गुळवेलला गुडूची किंवा गिलोय अशी अनेक नावे आहेत.
पावसाळ्यात खोकला, सर्दी, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर अनेक संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडतात. पावसाळ्यातील हा संसर्ग टाळण्यासाठी चांगल्या आहारासोबतच काही खास औषधी वनस्पतींचाही वापर करायला हवा, ज्यामुळे या ऋतूत आजारी पडण्यापासून बचाव होतो. गुळवेल, गुडूची किंवा गिलोय ही एक अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे.
गुळवेल पानांमध्ये कॅल्शियम आणि मँगनीजचाही पुरेसा साठा
गुळवेल, गुडची, गिलोय ही बहुवर्षीय औषधी वेल आहे. हिची पाने विड्याच्या आकाराप्रमाणे हृदयाच्या आकाराची असतात. याचे खोड पांढऱ्या किंवा भुऱ्या रंगाचे असते. गुळवेल जंगलात, शेतात असे कुठेही सामान्य ठिकाणी आढळून येते. याची वेल वाटोळी वरवर चढत जाताना दिसते. गुळवेलला अमृता समान मानले जाते. याला स्थानिक भाषेत अमृता असेही म्हणतात आणि या नामकरणामागील त्याचे अमृतसारखे गुणधर्म हे आहे. याला गिलोय म्हणतात कारण गिलोय नावाचे ग्लुकोसाइट आणि टिनोस्पोरिन, पाल्मेरीन आणि टिनोस्पोरिक ऍसिड देखील त्यात आढळतात. गिलॉयमध्ये तांबे, लोह, फॉस्फरस, जस्त, कॅल्शियम आणि मँगनीजचाही पुरेसा साठा आहे.ही औषधी वनस्पती परपोषी आहे. त्यामुळे ती कोणत्या तरी झाडाच्या आधारावर वाढते.
व्यसन सोडवण्यासाठी गुळवेलच्या पानांचा काढा महत्त्वाचा
अनेकांना दारू किंवा सिगारेटचे व्यसन असते. हे व्यसन सुटता सुटत नाही. दारूमुळे तर अनेकजण बरबाद झाले आहेत. त्याचबरोबर अनेकांचे कुटुंब उद्दवस्त झाले आहेत. मात्र गुळवेलच्या पानांचा यासाठी खास औषधी गुण आहे. साहजिकच सिगारेट, दारू आणि नशील्या पानांचे व्यसन सोडवण्यासाठी गुळवेलच्या पानांचा काढा उपयोगी आहे. ताप आणि व्हायरसपासून संक्रमण करणाऱ्या आजारांना ठीक करण्याचे गुण आहेत. रक्त शुद्ध करून प्रतिकारशक्ती वाढवते.
गुळवेल अनेक रोगांवर प्रभावी आहे
गुळवेल किंवा गिलॉय आपल्याला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून तर वाचवतेच पण बद्धकोष्ठता आणि गॅस यांसारख्या अन्नाशी संबंधित मौसमी आजारांपासूनही आपले संरक्षण करते. यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचा जबरदस्त गुण आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात लोकांनी त्याचे भरपूर प्रमाणात सेवन केले. पावसाळा हा अत्यंत संसर्गजन्य असल्याने या ऋतूत निरोगी राहण्यासाठी गुडूचीचा अर्थात गुळवेलचा अवश्य वापर करायला हवा.
डेंग्यू, स्वाइन फ्लू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव
मधुमेहाच्या समस्येतही हे आपल्यासाठी उपयुक्त आहे. त्याची प्रकृती उष्ण असल्याने पावसाळ्यात सकाळ-संध्याकाळ चहाच्या रूपात त्याचा उकडीचे सेवन केल्याने आपण दिवसभर उत्साही राहतो आणि जे काही खातो ते सहज पचते. गुडुचीच्या नियमित वापराने आपली भूकही वाढते. गिलोय ज्यूस आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याच्या वापराने डेंग्यू, स्वाइन फ्लू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.
हे देखील वाचा: Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील बामणोलीत पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; हल्लेखोरांपैकी 1 जण गंभीर जखमी
त्याचा रस केवळ आजारी किंवा संसर्गित असतानाच परिणामकारक ठरतो असे नाही तर सामान्य स्थितीतही त्याचा वापर आपल्या शरीराला फोड, मुरुम, रक्त विकार आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून वाचवतो.
सावधगिरी बाळगणे का आवश्यक आहे
गिलोय एक अतिशय उपयुक्त औषधी वनस्पती आहे, तरीही ते स्वेच्छेने सेवन करणे हानिकारक असू शकते. त्यामुळे या वेलीची पाने किंवा तिची देठ किंवा तिचा कोणताही भाग वापरण्यापूर्वी अनुभवी वनौषधी तज्ञ किंवा आयुर्वेद तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.
ही वेल कोणत्या झाडावर चढली आहे, यालाही महत्त्व आहे. त्यातल्या त्यात औषधी गुणधर्माच्या आधारे कडुलिंबाच्या झाडावर उगवलेली गिलोय सर्वोत्तम मानली जाते. कारण ती ज्या झाडावर चंदहते ते ती त्या झाडाचे सर्व गुणधर्म स्वतःमध्ये शोषून घेते, त्यामुळे कडुनिंबाच्या झाडापासून घेतलेली गिलोय ही सर्वोत्तम मानली जाते. कडुनिंबाचे गुणधर्म देखील समाविष्ट आहेत, म्हणून नीमगिलोय सर्वोत्तम मानली जाते.
काढा बनवायची कृती जाणून घ्या
ताज्या पानांचा काढा बनवण्यासाठी वापर करावा. पाने अर्धी मुठ्ठीभर घ्या. गुळवेलची पाने बाजारातून आणली असल्यास ती चिंचेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. पाने स्वच्छ केल्यानंतर गॅसवर एक भांडे ठेवून त्यात २०० मिली पाणी ओतावे. पाण्याला उकळी येऊ द्या. उकळत्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली पाने टाका. आणखी दोन ते तीन मिनिटे कमी आचेवर पाने उकळून घ्यावीत.
हे देखील वाचा: Monsoon has arrived, take care of health: पावसाळ्यात पोटाच्या तक्रारी, संसर्गजन्य आजाराचा वाढतो धोका
आता स्टोव्ह किंवा गॅस बंद करून पाण्यावर झाकण ठेवा. स्टीलच्या गाळण्याने पाणी गाळून घ्या. मग ते पाणी पिऊन घ्या. डॉक्टरांचा सल्ला असा कि, काढा असो किंवा जेवण. जास्त गरम किंवा जास्त थंड काढा घ्यायचा नाही. काढा उपासीपोटी घेतला पाहिजे.