खून

पोलिसात न्याय न मिळाल्याने महिलेने घेतली न्यायालयात धाव

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील खैराव येथे बळवंत बापू घुटुकडे (३३) या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी जत येथील फौजदारी न्यायालयाच्या आदेशाने सहाजणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, जत यांनी सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे तपास करण्याचा आदेश दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या या आदेशाने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

न्यायालयीन आदेशानुसार रामा शंकर घुटुकडे (६०), बिरुदेव रामा घुटुकडे (३२), विलास रामा घुटुकडे (३०), तुकाराम रामा घुटूकडे (२५), दगडू नामदेव घुटूकडे (३५) रामा ज्ञानदेव पडोलकर (४२, सर्व रा. घुटुकडे वस्ती, खैराव ) या सहाजणांवर संशयित म्हणून खूनाचा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद श्रीमती सविता बळवंत घुटुकडे यांनी जत पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित रामा घुटुकड़े, बिरुदेव घुटुकडे, विलास घुटुकडे, तुकाराम घुटूकडे, दगडू घुटुकडे यांनी रस्त्याच्या व किरकोळ कारणातून बळवंत घुटूगडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसातच त्यांचा मृतदेह विहिरीत मृतावस्थेत आढळून आला होता. नातेवाईकांनी संशयितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र जत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. यावरून नातेवाईकांनी पोलीसप्रमुख संदीप घुगे यांच्याकडेही संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, टाळाटाळ केली जात होती.

याबाबत संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने वस्तुस्थिती जाणून पोलिसांना संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयीन
आदेश देऊनही वेळेत गुन्हा दाखल होत नव्हता. मात्र शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जत

याबाबत अधिक माहिती अशी, २२ फेब्रुवारी रोजी बळवंत बापू घुटुगडे हे दुधाच्या धारा काढत असताना शेजारीच असलेल्या नात्यातील मुलीस नवरी कशी आज नटली आहे, असे सविता घुटुगडे म्हणाल्या होत्या. त्यावर पती बळवंत यांनी नवरीला काय करायचं आहे, तू धारा काढायला लवकर ये, असे म्हणाले होते. हाच शब्द लक्षात ठेऊन मुलीच्या आजोबासह सहाजणांनी ३ व ४ मार्च रोजी भांडणे केले. त्यावर संशयित सहाजणांनी तुला सकाळपर्यंत जिवंत सोडत नाही, अशी धमकी दिली होती.

दरम्यान, ४ मार्च रोजी नेहमीप्रमाणे बळवंत हे रात्री जेवण करून मेंढराजवळ झोपायला जातो म्हणून गेले. मात्र, ५ मार्च रोजी ते आढळून आले नाही. परिसरात त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत. बळवंत यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाण्यात पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची नोंद केली.

हे देखील वाचा: Sangli News / सांगलीच्या बातम्या: सेल्फीचा मोह जीवावर बेतला; सांगलीतील 1 तरुण कृष्णा नदीत वाहून गेला

मात्र, पतीला पोहता येत असून धमकी दिल्याच्या चोवीस तासात ही घटना होणे संशयास्पद आहे. शिवाय, घटनेनंतर लगेचच संशयित गावातून पसार झाले होते. अशी परिस्थिती असताना जत पोलीस या घटनेचा तपास करण्यात डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा, अशी मागणी ही सविता घुटुगडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडेही केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद न केल्याने न्यायालयाकडे धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

जत तालुक्यातील व्हसपेठ येथे जनावरे चोरीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

जत तालुक्यातील व्हसपेठ येथे ४७ हजार रुपये किमतीची जनावरे चोरीप्रकरणी चौघांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ४० हजार रुपये किमतीची मुऱ्हा जातीची म्हैस व सात हजार किमतीची शेळी ही जनावरे संतोष हवाळे यांच्या घरासमोर लिंबाच्या झाडाखाली लोखंडी खुंटीला काळ्या रंगाच्या कासऱ्याने बांधलेली म्हैस व सखुबाई मधुकर निळे यांची घरासमोर कासऱ्याने बांधलेली काळ्या रंगाची एक शेळी असे संशयितांनी चोरून नेले आहेत. ही चोरी दत्तात्रय भगवान निळे, ईश्वर दगडू लेंगरे (दोघे व्हसपेठ, ता. जत), वैभव दादासाहेब लेंगरे, ज्ञानेश्वर अण्णाप्पा खोत (दोघे कोगनोळी, ता. कवठेमहांकाळ) यांनी संगमताने चोरी करून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 8 जुलै: मेष, मीनसह 4 राशी आर्थिक लाभ होईल, करिअरमध्ये यश मिळेल, जाणून घ्या इतर लोकांनी आजच्या राशीत तुमचे भविष्य

कुंभारीत पिकअपची चोरी

जत तालुक्यातील कुंभारी येथून उमेश शिवाजी डोरले यांची मालवाहू पिकअप चोरीस गेल्याची फिर्याद जत पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. डोरले यांनी २०१९ मध्ये पिकअप (एमएच १० सी आर – ५४८८) खरेदी केली. ती घरगुती कामासाठी वापरीत होते. त्यांचे श्रीराम पशुखाद्य नावाचे दुकान असून ही गाडी दररोज दुकानासमोर काम संपल्यावर लावत असतात. गाडी लावून काल दुसऱ्या दिवशी चोरी झाली. या जीपची किंमत एक लाख ५० हजार रुपयांची आहे.

जत

दुचाकी चोरीप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली.

सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथून चोरट्याने दुचाकी (एमएच १० सीई ८३४५) चोरून नेली. याबाबत मयुरी जिनपाल पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !