रोजच्या वापरातील पदार्थ

पदार्थांच्या रोजच्या योग्य वापराअभावी आरोग्यावर परिणाम

आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टींचा वापर केल्या जातो, ज्यामुळे आपले दैनंदिन कामकाज चालते. मात्र, अनेकदा आपण या वस्तूंच्या वापरावर योग्य लक्ष देत नाही, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जेव्हा आपण खाण्यापिण्याच्या वस्तूंविषयी निष्काळजी राहतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर आणि आरोग्यावर होतो. जर आपण काही सोप्या आयुर्वेदिक नियमांचे पालन केले, तर अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. आज आपण अशाच काही रोजच्या वापरातील वस्तूंविषयी सविस्तर चर्चा करू.

रोजच्या वापरातील पदार्थ

१. पीठ: भाकरी, चपाती (पोळी)

पीठ ही प्रत्येक घरात वापरली जाणारी अत्यंत महत्त्वाची वस्तू (पदार्थ) आहे. शहरातील बऱ्याच घरांमध्ये पॅकेटमधून पीठ आणले जाते, कारण त्यात शुद्धता आणि गुणवत्तेची हमी दिली जाते. मात्र, पीठ वापरताना काही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

हे देखील वाचा: Why buttermilk and curd are important? पोटातील चांगल्या बॅक्टेरियांसाठी ताक आणि दही हे 2 पदार्थ का महत्त्वाचे आहेत, जाणून घ्या?

ताजे पीठच वापरले पाहिजे, कारण जुने पीठ अनेकदा अपचनासारख्या समस्यांना कारणीभूत ठरते. ज्वारी, मका, बाजरी किंवा गहू पीठ घेतल्यास ते पंधरा दिवसांच्या आत वापरावे, अन्यथा त्यात कडवटपणा येऊ शकतो. मका किंवा बाजरीचे पीठ तीन दिवसांच्या आत संपवावे. तसेच पीठ मळून ते दुसऱ्या दिवशी वापरण्याची सवय बदलावी. ताज्या पीठापासून तयार रोजच्या ताज्या चपात्या खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरते. यामुळे गॅस आणि अपचनाच्या समस्यांना दूर ठेवता येते.

२. बटाटा: नियमित वापरातीळ फळभाजी

बटाटा हा प्रत्येक घरातील सर्वसाधारण पदार्थ आहे. परंतु, बटाटा खरेदी करताना अनेकदा लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. बटाट्याच्या निवडीमध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. अंकुर फुटलेला बटाटा खाणे आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, हिरव्या सालीचा बटाटा टाळावा, कारण तो ऍसिडिटी आणि पोटातील जळजळीची समस्या निर्माण करतो.

हे देखील वाचा: health trend Vegan diet / व्हेगन आहार : ‘लठ्ठपणा’पासून बचावासाठी युवकांचा वाढतोय व्हेगन आहाराकडे कल: नवीन आरोग्यप्रवृत्ती

काही लोक वेळेची बचत करण्यासाठी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर ते वापरतात. मात्र, हे तितकेसे चांगले नाही. उकडलेला बटाटा गार झाल्यानंतर लगेच वापरणे चांगले असते. फ्रीजमध्ये ठेवलेला उकडलेला बटाटा पुन्हा गरम करून खाल्ल्यास पचनास अडचण निर्माण होऊ शकते. केलेले पदार्थ रोजच्या रोज खावेत.

रोजच्या वापरातील पदार्थ

३. दही: अत्यंत गुणकारी

दही हा अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. मात्र, त्याचा योग्य प्रकारे वापर करणे महत्त्वाचे आहे. दही नेहमी ताजेच खावे, कारण अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले दही शरीरासाठी हानिकारक असू शकते. विशेषत: काही पदार्थांसोबत दही खाणे टाळावे. उदा., फळांसोबत दही खाणे योग्य नाही, तसेच कांदा घालून दही खाल्ल्यास पचनास त्रास होतो. याशिवाय, उडदाच्या डाळीबरोबर दही खाणे विषारी ठरू शकते. त्यामुळे उडदाची डाळ खाण्यासोबत दही खाणे टाळावे.

काही लोक दहीवडे करताना उडदाची डाळ वापरतात, परंतु यामुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. यासाठी दहीवडे बनवताना मूगडाळ वापरणे चांगले असते, ज्यामुळे विषबाधेचा धोका राहत नाही.

रोजच्या वापरातील पदार्थ

४. ब्रेड: एक बेकारी पदार्थ

शहरी जीवनात ब्रेडचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. परंतु, ब्रेड खरेदी करताना लक्षात घ्यावे की तो फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणू नये. फ्रिजमध्ये ठेवलेला ब्रेड अनेकदा पचनास त्रासदायक ठरतो. जेव्हा ब्रेड खाणार असाल, तेव्हा ताजे आणावे आणि शक्यतो केलेले पदार्थ रोजच्या रोज  त्याच दिवशी खावे. अनेक दिवस फ्रिजमध्ये ठेवलेला ब्रेड खाणे पोटाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

वस्तूंच्या योग्य वापराने आपण अनेक आरोग्य समस्यांपासून दूर राहू शकतो. आपल्या आहारातील लहानसहान बदल आणि काही आयुर्वेदिक नियम पाळून आपले आरोग्य सुधारण्यासाठी ही साधी, पण महत्त्वाची पावले नक्कीच उपयुक्त ठरतील. बनवलेले पदार्थ रोजच्या रोज खाण्याची सवय ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !