महाराष्ट्र मंत्रिमंडळ

महाराष्ट्र मंत्रिमंडळ: शिवसेनेकडील राज्य उत्पादन शुल्क हे महत्वाचे खातेदेखील अजित पवार यांच्याकडे

मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
महायुतीचे सरकार स्थापन होऊन आठ दिवस उलटल्यानंतर शनिवारी (ता. २१) हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच महाराष्ट्र मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर करण्यात आले. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम तर अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालय देण्यात आले आहे. शिवसेनेकडे मागील वेळेस असलेले राज्य उत्पादन शुल्क विभाग यावेळेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ

राज्यात महायुतीला भरघोस जागा मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे महाराष्ट्रसह संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. त्यातच गृह मंत्रालयासाठी एकनाथ शिंदे अडून बसल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जाऊन आल्यानंतर खाते वाटप कधी होणार याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याची कामगिरी: अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक; 5 दुचाकी जप्त

अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजताच रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सायंकाळपर्यंत महाराष्ट्र राज्याचे खाते वाटप जाहीर केले जाईल, असे पत्रकारांना सांगितले होते. त्यानुसार सायंकाळी खाते वाटप जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते स्वतःकडेच ठेवले असून, एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती देण्यात आली आहेत. तर मागील मंत्रिमंडळात वित्त मंत्रालय अजित पवार यांनी सांभाळले होते. यावेळीही हे खाते त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय मागील महाराष्ट्र सरकारमधील शिंदेंच्या शिवसेनेकडील राज्य उत्पादन शुल्क हे महत्वाचे खातेही अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ

महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारचे खाते वाटप पुढीलप्रमाणे:

कॅबिनेट मंत्री:
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल (महाराष्ट्र)
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

हे देखील वाचा: kadegaon crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कौतुकास्पद कामगिरी: वयोवृद्ध इसमास बांधून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या: पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

महाराष्ट्र मंत्रिमंडळ
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

हे देखील वाचा: jat accident news: जतजवळ दुचाकी- कारची जोरदार धडक: 2 जण जागीच ठार; मयत सांगोला तालुक्यातील महीम गावचे

महाराष्ट्र राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !