामुळे पुढील कामासाठी उत्साह वाढतो.
“आजचे काम आजच करा” ही म्हण फक्त एक विचार नाही, तर एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली अवलंबल्यास आपले आयुष्य अधिक सुगम, संगठित, आणि यशस्वी होईल. या म्हणीचे पालन करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी आजपासूनच काम करणे. त्याचप्रमाणे, आपल्या कामाच्या गुणवत्तेत वाढ होऊन, आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत होईल. अशा प्रकारे, आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समाधानी करू शकतो. त्यामुळे, चला, “आजचे काम आजच करा” या म्हणीला आपले जीवनसूत्र बनवूया. यातून वेळेचे महत्त्व लक्षात येईल.