महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात घडामोडींना आला वेग
आयर्विन टाइम्स / मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. गुरुवारी (दि. १८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या पक्षाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत १०० जागा लढण्याची तयारी करण्यासाठी १०० विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहे, त्याचबरोबर प्रभारीदेखील नेमल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करतील. त्याचबरोबर एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आणि निवडणुकीची तयारी करतील, असे आदेशदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीवेळी दिल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. मनोरमा खेडकर यांना रायगडमधून अटक; पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना दमदाटी भोवली
आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. अखेर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती लॉज येथून त्यांना साडेपाच वाजता ताब्यात घेण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
दिलीप खेडकर अद्यापही फरार मनोरमा खेडकर यांच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांची तीन पथके त्यांचा शोध घेत होती. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील हिरकरणवाडीमधील पार्वती लॉजमध्ये त्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. तिथून त्यांना पुण्यात नेण्यात येत आहे. रायगड पोलिसांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर अद्यापही फरार आहेत.
दरम्यान, मनोरमा खेडकर यांनी स्वसंरक्षणासाठी पिस्तूल बाहेर काढले होते, त्यांनी पिस्तूल कुणावरही रोखून धरलेले नाही, असा बचाव दिलीप खेडकर यांनी केला. ते म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणात जरी गुन्हा दाखल केला असेल तरी त्यांना शेतकऱ्यांनी जी माहिती दिली, तीच जबाबात घ्यावी लागली. पण तपासाअंती सत्य समोर येईल. सदर पिस्तुलाचा परवाना मनोरमा यांच्या नावावरच आहे. त्यांनी स्वसंरक्षणासाठी ते पिस्तूल घेतले होते. त्यांनी पिस्तूल दाखवले असेल तरी त्यांनी ते कुणावरही रोखलेले नाही. फक्त स्वसंरक्षणासाठी ते हातात ठेवले होते.
मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली; सोलापूरमधून प्रारंभ तर नाशिकला होणार समारोप ; जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आमरण उपोषणाच्या १७ दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असून, जगलोच तर अठराव्या दिवशी तसाच अॅम्बुलन्समधून शांतता रॅलीत सहभागी होईन, असं मनोज जरांगे म्हणाले. सरकार जर १७ दिवस मरण्याची वाट बघत असेल तर हे सरकारच असू शकत नाही, असं म्हणत मनोज जरांगे म्हणाले.
आमरण उपोषण आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली करण्याचं जाहीर केलं. २० तारखेला यांचे २८८ आमदार पाडायचे की ठेवायचे हे ठरवणार असल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आरक्षणाची मागणी घेऊन पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ७ ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, सोलापूरपासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यानंतर सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, नाशिकमध्ये रॅलीचा समारोप होणार आहे.
मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्याची १३ जुलैची मुदत संपली आहे. यानंतर २० जुलैपासून आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. या मागणीसाठी आता ते पश्चिम महाराष्ट्रात दौरा करणार असून, आमरण उपोषण जाणार आहेत. याचदरम्यान, आणि शांतता रॅलीत १७ दिवसांचे अंतर असल्याचे त्यांनी सांगितले. दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आपल्या जातीसाठी आणि लेकरासाठी मराठ्यांना एकत्र यायचं आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी
आगामी निवडणुकांचे सर्व राजकीय पक्षाला वेध लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्भव ठाकरे यांच्या पक्षाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. शरद पवार यांच्या मागणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं होतं. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह स्वीकारावं लागलं. तसेच त्यांना पक्षाचं नावही बदलावं लागलं होतं.