सारांश: 1. अपघातात युवक ठार: नागज-जत मार्गावर जांभूळवाडी फाट्याजवळ अज्ञात चारचाकीने मोटारसायकलला धडक दिल्याने रमेश साळे (२५) यांचा मृत्यू झाला, तर आप्पासाहेब कदम (३२) जखमी झाले. पोलिस तपास सुरू आहे.
2. जनावरांची चोरी: जत तालुक्यातून तीन जर्शी गायी चोरणाऱ्या सिताराम ऐडगे (३२) याला पोलिसांनी अटक करून ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान त्याने इतर ठिकाणीही चोरी केल्याची कबुली दिली.
जत ,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी येथील नागज-जत दरम्यानच्या फाट्यावर अज्ञात चारचाकी वाहनाची मोटारसायकलला जोराची धडक बसून एक युवक ठार झाला. एक जखमी झाला. रमेश रामा साळे (वय २५) असे ठार झालेल्या, तर आप्पासाहेब महादेव कदम (वय ३२) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघे कोसारी (ता. जत) येथील आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात झाला. कवठेमहांकाळ पोलिसांत त्याची नोंद झाली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, की साळे व कदम हे मोटारसायकलवरून (एमएच २५, एएन २६०६) कोसारीकडे निघाले होते. नागज ते जतदरम्यान जांभुळवाडी फाट्याजवळ आले असता विरूद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाची मोटारसायकलीला धडक बसली. रमेश व आप्पासाहेब यांना डोक्याला जोराचा मार लागल्याने गंभीर जखमी झाले. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले असता रमेश साळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामा सखाराम साळे (वय ५२, कोसारी) यांनी फिर्याद दिली असून तपास पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील करीत आहेत.
जनावरे चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक
जत तालुक्यातून तीन जर्शी गाई चोरणारा आरोपी सिताराम लक्ष्मण ऐडगे (वय ३२ वर्षे, मुळ रा. पाणीव सध्या रा. वेळापुर, ता. माळशिरस, जि. सोलापुर) यास अटक करून जत पोलिसांनी टेंपोसह तीन गाई असा मिळून ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वा. सुमारास तीन जर्शी गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत जत पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता. या गुन्हयांचा तपास अर्जुन घोदे हे डी.बी. पथकाचे मदतीने करीत होते. डी. बी. पथकाचे अच्युतराव माने, सागर करांडे यांना ढालगाव गावच्या हद्दीत चोरीच्या जर्शी गाय विक्री करीता आणलेल्या आहेत, अशी माहीती बातमीदाराकडून माहिती मिळाली. नंतर अच्युतराव माने, अर्जुन घोदे, राजेंद्र माळी, विक्रम पोदे, विनोद सफटे, सागर करांडे हे तपासकामी रवाना होवून गुन्हयांतील जर्शी गाय, गायी भरलेला पिकअप जप्त करुन आरोपीस ताब्यात घेवून गुन्हयांचे तपासकामी अटक केली आहे.
आरोपीकडे गुन्हयांचे अनुषंगाने तपास केला असता, त्यांने माडग्याळ येथे जर्शी गाय चोरी असल्याचे तसेच सांगोला यरतहून पिकअप चोरी करून , दरीबडची येथून शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.