राशिभविष्य

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट 2024: आज वार शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ आषाढ कृष्ण ४/ १९४६ नक्षत्र: पुनर्वसू चंद्ररास: कर्क सूर्योदय: ६ वाजून १७ मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून १ मिनिटांनी राहू काल : सकाळी १०:३० ते दुपारी १२:०० रवी आश्लेषा वाहन गाढव आजच्या राशिभविष्य 3 ऑगस्ट 2024 नुसार शनिवारी मेष, वृषभ राशीसह 3 राशींना नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक लाभ होईल. इतर लोकांनी देखील त्यांचे आजचे भविष्य जाणून घ्या (Horoscope today 3 August)

राशीभविष्य

राशिभविष्य आजचं 3ऑगस्ट मेष (Aries)

आजच्या मेष राशीनुसार आर्थिक बाबीसाठी आजचा दिवस आपला चांगला फलदायी असणार आहे. आपण जर व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढीसाठी आपले प्रयत्न चांगले असणार आहेत. प्रवासातून लाभ संभवतो. वेळेवर काम करायला शिका.

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट वृषभ (Taurus)

आजच्या वृषभ राशीनुसार कामाची सुरुवात आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. व्यापार व्यवसायात आपणास चांगला मोबदला मिळणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव चांगला पडणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. इष्ट उपासना उपयुक्त ठरेल.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 2 ऑगस्ट: मेष, वृषभ यांसह 7 राशींना नशिबाची साथ मिळेल, आर्थिक लाभ, इतरांनी देखील आजच्या राशीत तुमचे भविष्य जाणून घ्या

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट मिथुन (Gemini)

आजच्या मिथुन राशीनुसार आज आपली प्रकृती नाजूक असल्यामुळे, शारीरिक थकवा येणारी कामं करू नका. महत्त्वाची कामे खूप विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमचे भांडवल वेळेत गुंतवा, शत्रू वर्ग सक्रिय होईल.

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट कर्क (Cancer)

आजच्या कर्क राशीनुसार आपल्या नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी आपल्या साठी लाभकारी असणार आहेत. प्रेमी-प्रेमिकासाठी आजचा दिवस आपणास अनुकूल राहणार आहे. भागीदाराशी मतभेद होऊ शकतात, गैरसमज होईल.

राशिभविष्य

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट सिंह (Leo)

आजच्या सिंह राशीनुसार आपण जर संधीचा फायदा घेतला तर आपला फायदा होणार आहे. आपल्या कल्पक दृष्टिकोनाने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाढ होणार आहे. आपली प्रतिमा उंचावणारा आहे. मनात अनेक दुविधा चालू असतील. आध्यात्मिक बळाचा लाभ होईल.

हे देखील वाचा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राजकीय स्वार्थासाठी; हायकोर्टात जनहित याचिका ; 6 ऑगस्टला सुनावणी

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट कन्या (Virgo)

आजच्या कन्या राशीनुसार तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांचे साहाय्य होणार आहे. मित्र ओळखीच्या व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरणार आहेत. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता. जास्त अभिमान तुमचेच नुकसान करेल, म्हणून चांगले वर्तन ठेवा आणि तुमचे मन शांत ठेवा.

राशिभविष्य

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट तुळ (Libra)

आजच्या तुळ राशीनुसार आपल्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करण्याची गरज आहे. तरच आपणाला यश मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या थोडा कठीण कालावधी आहे. आपल्या कामात जबाबदारी वाढणार आहे. तुम्हाला जमीन आणि इमारती खरेदीसाठी भांडवल गुंतवावे लागेल.

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट वृश्चिक (Scorpio)

आजच्या वृश्चिक राशीनुसार पुढच्या कारकिर्दीसाठी आपले प्रयत्न होणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठ्या लाभाची संधी येण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होणार आहे, मात्र आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विचार बदला, फायदा होईल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट धनु (Sagittarius)

आजच्या धनु राशीनुसार कामामध्ये व आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. वेळ कमी, काम जास्त, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला यश मिळेल. इच्छित जीवनसाथी मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

हे देखील वाचा: जत तालुक्यातील गुड्डापूर येथे 9 कोटी खर्चून कर्नाटक सरकारने उभारले कर्नाटक भवन; माजी मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाले उद्घाटन; अन्नछत्राचीही उभारणी

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट मकर (Capricorn)

आजच्या मकर राशीनुसार लॉटरी, सट्टा, जुगार यापासून लांब राहणे आपल्या हिताचे आहे. आपले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. आर्थिक बाजू चांगली सांभाळली जाईल. विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास होणार आहे. शांतपणे विचार करून कोणताही निर्णय घ्या, आजीविका वाढण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट कुंभ (Aquarius)

आजच्या कुंभ राशीनुसार आपल्या कुटुंबीयांची अधिक सखोल नाते निर्माण होणार आहे. घरातील जमीनजुमल्याच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागणार आहे. आपल्या ज्ञानाचा व हुशारीचा व्यवसायात फायदा होणार आहे. अधिकारी वर्गासाठी काळ चांगला आहे, परोपकारामुळे मनःशांती मिळेल. स्वक्षेत्रात कर्तृत्व व पराक्रम गाजवता येईल. नावलौकिक होईल.

राशिभविष्य

राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट मीन (Pisces)

आजच्या मीन राशीनुसार नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे जीवन सकारात्मक राहणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात अत्यंत अनुकूल होणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या आपणास चांगले निष्कर्ष मिळणार आहेत. कामाच्या अधिकतेमुळे महत्त्वाची कामे पूर्ण होणार नाहीत. प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !