राशिभविष्य

मंगळ ग्रहाने शुक्रवारी आपली राशी बदलल्याने सर्व राशींवर परिणाम

राशिभविष्य आजचं 13 जुलै 2024: आज वार शनिवार दि. १३ जुलै २०२४ आषाढ शुक्ल सप्तमी १९४६ नक्षत्र: हस्त चंद्ररास: कन्या सूर्योदय: ६ वाजून १० मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून ६ मिनिटांनी. सर्वसाधारण दिवस. दिवस राहू काल: सकाळी १०:३० ते दुपारी १२:०० वीर शिवा काशीद स्मृतिदिन. मंगळ ग्रहाने शुक्रवारी आपली राशी बदलली आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होईल.

आजचे राशिभविष्य दर्शवते की 13 जुलै रोजी मेष, वृषभ राशीसह 7 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. इतरांनी देखील आजच्या राशीभविष्यात तुमचे भविष्य जाणून घ्या… (Today’s Horoscope 13 July)

राशिभविष्य आजचं 13 जुलै मेष (Aries)

13 जुलै आजच्या मेष राशीनुसार, बोलण्यापूर्वी विचार करा. आज तुम्हाला दु:खद बातमी मिळू शकते. व्यवसायात विवेकाने काम करा, नफा मिळेल. थोडेसे प्रयत्न केल्यास जास्त फायदा होईल. मुलांची चिंता राहील. शक्यतो कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका, फेडण्याचा प्रयत्न करा.

राशिभविष्य आजचं 13 जुलै वृषभ (Taurus)

आजच्या राशीनुसार 13 जुलै, वृषभ राशीच्या लोकांनी शनिवारी कमी बोलावे आणि चांगले बोलावे. आज अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक चिंतेमुळे तणाव राहील. वैयक्तिक कामात जास्त गर्दी होईल. गुंतवणूक शुभ राहील. एखादी सहल होऊ शकते.व्यवसाय विस्तारासाठी नवीन भागीदाराची साथ लाभेल.

राशिभविष्य आजचं 13 जुलै मिथुन (Gemini)

मिथुन आजच्या राशीनुसार शनिवारी अनुकूल काळ जाणवेल. जुनाट व्याधी अथवा प्रकरण यामुळे त्रास वाढेल. मोठ्या व्यवहारांसाठी वेळ शुभ आहे. प्रॉपर्टीच्या कामात फायदा होईल, आर्थिक फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. विवाहासाठी पात्र लोकांसाठी वेळ अनुकूल आहे.

राशिभविष्य आजचं 13 जुलै कर्क (Cancer)

आजच्या कर्क राशीनुसार शनिवारी कर्क राशीचे लोक त्यांच्या आवडत्या भोजनाचा आस्वाद घेतील. मित्रांसोबत प्रवास होईल. नोकरीत केलेली मेहनत व्यर्थ ठरेल. तुमच्या निष्काळजीपणामुळे लाभाच्या संधी हुकतील. वैवाहिक जीवनातील प्रयत्न यशस्वी होतील. राजकारणी मित्रांपासून सावध आणि लांब राहा.

राशिभविष्य

राशिभविष्य आजचं 13 जुलै सिंह (Leo)

आजच्या सिंह राशिभविष्यनुसार, 13 जुलै रोजी सिंह राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला आळस जाणवेल. करिअरबाबत निर्णय घेण्यात संकोच राहील. पैसे सहज मिळतील. प्रवास यशस्वी होईल. कुटुंबासोबत वेळा घालवाल. मौजमजा कराल. न्यायालयीन बाजू भक्कम राहील.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 12 जुलै: कर्क, तूळ या राशींसाठी आर्थिक लाभ आणि प्रगती; इतरांनी देखील आजच्या राशीचे त्यांचे भविष्य जाणून घ्या

राशिभविष्य आजचं कन्या (Virgo) 13 जुलै

आजच्या कन्या राशीनुसार शनिवारी हाती घेतलेले काम . वरिष्ठांचा रोष पत्करावा लागेल. नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. वृद्धांना जुनाट आजारांचा त्रास होईल. मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा.

राशिभविष्य आजचं तूळ (Libra) 13 जुलै

आजच्या तूळ राशीनुसार शनिवारी नवीन व्यवसाय योजना बनतील. कामकाजात सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारी मदत मिळेल. प्रगती होईल. प्रियजनांशी मतभेद होऊ शकतात. आधी केलेल्या चुकांचा आता पश्चाताप अथवा त्रास होऊ शकतो.

राशिभविष्य

राशिभविष्य आजचं वृश्चिक (Scorpio) 13 जुलै

शनिवारच्या राशीभविष्यानुसार 13 जुलैला तुमची जबाबदारी समजून घ्या. तुम्हाला घरगुती आनंद मिळेल. आज आर्थिक लाभ होईल. व्यावसायिक प्रतिस्पर्धी शांत राहतील. मन प्रसन्न राहील. अति आळसामुळे कामात विलंब होईल. मुलांच्या विवाहासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपली कामे प्रामाणिकपणे करत राहा, वाद टाळा.

 आजचं धनु (Sagittarius) 13 जुलै

शनिवारच्या राशीनुसार धनु राशीचे लोक आपल्या बोलण्याने लोकांची मने जिंकतील. मुलांसाठी काळ अनुकूल आहे. लाभाच्या संधी येतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. नातेवाईकांसोबत पार्टी-पिकनिकचा आनंद घ्याल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, शीत खाद्यपदार्थ टाळा.

हे देखील वाचा: Oppo AI phone: ओप्पो इंडिया लॉन्च करत आहे रेनो 12 5जी सिरीज; भारतात 18 जुलैपासून विक्रीला उपलब्ध

राशिभविष्य आजचं मकर (Capricorn) 13 जुलै

मकर राशीनुसार शनिवारी म्हणजेच आजचा दिवस वरिष्ठांच्या सेवेत जाईल. मानसिक समाधान लाभेल. प्रेमप्रकरणात अनुकूल परिस्थिती राहील. आज केलेला प्रवास आणि गुंतवणूक यशस्वी होईल. पैसे मिळवणे सोपे होईल, जोखीम घेऊ नका. व्यवसाय विस्तारासाठी पैसे गोळा कराल.

राशिभविष्य आजचं कुंभ (Aquarius) 13 जुलै

कुंभ राशीनुसार, इच्छा नसतानाही अनावश्यक खर्च वाढतील. किरकोळ दुखापत, वाद इत्यादीमुळे नुकसान संभवते. वाईट संगत कष्टदायक असेल, जोखीम घेऊ नका. तीर्थयात्रा संभवते. सरकार दरबारी मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील., अडचणी दूर होतील. आपल्या कुटुंबाबद्दल जागरूक रहा.

राशिभविष्य

राशिभविष्य आजचं मीन (Pisces) 13 जुलै

मीन राशीनुसार आज केलेली गुंतवणूक शुभ राहील. मनाप्रमाणे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. नातेवाईकांसोबत पार्टी आणि पिकनिकचा आनंद घ्याल. अतिरिक्त काम होईल. खोटे बोलणे टाळा. आईची तब्येत बिघडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !