भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली
Well done भारत जगज्जेता : बारबाडोज : भारताने अखेर तब्बल १६ वर्षांनंतर टी-२० विश्वषचकावर आपले नाव कोरले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी (दि. २९) रंगलेला टी-२० विश्वचषकातील अंतिम सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरला. १७७ धावांचे आव्हान पेलताना आफ्रिकेची झुंज अपयशी ठरली. ८ धावांनी आफ्रिकेचा पराभव करत भारताने जगज्जेता होण्याचा बहुमान पटकावला आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे रोहित शर्माच्या संघावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान विराट कोहलीने या विश्वचषकातील शेवटच्या सामन्यानंतर आपली टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माचादेखील हा शेवटचा सामना असेल असे सांगण्यात येत आहे. T20 आंतरराष्ट्रीयला निरोप देताना त्याने रोहित शर्माला मिठी मारली. तो अत्यंत भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
प्रारंभी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यात आफिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फटकेबाजी करत गतीने डावाला सुरुवात केली. मात्र, रोहित शर्मा (९), ऋषभ पंत (०) आणि सूर्यकुमार यादव (३) यांना लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. तर विराट कोहली (७६), अक्षर पटेल (४७) यांनी डाव सावरत भारताला १७६ धावांपर्यंत पोहोचविले. तर आफ्रिकेने २० षटकांत १७७ धावांचा पाठलाग करताना ८ गडी गमावत १६९ धावा केल्या.
विराट कोहलीचं संयमी अर्धशतक, अक्षर पटेल, शिवम दुबेच्या झंझावाती खेळीच्या बळावर टीम इंडियाने २० षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात १७६ धावांचा पाऊस पाडला. शिवम दुबे यानेही निर्णायक २७ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर विराट कोहलीने ७६ धावांची खेळी करत भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीला लागोपाठ विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली.
त्यानं एकेरी दुहेरी धावसंख्या काढत डावाला आकार दिला. अक्षर पटेल याच्यासोबत आधी निर्णायक ७२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात शिवम दुबे याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. अर्धशतक ठोकण्यासाठी विराट कोहलीने ४८ चेंडू घेतले, पण त्यानंतर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने ५९ चेंडूमध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ४६ धावा चोपल्या. अष्टपैलू अक्षर पटेल यानं निर्णायक फलंदाजी करत टीम इंडियाचा डावाला आकार दिला.
भारताला ३४ धावांवर तीन धक्के बसले
T20 सामन्यात भारताला ३४ धावांवर तीन धक्के बसले होते. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव एकापाठोपाठ एक तंबूत परतले होते. भारताची फलंदाजी ढेपाळली होती. पण विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी शानदार फलंदाजी करत डावाला आकार दिला. विराट कोहलीने अनुभव पणाला लावत एक बाजू लावून धरली. शिवम दुबे यानं अखेरीस वादळी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. त्यानं १६ चेंडूमध्ये २७ धावांचा इम्पॅक्ट पाडला. दुबेच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने १७५ धावसंख्या पार केला. रवींद्र जाडेजा २ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्या पाच धावांवर नाबाद राहिला.
भारताच्या विराट कोहलीची T20 मधून निवृत्ती
२९ जूनचा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा संस्मरणीय ठरला. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून 16 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी आणि 13 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. मात्र, या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक तारा क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमधून कायमचा बाजूला झाला. या सामन्यात ७६ धावांची अनमोल खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीने जेतेपद पटकावल्यानंतर टी-२० विश्वचषकातून निवृत्ती घेतली. हा त्याचा शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामनाही होता.
विराट कोहली झाला भावूक
सामनावीराचा किताब जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “हा माझा शेवटचा T20 विश्वचषक होता, आम्हाला हेच साध्य करायचे होते. आणि आम्ही ते केले. एके दिवशी तुम्हाला वाटते की तुम्ही धावा करू शकत नाही आणि असे कधी ना कधी घडते, देव महान आहे. भारतासाठी हा माझा शेवटचा टी-२० सामना होता. आम्हाला तो कप जिंकायचा होता. पराभूत झाल्यावर मी निवृत्ती जाहीर करणार नव्हतो असे नाही.
हे देखील वाचा: सांगली बातम्या: घरफोडी चोरी करण्याऱ्या आरोपीस अटक; 2 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
मात्र हा सामना ऐतिहासिक ठरला. आता पुढच्या पिढीने T20 खेळ पुढे नेण्याची वेळ आली आहे. आयसीसी टूर्नामेंट जिंकण्यासाठी आम्हाला खूप प्रतीक्षा आहे. तो म्हणाला, रोहितसारख्या खेळाडूकडे पहा, तो 9 टी-20 विश्वचषक खेळला आहे आणि हा माझा सहावा आहे. खरोखरच तो त्यास पात्र आहे.
विराट कोहलीचा T20 विक्रम
2010 मध्ये विराट कोहलीने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 4112 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये कोहलीच्या नावावर एक शतक आणि 37 अर्धशतके आहेत. या कालावधीत कोहली 31 वेळा नाबाद राहिला आहे. टी-20 मध्ये त्याची सरासरी 48.22 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 4 विकेट्सही घेतल्या आहेत.