महिलेने मुलासह आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त
आयर्विन टाइम्स / नाशिक
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील एका विवाहितेने आपल्या चार वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा: murder news: अनैतिक संबंधातून महिलेचा खून: संशयित 28 वर्षीय तरुणानेही घेतला गळफास
जावयाचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा आरोप
दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील अश्विनी समाधान ढगे (२३) या विवाहितेने आपला चार वर्षांचा मुलगा रियांश समाधान ढगे (४) याच्यासह विहिरीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत अश्विनी हिचे वडील परशराम आबाजी पाटील (रा. निळवंडी, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, जावई समाधान ढगे याचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्याला अश्विनी विरोध करत होती. या कारणावरून तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावे यासाठी सासू व नवरा यांच्याकडून अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता.
सासरच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद
त्यामुळे सासरच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद अश्विनीचे वडील परसराम पाटील यांनी दिली आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती समाधान भिकाजी ढगे व सासू लिलाबाई भिकाजी ढगे (रा. रासेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहेत.
सासू व पती यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल
सासरच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद अश्विनीचे वडील परसराम पाटील यांनी दिली आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती समाधान भिकाजी ढगे व सासू लिलाबाई भिकाजी ढगे (रा. रासेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहेत.