लैंगिक

आयर्विन टाइम्स / मुंबई
बदलापूरमध्ये चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर अस्वस्थता व संतापाची लाट पसरलेली असताना राज्यात बलात्काराचे सत्र सुरूच आहे. मुंबईत मालवणी येथे अल्पवयीन मुलीवर पित्याने अत्याचार केल्याची घटना घडली, तर अंबरनाथमध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पुण्यातील दौंड तालुक्यात एका शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तसेच कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मालवणीत मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक

मालाडच्या मालवणी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या ५५ वर्षीय पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.
याप्रकरणी आरोपी पित्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह ‘पोक्सो’ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यात त्याला विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी पोलीस कोठडी सुनावली आहे.

लैंगिक

अंबरनाथमध्ये शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अंबरनाथमध्ये एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरासमोरील सार्वजनिक शौचालयात तिच्या शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाने अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ, पश्चिम पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. संतोष कांबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.. खळबळजनक बाब म्हणजे हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार १ जुलै ते २० ऑगस्टपर्यंत सुरू होता.

हे देखील वाचा: Atrocious murder / निर्घृण खून : शिक्षिकेने सुपारी देऊन केला आपल्या प्रियकराचा निर्घृण खून; पोलिसांनी घेतले 5 संशयितांना ताब्यात

पुण्यात शिक्षकाकडून नववीतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एका शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघड झाली आहे. बापूसाहेब धुमाळ असे या शिक्षकाचे नाव असून तो दौंड तालुक्यातील मळद येथील भैरवनाथ विद्यालयामध्ये शिक्षक आहे. यासंदर्भात पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक विद्यार्थिनींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. एका पीडित मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

लैंगिक

कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीची हत्या, बलात्काराचा संशय

कोल्हापुरात शिये गावातील रामनगर परिसरात दहा वर्षीय मुलीचा मृतदेह गुरुवारी गावालगतच्या शेतात आढळला. मृत मुलगी बुधवारपासून बेपत्ता होती. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर मुलीचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर ड्रेस होता, पण चप्पल व तिची अंतर्वस्त्र बाजूला पडली होती. त्यामुळे तिची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

हे देखील वाचा: wood apples: कवठ: चवीला आंबट-गोड असलेल्या या फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

मालवणीतील घटनेने संतापाची लाट; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ५५ वर्षांच्या आरोपी पित्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. यातील तक्रारदार महिला तिच्या ५५ वर्षांच्या पतीसह चार वर्षांच्या मुलीसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वी पित्याने त्याच्याच मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता.

लैंगिक

त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे तिच्या गुप्त भागावर जखम झाली होती. कामासाठी बाहेर गेलेली पत्नी घरी आल्यानंतर तिचा पती तिच्या मुलीसोबत नग्नावस्थेत बसल्याचे दिसून आले होते. हा प्रकार विचित्र वाटल्याने तिने त्याला जाब विचारला. यावेळी आरोपीने पत्नीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. मुलीच्या चौकशीनंतर तिच्यावर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे त्या महिलेला समजले. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच बुधवारी रात्री उशिरा त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा: sangli news: शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळांनी ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ अभियान राबवावे: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

अंबरनाथमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

उल्हासनगर : बदलापूरमधील अश्लील चित्रफित दाखवली. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना अद्याप ताजी असतानाच अंबरनाथमध्येही एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत ९ वर्षांच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून, आरोपी संतोष कांबळे (३५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित मुलगी अंबरनाथ शहरातील एका सार्वजनिक शौचालयात गेली असताना, आरोपी संतोष कांबळे याने तिला एका कोपऱ्यात नेऊन तिला त्यानंतर, या नराधमाने तिचा विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारामुळे मुलगी प्रचंड घाबरली आणि घरी परतल्यानंतर घडलेली घटना तिच्या आईला सांगितली.

लैंगिक

अल्पवयीन मुलीच्या आईने तातडीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला आणि संतोष कांबळे याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत संबंधित आरोपीवर पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. यासोबतच पीडित मुलीच्या कुटुंबाला आवश्यक ती मानसिक आणि कायदेशीर मदत देण्यात येत आहे. घटना उघडकीस आल्यानंतर अंबरनाथ शहरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी कठोर पावले उचलून दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर अंबरनाथ आणि आजूबाजूच्या परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. पोलिसांनीही शहरात गस्त वाढवण्याची योजना आखली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !