तासगावमध्ये वयोवृद्धाची ए.टी.एम.

सारांश: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ए.टी.एम. फसवणूक करणारा आरोपी अमोल शेंडे याला अटक केली. तासगाव व वडूज येथे वयोवृद्धांची ए.टी.एम. बदलून पैसे काढणाऱ्या या आरोपीवर फसवणूक, खून व आर्म अॅक्टसह अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी २४,५०० रुपये रोख व ५०,००० रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली. पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे.

तासगावमध्ये वयोवृद्धाची ए.टी.एम.

तासगाव, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वयोवृद्ध इसमांची ए.टी.एम. मधून पैसे काढताना फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी अमोल भगवान शेंडे (वय ३५, रा. यादव वस्ती, काठी, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यात फसवणूक, आर्म अॅक्ट व खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

हेदेखील वाचा: Islampur crime news: इस्लामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – परराज्यातील आरोपीकडून चोरीच्या 2 बोलेरो गाड्या आणि 3 दुचाकी जप्त

गुन्ह्याचा तपशील
दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी तासगाव येथील एसबीआय बँकेच्या ए.टी.एम.मध्ये फिर्यादी दिलीप देवमाने हे पैसे काढत असताना आरोपीने हातचलाखीने त्यांचे ए.टी.एम. बदलून त्यांच्या खात्यातील पैसे काढले.याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा शोध व कारवाई
पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगलीत बनावट सोने तारण ठेवून फसवणुकीचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद – 7.34 लाखांचा मुद्देमाल जप्त

दि. १२ मार्च २०२५ रोजी, पोलीस पथक सांगली शहरात गस्त घालत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी सांगलीच्या यशवंतनगर चौकात विना नंबरच्या मोटारसायकलवरून फिरत आहे. पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेबाबत विचारले असता त्याने तासगाव मधून SBI बँकेच्या ए.टी.एम. मध्ये पैसे काढणेकरीता आलेल्या वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून ए.टी.एम. कार्ड बदलून सदर ए.टी.एम. कार्डमधून तासगाव येथील IDBI बँकेच्या ए.टी.एम. मधून काढलेले पैसे असल्याचे सांगितले.

तसेच सातारा जिल्हयातील मायणी गावातील वयस्कर इसमास ए.टी.एम. अदलाबदली करून फसणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली.

जप्त मुद्देमाल
– २४,५०० रुपये रोख रक्कम
– ५०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल
– एकूण जप्त मुद्देमाल – ७४,५०० रुपये

हेदेखील वाचा:miraj crime news: मिरजमध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून गांजा विक्रीविरुद्ध सातत्यपूर्ण कारवाई; 67,590 रुपये किंमतीचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा

गुन्हेगारी पार्श्वभूमी
– तासगाव पोलीस ठाणे – गु.र.नं. ११८/२०२५ भा.दं.सं. कलम ३१८(४)
– वडूज (सातारा) पोलीस ठाणे – गु.र.नं. ३९६/२०२४ भा.दं.सं. कलम ३१८(४)
– याशिवाय, पुणे, सातारा, सोलापूर, कर्नाटक येथे फसवणूक, खून, आर्म अॅक्ट आदी गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग आढळला आहे.

पुढील तपास  Tasgaon crime news
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी Tasgaon पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed