🟠 फळांच्या नैसर्गिक चव व ग्राहकांच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या कृत्रिम रंग व रसायनांवर आळा घालण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तपासणी आणि विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
🔴 कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी:
कृत्रिम पिकवणीसाठी वापरला जाणारा कॅल्शियम कार्बाइड (म्हणजेच ‘मसाला’) हा अत्यंत घातक रसायन असून, त्याच्या वापरामुळे तोंडाला जखमा, पोटदुखी आणि कर्करोगाचा धोका संभवतो. त्यामुळे एफएसएसएआयने त्याच्या वापरावर बंदी घालून खाद्य सुरक्षा कायदा, 2006 अंतर्गत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
🟢 इथिलीन गॅसद्वारे सुरक्षित पिकवणीची सूचना:
प्राधिकरणाने नैसर्गिकरित्या फळे पिकवण्यासाठी इथिलीन गॅसच्या वापरासाठी एसओपी (Standard Operating Procedure) जाहीर केली असून, ती सर्व अन्न व्यवसायिकांनी पाळावी, असे निर्देश आहेत.
🔍 मंडईंवर कडक नजर आणि कारवाई: बाजारपेठांमधील फळांच्या तपासणीसाठी राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांना कडक निरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्या एफबीओंवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
👥 ग्राहकांसाठी आवाहन:
एफएसएसएआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, फळ खरेदी करताना सजग रहा, सुरक्षिततेचा विचार करा आणि केवळ नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळेच निवडा.
🔗 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ: [www.fssai.gov.in](http://www.fssai.gov.in)
#फळांचीसुरक्षितता #एफएसएसएआय #आरोग्यपूर्णभारत #अन्नसुरक्षा #विषारीरसायनांवरबंदी