मिरज

इशरत बारगीर यांचे मिरज शहरात गंभीर गुन्हे

आयर्विन टाइम्स / मिरज
सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्र बाळगणे, घातक शस्त्रानिशी खुनाचा प्रयत्न करणे, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून महिलेचा विनयभंग करून गंभीर दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इशरत ऊर्फ इशरत अली इरफान बारगीर (वय २५, मिरज) याच्यावर एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम कायद्यान्वये एक वर्षासाठी ही कारवाई केली. सराईत गुन्हेगार इशरत बारगीर याने २०२० ते २०२४ मध्ये आपली दहशत राहावी म्हणून मिरज शहरात गंभीर गुन्हे केले आहेत.

प्रस्तावाची सविस्तर चौकशी करून सराईत गुन्हेगार इशरत बारगीर याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगार बारगीर याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

हे देखील वाचा: Jat Crime : जत तालुक्यातील डफळापूर येथील ज्वेलर्स चे दुकान फोडून 10 किलो चांदीची चोरी : रेकी करून दुकान फोडले ; ५ लाखाचा मुद्देमाल लंपास

विटा येथील ज्वेलर्समधून तीन लाख चोरणारे पती, पत्नी गजाआड प्रकार : चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त

विटा येथील आरती ज्वेलर्समधून रोख तीन लाख रुपये चोरून नेणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी गजाआड केले. विश्वास हणमंत गुजर (वय ३३) व पूजा विश्वास गुजर (वय २६, दोघे सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत बाळासाहेब ज्ञानू रावताळे (विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली होती. दरम्यान, संशयित पती, पत्नीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख १ लाख ५५ हजार रुपये, ९० हजारांची चारचाकी व ७० हजारांची दुचाकी असा ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे विश्वास गुजर पूजा गुजर पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.

विटा येथील सराफ पेठेत रावताळे यांचे आरती ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. ५ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास ज्वेलर्स मधील ड्राव्हरमधील तीन लाख रुपये अनोळखीने चोरून नेले होते. तशी फिर्याद रावताळे यांनी दिली होती. अनोळखी चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हे देखील वाचा: End of financial problems / राशिभविष्य आजचं 16 जुलै: मेष, वृषभ राशीसह 5 राशींच्या आर्थिक समस्यांचा अंत; तुमच्या व्यवसायातील प्रगती जाणून घ्या आजच्या राशिभविष्यातून

चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार प्रमोद साखरपे, महेश संकपाळ व अक्षय जगदाळे यांना खबऱ्याद्वारे ही चोरी विश्वास गुजर व पूजा गुजर यांनी केल्याची माहिती मिळाली. या दोघांना सातारा येथून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना विटा पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून रोख रकम व चारचाकी, दुचाकी जप्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार उत्तम माळी तपास करत आहेत.

मिरज

पिस्तूल रोखल्याप्रकरणी दोघे ताब्यात; वाघमोडेनगरमध्ये प्रकार : पिस्तूलसह दोन दुचाकी, चार एडके जप्त

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारण्याच्या हेतूने वाघमोडेनगरला एकावर पिस्तूल रोखल्याप्रकरणी आणखी दोघांना कुपवाड पोलिसांनी केलेल्या तपासांतर्गत ताब्यात घेऊन अटक केली. किरण शंकर लोखंडे (वय २३ वाघमोडेनगर, कुपवाड) व सोन्याबापू हरी एडगे (वय २८, बामणोली ता. मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.

आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी संशयितांकडून एक पिस्तूल, दोन दुचाकी, चार एडके जप्त केले. गुन्ह्यातील अल्पवयीन वगळता संशयितांची संख्या एकूण सहा झाली आहे. त्या सर्वांना आज न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. १८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी (ता. ८) रात्री वाघमोडेनगर, मायाक्कादेवी मंदिराच्या लगत वाढदिवसाच्या समारंभात सागर राजाराम माने (वय ३५, राजारामबापू हौसिंग सोसायटी औद्योगिक वसाहत, मिरज ता. मिरज) यांच्यावर एकाने पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. पिस्तुलातून गोळी सुटली नसल्याने ते बचावले. घडलेल्या प्रकाराची फिर्याद त्यांनी कुपवाड पोलिसांत दिली. पोलिसांनी तीन दिवसात संशयितांचा छडा लावला.
शुक्रवारी (ता. १२) पाच संशयितांना अटक आष्टा (ता. वाळवा) येथून अटक करण्यात आली.

संदेश रामचंद्र घागरे (वय २१), किरण दादासाहेब कोडीगिरे (वय २०), अनिकेत दत्ता कदम (वय २० सर्वजण वाघमोडेनगर), प्रतीक शिवाजी कोळेकर ( वय १९, रा. शरदनगर, कुपवाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे होती. त्यांच्या व्यतिरिक्त या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचा समावेश आढळून आला. वरील संशयितांना आज न्यायालयामध्ये हजर केले असता गुरुवारपर्यंत (ता. १८) न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed