खून केल्याच्या घटनेनंतर तरुणाने गावाकडे जाऊन घेतला गळफास
आयर्विन टाइम्स / नांदेड
नांदेड शहरातील महिलेचा शनिवारी (ता. ३१) सकाळी सतीश आलेवार २८ वर्षीय तरुणाने अनैतिक संबंधातून खून केला. खुनाच्या घटनेनंतर त्याने गावाकडे जाऊन आत्महत्या केली. सदर महिला तरुणाची आर्थिक पिळवणूक करत होती. याच रागातून त्याने खून केला, अशी माहिती समोर आली आहे.
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील सतीश रामराव आलेवार (वय २८) नांदेड शहरातील रक्तपेढीमध्ये कामाला होता. तेथील विवाहित महिलेसोबत त्याचे संबंध होते. प्रेमप्रकरणातून दोघे पळूनही गेले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी बैठक घेऊन प्रकरण मिटविले. मात्र, आर्थिक व्यवहारातून दोघांत वाद होता. त्यामुळे तणावात असलेल्या सतीशने शनिवारी पहाटे महिलेचे घर गाठले.
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील सतीष रामराव आलेवाड हा नांदेड शहरातील एका खाजगी रक्तपेढी मध्ये कामाला होता. याच ठिकाणी नोकरी करणाऱ्या विवाहित महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. त्या विवाहित महिलेला दोन मुली आहेत. काही वर्ष त्यांचा काळ आनंदात गेला, पण नंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. दोघात नेहमी वाद होतं होते. शनिवारी पहाटे सतीष हा गावाकडून नांदेड शहराकडे आला.
महिला घरकामात असताना सतीशने तिच्यावर चाकूहल्ला केला. आरडाओरड होत असल्याने महिलेचा पती आणि मुलगी धावत आली. तोपर्यंत सतीशने दुचाकीवरून पळ काढला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती वजिराबाद पोलिसांना दिली. वजिराबाद पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोचले. तोपर्यंत महिला गतप्राण झाली होती. सतीशच्या मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी पाठलाग केला.
पोलिस लालवंडी गावात पोचण्याआधीच त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सतीशचा पाठलाग करणारे वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वाटाणे यांनी नायगाव पोलिसांना दिली.
मित्राला दिली माहिती
रागाच्या भरात असलेल्या सतीशने मित्राला फोन करून ‘मी तिचा खून केला. आता मी आत्महत्या करणार’, असे कळवले होते. त्यानंतर फोन बंद केला. काही वेळाने तो शेतात गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला.