चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील धक्कादायक घटना

आयर्विन टाइम्स / चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत एका शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील आठ विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) घडली. यातील दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिक्षिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत दारू मिसळल्याच्या संशयातून त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रपूर

घटनेची सविस्तर माहिती

चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देते. शनिवारी शाळा नेहमीप्रमाणे सुरु झाली. दुपारी एकच्या सुमारास इंग्रजी विषयाच्या शिक्षिका उज्ज्वला पाटील सातवीच्या वर्गात शिकविण्यासाठी आल्या. शिक्षण चालू असताना त्यांनी त्यांच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पिले, मात्र त्यांना बाटलीतून दारूचा वास आल्याचा संशय आला.

हे देखील वाचा: Kerala gold scam: केरळमधील सोन्याच्या फसवणुकीतील आरोपीला सांगलीत अटक; 1 कोटी 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक

यावरून पाटील यांना वाटले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाण्याच्या बाटलीत दारू मिसळली असावी. त्यांनी वर्गातील सर्व १९ विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली, मात्र काहीच आढळून आले नाही. यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने आठ विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेचा गोंधळ आणि पोलिस हस्तक्षेप

घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक शाळेत दाखल झाले. त्यामुळे शाळेत गोंधळ उडाला. पालकांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, शैक्षणिक विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, विस्तार अधिकारी किशोर बारसागडे आणि केंद्रप्रमुख किशोर येनगंटीवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे. त्यानंतर पोलिसांनी उज्ज्वला पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Kerala gold scam: केरळमधील सोन्याच्या फसवणुकीतील आरोपीला सांगलीत अटक; 1 कोटी 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक

चंद्रपूर
चित्र प्रतीकात्मक आहे

शिक्षिकेची प्रतिक्रिया

शिक्षिका उज्ज्वला पाटील यांनी प्रासारमाध्यमांना सांगितले की, “पाण्याच्या बाटलीत दारू मिसळल्याचे मला विद्यार्थ्यांकडूनच माहीत झाले. मला त्यांच्या नावाची माहिती आहे आणि त्यांना शिक्षा करण्याचा उद्देशानेच मी ही कारवाई केली. ही घटना माझ्यासोबत तिसऱ्यांदा घडली आहे.”

हे देखील वाचा: केनरा बँकेत 3000 अप्रेंटिस पदांची भरती: इच्छुक उमेदवार 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

पालकांची प्रतिक्रिया

घटनेनंतर पालकांमध्ये संताप पसरला आहे. हरिदास दहेलकर आणि राहुल रायपुरे या पालकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “आमच्या मुलांनी असे काहीही केलेले नाही. शिक्षिकेने प्रेमाने त्यांना विचारायला हवे होते. शिक्षा एका वेळेस मान्य आहे, पण अशी शिक्षा जी विद्यार्थ्यांना दुखापत पोहोचवते, ती योग्य नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये.”

शिक्षण क्षेत्रात अशा घटनांचा उद्रेक होऊ नये, यासाठी योग्य ती कारवाई आणि शाळेतील वातावरण सुधारण्यासाठी पावले उचलली जाणे आवश्यक आहे. शिक्षिकेने घेतलेली प्रतिक्रिया अत्यंत गंभीर असून, विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed