पावसाळ्यात

पावसाळ्यात अपघात होऊ नयेत यासाठी सतर्क राहणे महत्त्वाचे

आयर्विन टाइम्स / सांगली
पावसाळ्यात वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. निसरडे रस्ते, चिखल आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे साहजिकच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहनधारकांनी प्रचंड सतर्क राहून सावकाश वाहन चालवण्याची गरज आहे. अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवायला हवे. पावसाळ्यात वाहने जपून चालवल्यास अपघातांचा धोका कमी होतो. त्याचबरोबर या पावसाळ्यात वाहनांचीदेखील काळजी घ्यायला हवी. आणखी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जाणून घ्या.

वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळायला हवी

पावसामध्ये वाहन चालवत असताना तुम्ही तुमची लेन अचानक बदलू नका. एखादे वळण असल्यास किंवा लेन बदलण्यापूर्वी इंडिकेटराचा, प्रसंगी हाताने इशारा करा. यामुळे तुमच्या मागील वाहनाला तुम्ही लेन बदलत आहात किंवा एखाद्या ठिकाणी वळण घेत आहात हे समजण्यास मदत होईल. घाट रस्त्यातून प्रवास करताना दरड कोसळणे, वाहन रस्त्यावरून घसरणे अशा अनेक घटना घडत असतात, त्याचाही अंदाज घेऊन प्रवास केला पाहिजे.

पावसाळ्यात

वाहनांची सतत तपासणी करायला हवी

पावसाळ्यामध्ये कार चालवण्यापूर्वी कारमधील सर्व उपकरणे योग्य पद्धतीने काम करतात का याची खात्री करून घ्या, हेडलॅम्प, टेललॅम्प, इंडिकेटर, विंडशिल्ड, वायपर आणि ब्रेक्स सुस्थितीत काम करीत आहेत किंवा नाही, तसेच टायरमध्ये योग्य हवेचे प्रमाण आहे याची तपासणी करूनच प्रवासाला सुरवात करा. वाहनाचे ब्रेक लाइट सुरू असणे आवश्यक आहे, ब्रेक लाइट असेल तर ब्रेक दाबताच लाइट लागल्याने अपघाताचा धोका कमी होतो.

हे देखील वाचा: Herbal Zone : गुळवेलच्या पानांचे औषधी गुणधर्म; गुळवेलच्या वापराचे 4 फायदे / benefits जाणून घ्या

कारचे हेडलाइट्स सुरू ठेवा

पावसाळ्यामध्ये वाहन चालवताना दृश्यमानता कमी असण्याची शक्यता असते. त्यासाठी वाहन चालवताना हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प सुरू ठेवल्यास समोरील रास्ता नीट दिसण्यास आणि समोरच्या वाहनालाही वाहन येत असल्याची जाणीव होण्यास मदत होते. तुमचे हेडलाइट्स चांगले नसतील तर त्वरित दुरुस्त करून घेतले पाहिजेत. हेडलॅम्प चांगले नसतील तर रात्रीच्या वेळी प्रवास सुखकर होण्याऐवजी रिस्की होऊ शकतो. पावसात किंवा तीव्र आभाळ आलेल्या वेळी वाहन चालवताना हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प लावूनच गाडी चालवणे फायद्याचे ठरते.

पावसाळ्यात

वायपर व्यवस्थित ठेवा

पावसाळा सुरू झाला की जुन्या वायपर ब्लेड बदलणे आवश्यक आहे. अत्यंत कमी किमतीच्या या वायपर ब्लेड बदलण्यास निष्काळजीपणा करूच नका; कारण नवीन वायपर ब्लेडमुळे काचेवरील पाणी निघून काच स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे रस्त्यावरील वाहने व्यवस्थित दिसतात. त्याचप्रमाणे पावसात दृश्यमानता कमी असण्याची शक्यता असते. म्हणून चांगल्या दृश्यमानतेसाठी तुमच्या कारच्या विंडशिल्ड आणि विंडो स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.

हे देखील वाचा: Education news 1 : अभ्यासक्रमांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इतर कामे लावू नयेत: शिक्षण खात्याची शाळांना सूचना; अन्यथा संबंधित शिक्षकांवर गुन्हा / A crime against teachers

टायर अन् ब्रेक महत्त्वाचे

पावसाळ्यात वाहनाच्या टायर आणि ब्रेकची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. साधारण पावसाळा सुरू होण्यापूर्वी टायर अधिक प्रमाण घासलेले नाही, त्याची ग्रिप डेप्थ चांगली आहे याचीही खात्री करून घेण्याची गरज आहे. यामुळे वाहन घसरण्याचा धोका कमी होतो. टायर बरोबरच ब्रेक पॅड आणि डिस्कदेखील वेळोवेळी तपासा. व्हील अलॉयमेंट करून घ्या, त्यानंतरच प्रवासाला निघा. स्टेपनी सुस्थितीत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात

पाण्यातून जाणे टाळाच

रस्त्यात नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असले तर पाण्यात वाहन घालण्याचा मोह टाळलेला बरा. दुसरे वाहनधारक पाण्यातून जात आहेत असे म्हणून तुम्ही अपघाताला संधी देऊ नका. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या मार्गावर पाणी साचलेले असल्यास पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.

हे देखील वाचा: Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील बामणोलीत पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; हल्लेखोरांपैकी 1 जण गंभीर जखमी

पावसाळ्यात वाहन चालवताना कोणती काळजी घ्याल

■ पावसाळ्यात ओव्हरटेक करणे टाळावे.
■ कारवर नियंत्रण राहण्यासाठी स्टिअरिंगवर घट्ट पकड ठेवावी
■ समोरील वाहनाच्या जवळ न जाता सुरक्षित अंतर ठेवा.
■ उभ्या पाण्यातून वाहन चालवणे टाळा
■ पूरसदृश परिस्थितीत वाहन पाण्यातून नेण्याचा मोह टाळा.
■ पावसाळ्यात वाहन झाडाखाली उभे करुन ठेवू नये
■ पाण्यात वाहन चालू करण्याचा प्रयत्न करू नये
■ पावसाळ्यात वाहनाची सतत वॉशिंग करावी; अन्यथा हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणाने रंग डाउन होण्यास सुरवात होते.

पावसाळ्यात

एक दृष्टिक्षेप

पावसाळ्यात वाहन सुस्थितीत राहील याची काळजी घ्यावी. प्रवासापूर्वी सर्व्हिसिंग करून प्रत्येक पार्ट सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या, त्याचप्रमाणे वायपर चांगल्या अवस्थेत आहे याची खात्री केल्यावर शक्यतो नवीन ब्लेड बसवून घेतल्या पाहिजेत. हेडलाइट, इंडिकेटर, ब्रेकलाइट, डॅशबोर्डमधील सर्व लाइट्स चालू असाव्यात. ब्रेक लायनर जर अधिक घासलेले असतील तर ते बदलून घेतले पाहिजे. पुरेशी काळजी घेऊनच पावसाळ्यात प्रवासाला निघाले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed