ऑलिंपिक स्पर्धेत यावेळी किमान १० पदकांचे लक्ष्य
आयर्विन टाइम्स
गेल्या काही ऑलिंपिक स्पर्धांतून लक्षवेध प्रगती करत असलेल्या भारतीयांकडून या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतही मोठ्या अपेक्षा आहे. आतापर्यंत कधीही न मिळालेली दोन अंकी पदके यावेळी मिळवण्यासाठी आशा उंचावल्या आहेत. गत टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत एका सुवर्णासह पाच पदके भारताला मिळाली होती. यावेळी किमान १० पदकांचे लक्ष्य बाळगले आहे. या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे ११७ खेळाडू सहभागी होत आहेत. यातील अर्ध्याहून अधिक खेळाडू मिळून अॅथलेटिक्स (२९), नेमबाजी (२१) आणि हॉकी (१९) खेळातील आहेत. या तीन खेळांतील मिळून ६९ खेळाडूंपैकी ४० जण प्रथमच ऑलिंपिकमध्ये खेळणार आहेत.
कुस्तीतील झालेल्या वादाचा अपवाद वगळता इतर सर्व खेळातील खेळाडूंनी देशात असो वा परदेशात जोरदार तयारी केली आहे. आता या मेहनतीचे रूपांतर पदकात करण्याची वेळ आली आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत कोण मिळवणार भारतासाठी पदके ? जाणून घ्या
नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू , रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा
नीरज चोप्रा : गत स्पर्धेतील सुवर्णपदक भालाफेकपटू चोप्राकडून विजेता नीरज यंदाही पदकाची सर्वाधिक अपेक्षा आहे. जागतिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरजला आतापर्यंत ९० मीटर लांब भाला फेकता आलेला नाही. या ऑलिंपिक स्पर्धेत त्याला ९० मीटरचे आव्हान मिळू शकते.
पी. व्ही. सिंधू : बॅडमिंटनची फुलराणी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या पी. व्ही. सिंधूकडे २०१६ रिओ आणि २०२१ टोकियो अशी दोन ऑलिंपिक पदके आहेत. त्यामुळे यंदाही तिच्याकडून पदकांची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत तिला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. काही पारंपरिक प्रतिस्पर्ध्याचा अडथळा तिला पार करता आलेला नाही; परंतु यावेळची ऑलिंपिक अपवाद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी : बॅडमिंटनच्या दुहेरीत रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी अव्वल स्थानावर राहिलेले आहेत. त्यांच्याकडे सुवर्णपदक मिळवण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडून पदकाची हमखास खात्री आहे.
हॉकी, नेमबाजी, कुस्ती आणि तिरंदाजीत आहेत अपेक्षा
हॉकी : गत स्पर्धेत ब्राँझपदक मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाकडून यंदाही अपेक्षा आहे. मात्र, गटातील स्पर्धेत त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल. विशेष म्हणजे, पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात यश मिळवावे लागेल.
नेमबाजी : यंदा प्रथमच नेमबाजीत २१ खेळाडू सहभागी होत आहेत. गत स्पर्धेत नेमबाजांनी अपेक्षाभंग केला होता. यावेळी चित्र बदलू शकेल. मनू भाकर आणि सौरभ चौधरी, तसेच दिव्यांश पनावर आणि इलावेनील वलारिवन, स्किट प्रकारात कौर समरा आणि संदीप सिंग यांच्याकडूनही अपेक्षा आहेत.
कुस्ती : गेल्या चार ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती खेळातून भारताला सातत्याने पद मिळालेली आहेत. ही परंपरा यावेळी कायम राहण्याची अपेक्षा आहे; परंतु देशात कुस्तीच्या आखाड्याबाहेर झालेल्या वादाचा परिणाम राष्ट्रीय सराव शिबिर न होण्यावर झाला. यावेळी अंतिम पंघाल, अंशू मलिक यांच्याकडून अपेक्षा आहेत.
इतर : तिरंदाजीत अद्याप एकही पदक मिळालेले नाही; पण यावेळी अपेक्षा अधिक आहेत. टेबल टेनिस संघही आश्चर्याचा सुखद धक्का देऊ शकेल.
बॉक्सिंग : अनुभवी बॉक्सर निखत झरीन आणि निशांत देव पदक मिळवण्याच्या क्षमतेचे आहेत. निर्णायक लढतीत त्यांनी खेळ उंचावला की पदक निश्चित असेल.
दरम्यान तिरंदाजी खेळातील पात्रता फेरी गुरुवारी पार पडल्या. यात भारतीय तिरंदाजांनी पॅरिस ऑलिंपिकच्या पहिल्या दिवशी दमदार यश संपादन केले. ऑलिंपिकच्या इतिहासात पदकापासून दूर राहिलेल्या भारताला यंदा ऐतिहासिक पदक पटकावण्याची आशा निर्माण झाली आहे. महिला तिरंदाजांनी सुरुवातीला अंतिम आठ फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुरुषांनीही तेवढ्याच मोलाची कामगिरी करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
भारताच्या अंकिता भकत, दीपिकाकुमारी व भजन कौर या महिला तिरंदाजांनी मिळून १,९८३ गुणांची कमाई करीत चौथे स्थान पटकावले आणि महिलांच्या सांघिक प्रकाराची उपांत्यपूर्व फेरी गाठली. धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय व प्रवीण जाधव या भारतीय पुरुष खेळाडूंनी भारतीय महिला तिरंदाज संघ मिळून २०१३ गुणांची कमाई करीत तिसरे स्थान पटकावले आणि पुरुषांच्या सांघिक प्रकारात अंतिम आठ फेरीत घोडदौड केली.
आपल्या कारकिर्दीतील पहिलेच ऑलिंपिक खेळत असलेल्या अंकिता भकत हिने वैयक्तिक प्रकारात ११वे स्थान पटकावले. भारताकडून तिने केलेली कामगिरी सर्वोच्च ठरली हे विशेष. सर्वात अनुभवी खेळाडू दीपिकाकुमारी हिला ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकदा ठसा उमटवता आला नाही. तिला २३व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भजन कौर हिने २२वे स्थान मिळवले. महिला सांघिक विभागात पात्रता फेरीत सर्वोत्तम चार ठरलेल्या देशांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार आहे. यामुळे कोरिया, चीन, मेक्सिको व भारत या चारही देशांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
हे देखील वाचा: Herbal Zone : गुळवेलच्या पानांचे औषधी गुणधर्म; गुळवेलच्या वापराचे 4 फायदे / benefits जाणून घ्या
…तर उपांत्य फेरीत कोरियाशी लढत
भारतीय महिला संघासमोर उपांत्य फेरीत बलाढ्य कोरियाचे आव्हान असण्याची शक्यता आहे. फ्रान्स- नेदरलँड्स यांच्यामधील विजेत्याशी भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत लढेल. या लढतीत विजयी ठरल्यास भारताला कोरियाशी लढत द्यावी लागणार आहे.
धीरजची झेप
आंध्र प्रदेशचा २२ वर्षीय तिरंदाज धीरज बोम्मादेवरा याने पहिल्यावहिल्या ऑलिंपिकमध्ये देदीप्यमान कामगिरी केली. त्याने वैयक्तिक प्रकारात ६८१ गुणांची कमाई करीत चौथे स्थान मिळवले. प्रवीण जाधव ३९ व्या स्थानावर महाराष्ट्राच्या प्रवीण जाधव याला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही.