पोटगी

वडिलांनी केला होता पोटगीसाठी चार मुलांविरुद्ध वैजापूर न्यायालयात अर्ज

आयर्विन टाइम्स / छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नांदी येथील वृद्ध निवृत्ती रावजी तनपुरे (वय ७२) यांना त्यांच्या चार मुलांनी दरमहा चाळीस हजार रुपये पोटगी म्हणून द्यावे, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. मिसाळ यांनी गुरुवारी (ता. ५) दिले. निवृत्ती तनपुरे यांनी त्यांच्या चार मुलांविरुद्ध वैजापूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

हे देखील वाचा: Shocking : बलात्कार होत असताना लोक व्हिडिओ बनवण्यात मग्न; मध्य प्रदेशातील उज्जैनची धक्कादायक घटना

पोटगी

अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला, ज्यामुळे निवृत्ती तनपुरे यांना दिलासा मिळाला आहे. निवृत्ती तनपुरे यांची नांदी शिवारात वडिलोपार्जित बारा एकर शेतजमीन आहे, जिथे त्यांनी दोन विहिरी खोदून आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते एकाकी जीवन जगत होते. त्यांनी चारही मुलांना प्रत्येकी तीन एकर जमीन देऊन विभक्त केले होते. मात्र आता ते वृद्ध असल्याने काम करण्यास असमर्थ आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाचे कोणतेही साधन उरलेले नाही.

हे देखील वाचा: surprising : काय म्हणता! रक्तातील पेशींची वाढ करण्यासाठी पेरू हे किवीपेक्षा अधिक प्रभावी? काय कारण आहे जाणून घ्या; महागड्या किवीपेक्षा स्वस्तातल्या पेरूचा आहारात समावेश करा

वयोवृद्ध असूनही चारही मुले त्यांच्या काळजी घेण्यास अपयशी ठरली. त्यांना वेळेवर जेवण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांची देखील व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप निवृत्ती तनपुरे यांनी आपल्या अर्जात केला. हा अर्ज १२५ फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत पोटगीसाठी दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने याप्रकरणी नोटीस दिल्यानंतरही संबंधित चार मुले अनुपस्थित राहिल्यामुळे, सुनावणी त्यांच्याशिवाय झाली. या वेळी अर्जदाराच्या वकिलांनी त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला.

हे देखील वाचा: crime news : सांगली जिल्ह्यातील 25 वर्षीय युवतीवर जबरदस्तीने नेऊन बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !