आयर्विन टाइम्स / जत
दुष्काळासारख्या भयानक परिस्थितीचा सामना करावयाचा असेल दुष्काळावर मात करणं आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त झाडे लावने गरजेचे आहे. आज पाहायला गेले तर उन्हाळ्यात तापमान ४१ अंशाच्या वरती गेल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. एकीकडे पाऊसाचे प्रमाण कमी झालेले आहे. आपला जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखले जाते. यावर आपणाला मात करायची असेल तर प्रत्येक कुटुंबाने किमान ५ झाडांची लागवड करुन त्यांची कमीत कमी ३ वर्ष जोपासणा केली पाहिजे, असे आवाहन रामपुर-मल्लाळ ग्रुप ग्रामपंचायत, जत पंचायत समिती आणि गविसिध्देश्वर ट्रस्ट यांच्यासहकार्याने आयोजित गविसिध्देश्वर मंदिर रामपुर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले. यावेळी २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
आमदार सावंत पुढे म्हणाले की, आम्ही शासकीय जागेवरतीही शासनाच्या व तालुक्यातील विविध आध्यात्मिक व सामाजिक संस्थांच्या मदतीने ५० हजार झाडे लावून ते मोठे होईपर्यंत किमान ३ वर्ष जोपासणा करण्याचे नियोजन केले आहे. या अभियानामध्येही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रामपुर-मल्लाळ ग्रुप गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती पवार म्हणाले की, आमदार सावंत यांच्या माध्यमातुन किल्ले रामपुरसाठी पर्यटन विकासमधुन ४.७० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. गविसिध्देश्वर मंदिराचाही शासनाच्या ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये समावेश झालेला आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून गाव तलाव पाईपलाईन करुन पाणी सोडणेचे कामही सुरू आहे. जलजिवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. गावातील विविध वाडी-वस्तीसाठी रस्ते करण्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून गावाकरिता कोट्यवधीचा निधी गावाला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. गविसिध्देश्वर रस्ता आमदार फंडातून मंजूर करण्याचे जाहीर केले आहे.
कार्यक्रमास पंचायत समिती जत चे माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मिनाक्षीताई अक्की, मार्केट कमिटी माजी संचालिका सौ भाग्यश्री पवार,धानम्मा दूध संस्थेचे संचालक रावसाहेब मंगसुळी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, जत बसपा अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. जगताप ,नायब तहसीलदार धोडमाळ, कृषी विस्तार अधिकारी तुळशीदास संकपाळ, श्री लाड, व्यापारी बाळासाहेब हुंचाळकर, राजु यडगोंड, पुजारी विजय यडगोंड, सुरेश गोब्बी, शरणाप्पा अक्की, डॉ विवेकानंद राऊत, दिलीप सोलापुरे, मोहन माने-पाटील, मगदुम, जेऊर, डोळ्ळी, कायपुरे, मुर्गेश काळगी, जिल्हा बँकेचे तानाजी काशीद, कुलकर्णी, मार्केट कमिटीचे माजी सहाय्यक सचिव दादासाहेब जाधव, राजेश माळी ,दिपक हत्ती, तंगडी, निगाप्पा पट्टणशेट्टी ,
हे देखील वाचा: गुन्हेगारी वृत्त: विवाहित मुलीनेच वडिलांना घातला सात लाखाला गंडा; वडिलांची मुलीविरुद्ध पोलिसांत तक्रार
पत्रकार अनिल मदने, प्रदिप करगणीकर, ग्रामसेवक डी.एम.साळे, पोलिस पाटील दिगंबर निकम, ग्रामपंचायत सदस्या सौ. निलव्वा चव्हाण, सौ रुपाली माळी,आवडाप्पा भोसले, बाजीराव कोळेकर, पोपट माळी, प्रकाश माळी, मनोहर शिंदे , तानाजी कोळेकर, दीपक कोळेकर, आप्पासाहेब माळी, अनिल माळी, अमृता शिंदे, गोविंद शिंदे, नंदु निकम, अरविंद निकम, नंदकुमार मराठे, वसंत ठवरे, संभाजी पवार,परसराम घाटगे,शिवाजी कोळेकर,सखाराम माळी,दिगंबर माळी, तुकाराम माळी, चंद्रकांत क्षिरसागर, शहाजी कोळेकर यांचेसह मोठ्या संख्येने गावातील नागरिक, भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलकर्णी यांनी केले आणि आभार रामपुर गावचे सरपंच मारुती तुकाराम पवार यांनी मानले.
जत तालुक्यात ठिबकचे अनुदान थकले: रक्कम १ कोटी ३० लाख; खासगी सावकारांमुळे शेतकरी संकटात
केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘प्रति थेंब अधिक पीक’ घेण्यासाठी तुषार, ठिबक सिंचन योजना राबविण्यात येते. मात्र, दुष्काळी जत तालुक्यातील एक हजार ७९ शेतकऱ्यांना २०२१-२२, २०२२-२३ व २०२३ २४ मध्ये ठिबक संचासाठीचे अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांचे एक कोटी तीस लाख रुपयेइतके अनुदान थकले आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी गावातील खासगी सावकरांकडून पैसे घेऊन ठिबक संच विक्रेत्यांचे पैसे भागविले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
शासन थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा करणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरविण्यात येतात. ‘महा डीबीटी’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड केली जाते. यानंतर खरेदी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र, तसेच राज्य शासन वितरित करते. मागील काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक’ लागला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही. त्यामुळे या योजनेबाबत शेतकरी वर्गात संभ्रमावस्था आहे. ठिबकसाठी आधी खर्च करावा लागतो नंतर अनुदान मिळते. खर्चाची तरतूद करतानाच शेतकरी मेटाकुटीला येतो.
अद्याप जीआर नाही…
‘महा डीबीटी’च्या माध्यमातून नवीन ठिबक संच जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरले जात आहेत. मात्र, शासनाकडून लाभार्थीना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणारा जीआर शासनाकडून अद्याप निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत संभ्रमावस्था आहे.
थकलेले अनुदान राज्य शासनाकडून सन २०२१-२२ मधील १०३ लाभार्थीच्या दुसरा हप्त्यापोटी १२ लाख ३६ हजार, तर सन २०२२-२३ मधील १९३ लाभार्थीच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २३ लाख १६ हजार रुपये थकले आहेत. केंद्राकडून २०२३-२४ मधील ७८३ लाभार्थीच्या पहिल् हप्त्यापोटी ९३ लाख ९६ हजार रुपये, असे १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपये थकीत आहेत.
तालुक्यातील एक हजार ७९ शेतकऱ्यांना २०२१-२२ २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये ठिबक संचाचे अनुदान मिळालेले नाही. याची सर्व माहिती पाठविली आहे. या ‘हेड’ला निधी उपलब्ध नसल्याने हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मात्र, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहोत. लवकरच शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध होईल. -प्रदीप कदम, कृषी अधिकारी, जत तालुका