पुणे

Table of Contents

अल्पवयीन मुलीवर नात्यातील तिघांचा अत्याचार: चुलत भाऊ, चुलता आणि वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल; आईला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघडकीस

आयर्विन टाइम्स / पुणे

पुणे न्यूज: आधी चुलत भाऊ, नंतर चुलता आणि मग वडील अशा तिघांनी नात्याला काळीमा लावत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील मांजरी परिसरात ही घटना घडली असून, हा प्रकार जुलै २०२२ ते १० जून २०२४ या कालावधीत घडला आहे. पीडित मुलीने या संदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पिडीत १३ वर्ष १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिची आई, वडील, चुलते, चुलत भाऊ अशा एकत्र कुटुंबात मांजरी परिसरात राहायला आहे. कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त पुण्यात राहतात. जुलै २०२२ मध्ये चुलत भावाने राहत्या घरामध्ये तिला एकटे गाठले आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्रास झाल्याने तिने आरडाओरडा सुरू केला. स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. ती तिथून पळाली. त्याने तिला ही गोष्ट कोणाला सांगितल्यास ‘ठार मारून टाकीन’ अशी धमकी दिली होती.

हे देखील वाचा: जतमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीप्रकरणी चौकशी सुरू; आमदार विक्रम सावंत यांनी केली होती चौकशीची मागणी  

त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये एकेदिवशी रात्री तक्रारदार मुलगी घरात झोपलेली असताना चुलत्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेली असताना वडिलांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिने आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

भावाकडून सख्या बहिणीचा खून; अधिक तपासानंतर घटना उघडकीस; आत्महत्त्या भासवण्याचा झाला प्रयत्न

सख्ख्या बहिणीचा खून करून भावाने तिच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सतत ती आजारी असते, आणि आजारपणात ती आक्रमक होत असतं. त्यामुळे ती अंगावर देखील धाऊन जात होती. घटनेच्या दिवशी देखील असच झालं आणि भावाने तिचा गळा दाबून खून केला. ही घटना पुण्यातील हडपसरच्या वैदूवाडीत घडला आहे. साफिया सुलेमान अन्सारी (वय १६, रा वैदवाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तिचा भाऊ शारिख सुलेमान अन्सारी (वय १८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अन्सारी कुटूंबिय वैदुवाडीतील रिद्धी सिद्धी अपार्टमेंट येथे राहण्यास आहेत. दरम्यान, साफिया आजारी असायची. तिच्यावर उपचार सुरू होते. कुटूंबीय तिची काळजी देखील घेत होते. मात्र, तिच्यात काही फरक पडत नव्हता. घरात ती आक्रमक होत असे. कुटुंबामधील सदस्यांच्या अंगावर धावून जात होती. घटनेच्या दिवशी म्हणजेच १७ जून रोजी असाच प्रकार घडला. भाऊ शारीख घरी असताना साफिया त्याच्या अंगावर धाऊन गेली. तेव्हा दोघात झटापट झाली. त्यानंतर रागाच्या भरात शारीखने तिचा गळा दाबला. यात साफीयाचा मृत्यू झाला. आपल्या हातातून मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर शारीख घाबरला.

त्याने हा गुन्हा लपविण्यासाठी घाबरलेल्या अवस्थेत घरातच साफियाने गळफासाने आणि आत्महत्या केली, असे भासवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना घटनेची माहितीही दिली. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्याआधीच गळफास घेतलेल्या साफियाचा मृतदेह खाली काढण्यात आला होता. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली होती. पोलिसांनी संशयावरून सखोल चौकशी केली. तेव्हा शारिखने खून केल्याची कबूल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोडवे करीत आहेत.

बेदरकारपणाचा आणखी एक बळी; अपघातप्रकरणी खेडचे आमदार मोहितेंच्या पुतण्याला अटक

भरधाव फॉर्म्युनर मोटारीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना जुन्या पुणे– नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे घोडनदीच्या पुलाजवळ शनिवारी (ता. २२) रात्री घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते याला अटक केली आहे. न्यायालयाने मयूर मोहिते याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ओम ऊर्फ बंटी सुनील भालेराव (वय २०) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयूर मोहिते याला अटक करत त्याच्याविरुद्ध कलम ३०४ (२), ३३७ आणि ३३८ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यासह कल्याणीनगरमधील देशभरात पोर्शे मोटार अपघातात भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर एकलहरे येथे घडलेल्या घटनेमुळे नागरिक संतप्त होऊन मंचर पोलिस ठाण्यात गेले होते. आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जमाव तेथून निघून गेला. याप्रकरणी ओमचे चुलते नितीन भालेराव यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कळंब गावातून जुन्या रस्त्याने मंचरच्या दिशेने भरधाव फॉर्च्यूनर गाडी निघाली होती. पिकअपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात फॉर्च्यूनरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ओम रस्त्यापासून दहा ते बारा फूट फेकला गेला. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. जखमीला स्थानिक नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर मयूर मोहितेने मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला, असा गावकऱ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते.

रविवारी (ता. २३) सकाळी कळंब येथे ओम या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ओम हा भालेराव कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे कळंब गावांवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !