कासेगाव

कासेगाव येथे पैशाच्या देवाणघेवाणीतून खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज

आयर्विन टाइम्स / वाळवा
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे शेतात जाणाऱ्या पांडुरंग भगवान शिद (वय ४०) या सावकाराचा अनोळखीने आज सकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून खून केला. खुनाचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र पैशाच्या देवाणघेवाणीतून खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यामुळे कासेगाव- वाटेगाव परिसरात खळबळ उडाली.

कासेगाव

पाळत ठेवून बसलेल्या हल्लेखोराने शिद यांच्यावर हल्ला केल्याचा संशय

कासेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पांडुरंग शिद हे आज सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांच्या कासेगाव व वाटेगाव सीमेवर असलेल्या शेतात कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १०, सीएन ६०७०) वरून निघाले होते. वाटतील आबासो जगन्नाथ शिद यांच्या विहिरीजवळ येताच पाळत ठेवून बसलेल्या हल्लेखोराने शिद यांच्यावर हल्ला केल्ला. हल्लेखोराने झाडलेल्या दोन गोळ्या शिद यांच्या उजव्या भुवयीजवळ व उजव्या कानाच्या मागील बाजूस डोक्यात शिरल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर तातडीने तेथून पसार झाले.

हे देखील वाचा: तेजस्विनी पंडित: ‘अहो विक्रमार्का’ मध्ये वीरांगणा भवानीच्या भूमिकेत; चित्रपट 30 ऑगस्टला मराठीसह पाच अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे व त्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पांडुरंग शिद रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. खुनाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही; परंतु पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिद हे खासगी सावकारी करत होते. त्यांच्यावर कासेगाव पोलिसांत सावकारकीचा गुन्हाही दाखल आहे. पोलिस हल्लेखोरांच्या मागावर आहेत. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

हे देखील वाचा: Save the bees: मधमाश्या शेतीच्या उत्पादनक्षमतेसाठी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाच्या; 2024 ची थीम: ‘तरुणांसोबत मधमाशी गुंतलेली’

कासेगाव

चुलत भाऊ शशिकांत महादेव शिद यांनी कासेगाव ठाण्यात दिली फिर्याद

रात्री उशिरापर्यंत  पोलिस ठाण्यात शिद यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे रात्री उशिरापर्यंत  पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. शिद यांचे नातेवाईक व पोलिस यांच्याकडून ते माहिती घेत होते. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी इस्लामपूरचे पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कुरळप ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील,  ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. पांडुरंग शिद यांचा चुलत भाऊ शशिकांत महादेव शिद यांनी  ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे देखील वाचा: Indian Security Forces: भारतीय सुरक्षा दले: लष्कर, नौदल आणि हवाई दल; ही 3 सुरक्षा दले असतात सदैव सज्ज; या तिन्ही सुरक्षा दलाची माहिती जाणून घ्या

दरम्यान, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले कि, आमच्याकडून सर्व शक्यता पडताळून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. लवकरात लवकर हल्लेखोराला शोधून काढू. नातेवाईक व इतर संपर्कातील व्यक्ती यांच्याकडून माहिती घेत आहोत. लवकरच आरोपी सापडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed