राशिभविष्य आजचं 25 जुलै: स्थावर देवघेव, प्रवास , व्यापार यासाठी चांगला दिवस
राशिभविष्य आजचं 25 जुलै 2024: आज वार गुरुवार दि. २५ जुलै २०२४ आषाढ कृष्ण पंचमी १९४६ नक्षत्र: पूर्वा भाद्रपदा चंद्ररास: मीन सूर्योदय: ६ वाजून १४ मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून ५ मिनिटांनी राहू काल : दुपारी १:३० ते दुपारी ३ :०० स्थावर देवघेव, प्रवास , व्यापार. आजचा दिनविशेष: जागतिक भ्रूणशास्त्रज्ञ दिवस. आजचे राशीभविष्य सूचित करते की २५ जुलै रोजी मेष, तुळ राशीसह 4 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. आजच्या राशीभविष्यातील तुमचे भविष्य जाणून घ्या (Today’s Horoscope 25th July)…
राशिभविष्य आजचं 25 जुलै मेष (Aries)
आजच्या मेष राशीनुसार 25 जुलै, मेष राशीच्या लोकांना गुरुवारी एखाद्या स्पर्धा किंवा लॉटरीतून धनलाभ होईल. पैज जिंकाल. तुम्हाला तुमच्या पत्नीचे सहकार्य व साहाय्य मिळेल. व्यवसायात प्रगती शक्य आहे. व्यवसायात काही नवीन योजना आखल्या जातील. तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे सिद्ध होतील. कोर्टाचे काम आज पूर्ण होईल. प्रयत्न करूनही व्यवसायात मंदी राहील.
राशिभविष्य आजचं 25 जुलै वृषभ (Taurus)
आजच्या वृषभ राशीनुसार गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त काळ आहे, लाभ घ्यावा. शक्यतो चुका करणे टाळा मोठी मानहानी होऊ शकते. तुम्हाला तुमच्या सवयींमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि मुलांशी संबंधित समस्या असतील. वडिलांच्या प्रकृतीची चिंता राहील आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.
राशिभविष्य आजचं 25 जुलै मिथुन (Gemini)
आजच्या मिथुन राशीनुसार शत्रूंवर विजय मिळवता येईल. हाती घेतलेले कार्य सफल होईल. अडलेली कामे मार्गी लागतील, कार्यात यश मिळेल. तुमच्या बोलण्यात गोडवा आणा, बोलण्यापूर्वी विचार करा. तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल.
राशिभविष्य आजचं 25 जुलै कर्क (Cancer)
कर्क आजच्या राशीनुसार नोकरी व्यवसायात अनुकूलता लाभेल, कार्य यशस्वी होईल. कुटुंबात शुभ कार्ये आखली जातील. विवाहासाठी अनुकूल काळ आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल. आर्थिक गुंतवणूक लाभदायक होईल. न्यायालयीन बाजू भक्कम असेल. स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळेल. वरिष्ठ खुश असतील.
हे देखील वाचा: take care : पावसाळ्यात वाहने चालवताना या 6 गोष्टींची काळजी घ्या; अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा, सतर्क राहा
राशिभविष्य आजचं 25 जुलै सिंह (Leo)
सिंह आजच्या राशीनुसार, आरोग्याबद्दलचे प्रश्न वाढू शकतात. पथ्यपाणी पाळा. तुमच्या सवयींमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. मित्रांच्या माध्यमातून प्रलंबित कामे पूर्ण होतील; प्रेम प्रकरणात अपमानित व्हावे लागेल. आर्थिक लाभ मिळेल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल, मौल्यवान वस्तूंचा लाभ.
राशिभविष्य आजचं 25 जुलै कन्या (Virgo)
आजच्या कन्या राशीनुसार संमिश्र दिवस असेल. तुमच्या गोड बोलण्याने लोक प्रभावित होतील. तुमच्या घर आणि जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये गती येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आपल्याला पेलणारीच कामे हाती घ्या, अन्यथा मानसिक त्रास होईल.
राशिभविष्य आजचं 25 जुलै तुळ (Libra)
आजच्या तुळ राशिनुसार उत्तम मेजवानीचा लाभ होईल. इच्छा पूर्ण होईल. संयमी राहा. कोणाशीही बोलण्यापूर्वी विचार करा. वडिलांच्या तब्येतीची चिंता राहील. जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील, कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो.
हे देखील वाचा: Herbal Zone : गुळवेलच्या पानांचे औषधी गुणधर्म; गुळवेलच्या वापराचे 4 फायदे / benefits जाणून घ्या
राशिभविष्य आजचं 25 जुलै वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक आजच्या राशीनुसार, नोकरीत नवीन संधी लाभतील. नवीन प्रेरणा मिळेल. जवळील व्यक्तीकडून धोका संभवतो. सावध राहून कामे करा. वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलांशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही चिंतेपासून मुक्त व्हाल.
राशिभविष्य आजचं 25 जुलै धनु (Sagittarius)
आजच्या धनु राशीनुसार मनाप्रमाणे कामे होतील. परंतु संयम बाळगा, अति घाई करू नका. तुमच्या वागण्याने लोक प्रभावित होतील. कोणाचेही नुकसान करण्याचा विचार करू नका. कुटुंबातील हालचालींवर लक्ष ठेवा, अंदाज खरे ठरतील. तरुणांसाठी काळ चांगला आहे, त्यांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल.
राशिभविष्य आजचं 25 जुलै मकर (Capricorn)
आजच्या मकर राशीनुसार, मानापमानाच्या प्रसंग, त्याच त्याच चुका पुन्हा करू नका. करत असलेल्या अभ्यासाला महत्त्व द्या, भौतिक गोष्टीत रमू नका. दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील, लोक तुमच्या वागणुकीला दाद देतील. व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वेळ योग्य आहे.
राशिभविष्य आजचं 25 जुलै कुंभ (Aquarius)
मंगळवारच्या राशीभविष्यानुसार कनिष्ठ वर्ग व संततीकडून चांगली बातमी मिळेल. दैनंदिन व्यवहारात बदल होईल. आरोग्यात लाभ होतील, मुलांच्या वागण्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. प्रवासाची शक्यता आहे. वादविवाद टाळा, गोड बोलून कामे करून घ्या. हिताचे ठरेल.
राशिभविष्य आजचं 25 जुलै मीन (Pisces)
मीन राशीनुसार आज खूप काम असेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, धावपळ होईल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे, धार्मिक कार्यात वेळ जाईल. वाहन आणि जमिनीशी संबंधित कामे पूर्ण होतील, मुलांच्या लग्नाची चिंता राहील. कुटुंबातील अडचणी दूर होतील, आर्थिक संकटावर मात कराल.