प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा

जत तालुक्यातील शेगाव येथील प्रगतशील शेतकरी तानाजी बोराडे यांनी २ एकरात व्ही.एन.आर. जातीच्या पेरूची लागवड करून वर्षाला ३० टन उत्पादन व २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या मेहनतीला पत्नी डॉ. रंजना बोराडे यांचे सहकार्य लाभले आहे. देशभरात पेरूंना चांगली मागणी असून त्यांनी युवकांना आधुनिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे.

प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा

जत, (आयर्विन टाइम्स / श्रीकृष्ण पाटील):
जत तालुक्यातील शेगाव येथील प्रगतशील शेतकरी तानाजी दिगंबर बोराडे यांनी त्यांच्या दोन एकर पेरूच्या बागेतून दरवर्षी वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून शेतीतील यशस्वी उदाहरण घालून दिले आहे. तानाजी बोराडे यांची शेतीतली आवड वडिलांकडून प्रेरित असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अभ्यास करून ही कामगिरी साधली आहे.

शेतीची सुरुवात आणि पेरूची लागवड
तानाजी बोराडे यांनी आपल्या २० एकर बागायत शेतीपैकी २ एकरात छत्तीसगड येथून व्ही.एन.आर. जातीच्या पेरूची ८०० रोपे प्रति रोप २०० रुपयांना विकत घेऊन लागवड केली. त्यांनी वर्षातून दोन वेळा या पेरूची फळे काढली असून वर्षाला ३० टन पेरू उत्पादन घेतात.

हे देखील वाचा: Banana Flower: A Nutritious Healthy Food/ केळीचे फूल: पोषणतत्त्वांनी भरलेले आरोग्यदायी अन्न; 5 औषधी उपयोग आणि उपचारात्मक फायदे

उत्पादन आणि दरातील बदल
उत्पादनाला देशभरात मोठी मागणी असल्याने सुरुवातीला पेरूंना प्रति किलो १३० रुपये असा उच्च दर मिळाला. मागणीनुसार भाव कमी-जास्त होत राहिला असून सध्याचा दर ५५-६० रुपये प्रति किलो आहे.

प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा

यशस्वी व्यवस्थापनामागील योगदान
तानाजी बोराडे यांना त्यांच्या पत्नी डाॅ. सौ. रंजना बोराडे यांचे सहकार्य मिळते. मुंबईत लॅब चालवणाऱ्या सौ. बोराडे गावी आल्यानंतर बागेच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतात.

हे देखील वाचा: काय सांगता काय ! 23 कोटींचा ‘अनमोल’ रेडा: 10 कोटींचा गोलू 2 आणि विधायकची किंमत 9 कोटी; ऐकावे ते नवलच!…

युवकांसाठी प्रेरणा
तानाजी बोराडे यांनी शेतीतून मिळवलेल्या या यशामुळे युवकांना संदेश दिला आहे की, “वडिलोपार्जित जमिनीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्ही.एन.आर. जातीच्या पेरूसारख्या फळपिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवता येते.”

शेतीतून समृद्धीचा मार्ग
तानाजी बोराडे यांचे उदाहरण आधुनिक व नियोजनबद्ध शेतीच्या यशस्वीतेचे द्योतक आहे. त्यांच्या मेहनती व नव्या प्रयोगशील दृष्टिकोनातून शेतीत प्रगती साधता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

शेतीतील यशोगाथा वाचून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी आणि पेरूच्या लागवडीसारख्या यशस्वी पिकांना प्रोत्साहन मिळावे, हीच तानाजी बोराडे यांच्या कष्टाला खरी सलामी ठरेल. स्वतः तानाजी बोराडे यांनादेखील आजच्या तरुण पिढीने आधुनिक शेतीकडे वळावे असे वाटते. (Success story of a progressive farmer)

हे देखील वाचा: Full guidance: चिया बियांची (chia seeds) शेती कशी करावी? संपूर्ण मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *