जत तालुक्यातील श्री क्षेत्र गुड्डापूर येथे दानम्मा देवीला येणारे भाविक हे ९० टक्के कर्नाटकातून येत असतात
आयर्विन टाइम्स / जत
कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गुड्डापूर येथील दानम्मा देवीच्या पवित्र भूमीत कर्नाटक शासनाच्यावतीने नऊ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कर्नाटक भवनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याच्या माजी मजुराई मंत्री निपाणीच्या आमदार सौ. शशीकला अण्णासाहेब जोल्ले यांच्याहस्ते व म. नि. प. शिवयोगी डॉ. मुरधाराजेंद्र महास्वामीजी, मुगळखोड मठ, म. नि. प. जडे शांतलिंगेश्वर महास्वामीजी, दुधनी मठ, अवधूत विनय गुरुजी श्री दत्त आश्रम स्वर्ण पिटकपूर, ष. ब्र. गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी, गुड्डापूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दानम्मा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजूगोड्डा सिद्रामप्पा पाटील होते.
यावेळी बोलताना विजयगौडा पाटील म्हणाले की, मी श्री धानम्मा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष नुकताच एक महिन्यापूर्वी झालेलो आहे. गुड्डापूर हे एक तीर्थक्षेत्र येथे येणारे भाविक हे ९० टक्के कर्नाटक राज्यातून येत असतात म्हणून तत्कालीन विश्वस्त मंडळाने कर्नाटक सरकारकडे कर्नाटक भवन बांधून देण्याची मागणी केलेली होती. त्यावेळच्या मजुराई मंत्री शशिकला जोल्ले यांनी त्यास मंजुरी देखील देऊन ११ कोटी रुपये मंजूरही केले होते. नऊ कोटी रुपये खर्च करून बांधकाम पूर्ण होऊन आज त्याचे उद्घाटन सौ. शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे.
हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 2 ऑगस्ट: मेष, वृषभ यांसह 7 राशींना नशिबाची साथ मिळेल, आर्थिक लाभ, इतरांनी देखील आजच्या राशीत तुमचे भविष्य जाणून घ्या
विशेष करून कर्नाटक शासनाचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आम्हाला कर्नाटक भवन व सुसज्ज असे दासोह बांधून दिले. यासाठी शशिकला जोल्ले यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचेही आम्ही देवस्थान कमिटीच्या वतीने अत्यंत ऋणी आहोत. उद्घाटनपर भाषणाना बोलताना माजी मजुराई मंत्री, सौ. शशिकला जोल्ले म्हणाल्या की, श्री क्षेत्र गुड्डापूर येथे दानम्मा देवीला येणारे भाविक हे ९० टक्के कर्नाटकातून येत असतात. मीही कर्नाटकातील निपाणी या मतदारसंघाचे नेतृत्व करताना मीही देवीच्या दर्शनासाठी येत होते.
योगायोगाने मलाही कर्नाटक सरकारमध्ये मजुराई खात्याचे मंत्रिपद मिळाले. त्या मंत्रीपदाचा सदूपयोग करावयाचा म्हणून सर्वप्रथम धानम्मा देवस्थान गुड्डापूर येथे आली असता माझ्याकडे येथील विश्वस्त मंडळाने कर्नाटक भवन बांधून त्या ठिकाणी प्रशस्त असे अन्नक्षेत्रालय दासोह बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यास मी तात्काळ संमती देऊन देवस्थानकडून दोन एकर जागा कर्नाटक शासनाच्या नावावरती खरेदी केली व ११ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला.
हे देखील वाचा: Jat News : जत तालुक्यातील कुंभारीत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी पाचजण अटकेत; 4 दिवसांची पोलिस कोठडी
नऊ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज असे कर्नाटक भवनचे बांधकाम पूर्ण झालेले आहे व उर्वरित रक्कमेत या ठिकाणी एकाच वेळी एक हजार भाविक देवीचा प्रसाद घेतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे. देवीची सेवा करण्याची संधी मिळाली याचे मी माझे भाग्य समजते. श्री धानम्मा देवी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने माझ्याकडे येथील भाविकांना विविध काम प्रकारच्या सुखसुविधेसाठी करण्यासाठी निधीची मागणी केलेली आहे. या मागणीचा पाठपुरावा करून कर्नाटक शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून देणार आहे.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, खजिनदार चंद्रशेखर इंडी, विश्वस्त शब्दय हिरेमठ, प्रकाश गणी, सदाशिव गुडघे, शंभुलिंग ममदापूर, गजेंद्र कुल्लोळी, विश्वस्त सागर, धानाप्पा पुजारी, मल्लिकार्जुन गुड्डापूर, सरपंच सौ. तुळसाबाई थोरात यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप, देवस्थान ट्रस्टचे सचिव विठ्ठल पुजारी, व्यवस्थापक राहुल कलबुर्गी, इराण्णा जेऊर, डॉ. सार्थक हिट्टी, सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी, यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भक्तगण उपस्थित होते.
जतचे मोहन कुलकर्णी : नवीन दराने दुधाची बिले मिळावीत; भविष्यात मोठे आंदोलन करावे लागेल
जत तालुक्यातील सहकारी व खासगी दूध संकलन चालकांनी शासनाने दुधाला १ जूलैपासून लागू केलेला दराप्रमाणे त्याच दिवसापासूनचे दुधाचे बिल उत्पादकांना द्यावे, अशी मागणी भाजप नेते मोहन कुलकर्णी यांनी केली. मोहन कुलकर्णी म्हणाले, “जत शहर व तालुक्यातील शेतकरी भयानक दुष्काळाशी संघर्ष करीत जर्सी, एचएफ गायीचे संगोपन करून उदरनिर्वाह करीत आहेत. वर्षभर चाऱ्याचा तुटवडा, पशुखाद्याचे वाढलेले दर वाढलेला खर्च यातून दूध उत्पादक पशुपालक अक्षरशः तोटा सहन करून गायी संभाळत आहेत. महाराष्ट्रात या दुधाला दरवाढ मिळावी, याकरिता मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत. “
कुलकर्णी म्हणाले, “शासनाने १ जुलै २०२४ पासून दरवाढ लागू केली. तालुक्यातील सहकारी दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष वा खासगी दूध संकलन केंद्राच्या चालकांनी शासन निर्णयानुसार दूध उत्पादक पशुपालकांची बिले काढली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी व जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सहकारी दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष व खासगी चालकांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे.” ते म्हणाले, “जानेवारीमध्ये शासनाने प्रति जनावरामागे पाच रुपये अनुदान जाहीर केले होते. परंतु पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पशूंची ऑनलाइन नोंदणी वेळेत न झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. ते त्वरित मिळणे आवश्यक आहे.’
“दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. सध्याचा दर आणि जनावरांवर होणारा खर्च यात खूप तफावत आहे. ताळमेळ बसत नाही. भविष्यात दुधाला निश्चित हमीभाव दर दिला नाही, तर सर्व पशुपालन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. पशुपालकांवर कर्जाचा बोजा आहे. चाराटंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर व गायीच्या संगोपनाचा हिशेब घातला तर दुधाला चाळीस रुपये दर अपेक्षित आहे. शासनाने गांभीर्याने विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
जत तालुक्यातील संख येथील बिरादार वस्ती शाळेत कायमस्वरुपी शिक्षकाची मागणी
संख येथील बिरादार वस्ती कन्नड जिल्हा परिषद शाळा संख येथे निवृत्ती शिक्षक न देता कायमस्वरुपी शिक्षक द्यावा, या मागणीसाठी पालकांनी अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना निवेदन दिले. तसेच शाळेतील मुख्याध्यापिकांनाही लेखी निवेदन दिले. अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील अनेक ठिकाणी कन्नड शाळेत निवृत्ती झालेले शिक्षक भरती करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे संख येथील बिरादार वस्ती कन्नड जिल्हा परिषद शाळा संख येथील शाळेत गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षकांची कमी असल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शासनाने निवृत्त झालेले शिक्षक भरती करून निवड केल्यामुळे शाळेतील पट संख्या कमी होत असल्याचे मत व्यक्त करत अपर तहसीलदार व मुख्याध्यापिकांना निवेदन दिले. या निवेदनावर यशवंत बिरादार, सिदराय बालगाव, रवी बिरादार, किरण बिरादार, रवी बिरादार आदींची स्वाक्षरी आहे.