ताक-दही सेवन केल्याने चांगले बॅक्टेरिया वाढतात
Why buttermilk and curd are important? आपल्या पचन तंत्रात बॅक्टेरियांची एक विशिष्ट प्रकारची जैविक प्रणाली असते. त्यामध्ये काही बॅक्टेरिया चांगले असतात, जे आपले पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, तर काही वाईट बॅक्टेरिया असतात, जे विविध आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. पोटात चांगले बॅक्टेरिया असणे पचनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
या चांगल्या बॅक्टेरियांना ‘प्रोबायोटिक्स’ म्हणतात आणि त्यांचा मुख्य स्त्रोत दही, ताक यांसारखे खाद्य पदार्थ आहेत. ताक-दही सेवन केल्याने चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पोटाचे आरोग्य सुधारते.
पोटातील वाईट बॅक्टेरिया कशामुळे वाढतात?
पोटातील वाईट बॅक्टेरिया वाढल्याने पोटाशी संबंधित विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो, जसे की:
– अतिसार (Diarrhea)
– आतड्यांमध्ये सूज
– गॅस्ट्रोएंटेराइटिस
– संक्रमण
– आजारपण
वाईट बॅक्टेरियांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण चुकीचे अन्न सेवन असू शकते. अधिक प्रमाणात प्रक्रियायुक्त किंवा अपोषक आहार घेतल्यास चांगल्या बॅक्टेरियांची संख्या घटते आणि वाईट बॅक्टेरियांचे प्रमाण वाढते. त्यामुळे हे टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे?
पोटातील वाईट बॅक्टेरिया वाढू नयेत यासाठी खालील पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे:
1. अतिआंबट फळे – खूप आंबट फळं पोटासाठी हानिकारक असू शकतात.
2. अशुद्ध धान्य– प्रक्रिया केलेले किंवा रासायनिक पदार्थयुक्त धान्य खाणे टाळावे.
3. मसालेदार पदार्थ – जास्त मसाले पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करू शकतात.
4. जास्त अंडी – अंड्यांचे अधिक सेवन टाळावे.
5. पनीर आणि साखर – साखर आणि मिठाईचे प्रमाण वाढल्यास वाईट बॅक्टेरिया वाढू शकतात.
कोणते पदार्थ चांगले बॅक्टेरिया वाढवतात?
1. ताक आणि दही – प्रोबायोटिक खाद्यपदार्थ म्हणून ताक आणि दही यांचा समावेश आहारात करावा. हे चांगले बॅक्टेरिया वाढवतात.
2. गायचं तूप – पचनासाठी उत्तम असल्यामुळे तूप घेतल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते.
3. बदाम आणि गूळ – हे चांगले पोषक असतात, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांच्या वृद्धीला मदत करतात.
4. हिरव्या भाज्या – लसूण आणि कांदा यासारख्या भाज्या प्रीबायोटिक्स आहेत, जे चांगले बॅक्टेरिया वाढवतात.
पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी उपयुक्त उपाय:
1. हरड पावडर – अर्धा चमचा हरड पावडर पाण्यासोबत घेतल्यास पोटातील वाईट बॅक्टेरिया कमी होतात आणि पचनशक्ती सुधारते.
2. ताकाचा वापर – ताकात जिरे आणि काळं मीठ घालून ते जेवणानंतर प्यायल्यास पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात.
3. तांब्याच्या भांड्यातील पाणी – रात्री तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवून सकाळी प्यायल्याने शरीर शुद्ध होते आणि पोटाच्या आरोग्याला फायदा होतो.
4. टोमॅटो, जांभूळ, लिंबू– हे फळं आणि भाज्या पचन सुधारण्यासाठी आणि बॅक्टेरियांच्या संतुलनासाठी उपयुक्त आहेत.
पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी योग्य आहार घेतल्याने पचनशक्ती सुधारते आणि अनेक रोगांपासून संरक्षण मिळते. ताक आणि दही यासारख्या पदार्थांचे नियमित सेवन आणि वाईट बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवणारे पदार्थ टाळल्याने आतड्यांचे आरोग्य टिकवले जाऊ शकते.
(हा लेख फक्त सामान्य माहितीच्या आधारे आणि जागरुकतेसाठी आहे. उपचारासाठी किंवा आरोग्याशी संबंधित सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.)