जवस

जवस (Flaxseed) म्हणजे एक सुपरफूड आहे

जवस (फ्लॅक्स सीड-Flaxseed) या आकाराने लहान बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असून, त्याला ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते. यात तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडन्ट्स, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, तसेच जीवनसत्त्व ब, मॅग्नेशिअम, आणि मँगेनीज यांचे भरपूर प्रमाण असते.जवसाला फ्लॅक्स सीड-Flaxseed आणि हिंदीमध्ये अलसी म्हणतात.

जवस

जवस बियांचे पोषणतत्त्व (प्रति १०० ग्रॅम) जाणून घ्या :
कॅलरीज: ५३४ -प्रथिने: १८.३ ग्रॅम, कर्बोदके: २८.९ ग्रॅम, स्निग्धांश: ४२.२ ग्रॅम,तंतुमय पदार्थ: २७.३ ग्रॅम

हे देखील वाचा: Health Advice/ आरोग्य सल्ला: मध्यम वयात वृद्धत्व टाळण्यासाठी अधिक सखोल मार्गदर्शन; मध्यम वयात तरुणाई जपण्यासाठी महत्त्वाचे 5 टिप्स

जवसाचे आरोग्यदायी फायदे:

1. हृदयाचे आरोग्य: फ्लॅक्स सीड बियांमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिडमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी करत हृदयाचे कार्य सुधारते.
2. पचनक्रियेस मदत: तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत करतात. गॅस, अपचन यांसारख्या त्रासांवर उपयुक्त.
3. कर्करोगविरोधी गुणधर्म: लिग्नीन नावाचे घटक कर्करोगाच्या काही प्रकारांना प्रतिबंध करतात.
4. वजन नियंत्रित करण्यास मदत: तंतुमय पदार्थांमुळे भूक कमी लागते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
5. मधुमेह नियंत्रण: रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते, मधुमेहाचा धोका कमी करते.
6. हाडांचे आरोग्य:कॅल्शिअम, फॉस्फरस यामुळे हाडे मजबूत होतात.
7. त्वचेसाठी उपयुक्त: त्वचेला मृदू व तेजस्वी बनवते.
8. हार्मोनल बॅलन्स राखतो: हार्मोन्सच्या असमतोलामुळे होणाऱ्या समस्यांवर उपयुक्त.

हे देखील वाचा: Eat peanuts for health/ आरोग्यासाठी खा शेंगदाणे: शेंगदाण्याचे महत्त्वाचे 8 फायदे जाणून घ्या

जवस

फ्लॅक्स सीड बिया सेवनाचे योग्य प्रकार जाणून घ्या

जवसाची चटणी हा पारंपरिक आणि स्वादिष्ट प्रकार आहे. मात्र यापासून लाडू, बर्फी, चिक्कीदेखील बनवून खाता येते. या गोड पदार्थांमध्ये मूल्यवर्धन अधिक असते. या शिवाय बिस्किटे बनवून पौष्टिक स्नॅक्सचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

हे देखील वाचा: Health Hazards from Adulterated Milk/ भेसळयुक्त दुधामुळे आरोग्य धोक्यात: आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या 6 महत्त्वाचे मुद्दे

जवसाचे सेवन कसे करावे?

फ्लॅक्स सीड बिया बारीक करून सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते, कारण त्यातील पोषक तत्त्वे शरीराला अधिक प्रभावीपणे मिळतात. जवसाचा आहारातील वापर कमी झाल्यामुळे त्याचे मूल्यवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. चटणी, बर्फी, आणि चिक्की यांसारख्या पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्यास आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मदत होईल.

जवस

फ्लॅक्स सीड ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. त्याचा आहारातील समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य, पचन, त्वचा, आणि वजन नियंत्रण यांसारख्या अनेक बाबतीत सकारात्मक परिणाम होतात. तसंच, आपल्या आहारात फ्लॅक्स सीडचा समावेश करून आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !