अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल
आयर्विन टाइम्स / आटपाडी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरात चालविणाऱ्या संग्राम देशमुखने एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीतून पळवून धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरेवरही ठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी शुक्रवारी (दि. २०) आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला मदत करणाऱ्या महिलेला अटक केली असून सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींने मुलीवरील अत्याचार केलेल्या कृत्याचे चित्रीकरण केल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असेही पोलीस तपासात समोर आले आहे. संग्राम देशमुख हा आटपाडी मध्ये जिम चालवत होता. आरोपींकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पध्दतीने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे.
अत्याचाराच्या निषेधार्थ आटपाडी शहर बंद
पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हा अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी शुक्रवारी आटपाडी शहर बंद करत आटपाडी बसस्थानकापासून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवावी, सरकारी वकील या केसमध्ये द्यावा अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली. आटपाडीमधील अल्पवयीन मुलीवर गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अत्याचाराची चौकशी होऊन कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आटपाडी शहर बंद ठेवण्यात आले.
या प्रकरणातील आरोपीने पीडित मुलीच्या कुटूंबाला कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावे.
अत्याचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आटपाडीकर जनता आक्रमक झाली असून, आरोपी संग्राम देशमुख या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी व त्याच्या महिला साथीदाराची सखोल व्हावी, तसेच आरोपीच्या अवैध धंद्यांची चौकशी करावी. त्याच्याशी हितसंबंध असणाऱ्यांचा शोध घेऊन चौकशी व्हावी. या गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांनाही शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे चित्रीकरण करणाऱ्या नराधम संग्राम देशमुख याच्या विरोधात जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीला जामीन मिळाला तर त्याला घरातून ओढून मारू, असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी येथे दिला. संग्राम देशमुख याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी आटपाडी शहरात बंदची हाक देण्यात आली होती. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आटपाडी बंद ठेवून तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यावर मोर्चाचे आयोजन केले होते.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारीपेठेत शुकशुकाट होता.
आटपाडी येथे मोर्चासमोर माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी भाषण केले. सकाळी १०.३० वाजता हा मोर्चा निघाला. मोर्चात महाविद्यालयीन युवक-युवती मोठया संख्येने सहभागी झाले होते. मुलींनी ‘वुई वॉन्ट जस्टीस’, ‘नराधमाला फाशी द्या’ अशा घोषणा देत मुख्य बाजारपेठ, बाजार पटांगण ते पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा निघाला. ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, गुन्हेगाराची धिंड काढा. अशा प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. गुन्हेगारांना कोठडीत वेगळी वागणूक दिल्यास पोलिस अडचणीत येतील. त्यामुळे याची दखल घ्यावी. जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीस फाशी द्यावी.
यावेळी यू. टी जाधव, पृथ्वीराज पाटील, अनिता पाटील, गुलशन वंजारी, नितीन कुलकर्णी, स्नेहजित पोतदार, अरुण वाघमारे, चंद्रकांत दौंडे आदींची भाषणे झाली.
दयामाया करू नका पोलिस ठाण्याच्या आवारात मोर्चा आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही. अत्याचार करणायास कोणत्याही जातीचा असला तरी चौकाचौकात फोडून काढा.