शिक्षक

प्रातःस्मरणीय आणि वंदनीय शिक्षक

[ मुद्दे : आवडते शिक्षक कोण ? – सर्व विदयार्थ्याचे आदरणीय स्थान – सर्व विद्यार्थ्यांचे एकमत – व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यासाठी- धडपड – वेशभूषा- सर्व काही ज्ञान देण्याची – विदयार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान धडपड – – गुरुजींचे विषय – उपक्रमशील वृत्ती – आम्ही भाग्यवान विदयार्थी …]

[Issue: Who is the favorite teacher? – Honorable position of all students – Unanimity of all students – Personality for students – Struggle – Dress – Struggle to impart knowledge – – Guruji’s subjects – Enterprising attitude – We are lucky students … ”

शिक्षक

सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर

आवडते शिक्षक (favorite teacher) म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत; तर प्रातःस्मरणीय आणि वंदनीय आहेत. केवळ माझेच नव्हे; तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विद्यार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर ! किंबहुना या शाळेतील विद्यार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटले की, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात.

हे देखील वाचा: श्रावणी उपवास: रताळे, वरी, खजूर : आरोग्यदायी फायदे जाणून घ्या; रताळ्यात असतात 15 प्रकारची पोषकद्रव्ये

सरांच्या स्वच्छ व निर्मळ अंतःकरणाची आणि निष्कलंक चारित्र्याची साक्ष…

जाधव सरांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार (personality is responsible) आहे. उंच शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण आणि प्रसन्न चेहरा (pleasant face). सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ. कधी कधी ते खादीचा लांब सदरा घालतात; तेव्हा तर ते एकदम रुबाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातलेले मला आठवतच नाही. सिनेमातल्या ढंगाचे फॅशनेबल कपडे (Fashionable clothes) त्यांच्या अंगावर कधी दिसले नाहीत. त्यांच्या या स्वच्छ व साध्या पोशाखावरूनही पाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मळ अंतःकरणाची आणि निष्कलंक चारित्र्याची लगेच साक्ष पटावी.

शिक्षक

विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा

जाधव सर आम्हांला विज्ञान (science) व गणित (mathematics) विषय शिकवतात. या विषयांत त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा (difficult and boring) आणि गणित तर भीतिदायक (scary) ! पण जाधव सरांचे कौशल्य असे की, हे विषय आम्हांला कधी कंटाळवाणे वाटले नाहीत वा त्यांची भीतीही वाटली नाही. ते अनेकदा वर्गात लॅपटॉप (laptop) आणतात. त्यातून बरीच नवनवीन माहिती सांगतात. लॅपटॉप व प्रोजेक्टर (projector) यांच्या साहाय्याने अणुमधील इलेक्ट्रॉन्सचे भ्रमण दाखवले होते. सूक्ष्मजीवांची निर्मिती व वाढ कशी होते, हे त्यांनी असेच दाखवले होते. त्यांनी घडवलेल्या सूर्यमालेच्या दर्शनाने तर आम्ही थक्क झालो होतो.

हे देखील वाचा: consistent progress : तुम्हाला सातत्याने प्रगती साधायची असेल तर इतरांमधला चांगुलपणा आणि स्वतःमधली कमतरता शोधा: सातत्यपूर्ण प्रगतीसाठी या 5 टिप्सवर काम करा

घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत

त्यांची शिकवण्याची पद्धतही न्यारी होती. घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते ‘दही लावण्या’चे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलईसारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे ते केव्हा वळले, कळलेच नाही.

शिक्षक

प्रमेये आम्हांला कधी किचकट वाटलीच नाहीत.

एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतार (simple wire) मिळेना, तेव्हा वायरमधील साधी तार लावून वीजप्रवाह कसा सुरू केला, हे त्यांनी आम्हांला वर्गात सांगितले. पण त्यानंतर लागलीच काही क्षणांतच वितळतार (simple wire) आणली आणि साध्या तारेच्या जागी ती बसवली. हे आपण का केले, नाही तर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या.

हे देखील वाचा: Kamya Karthikeyan: एव्हरेस्ट शिखर सर करणारी काम्या कार्तिकेयन ही जगातील सर्वात तरुण भारतीय

अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोगे अनेक सिद्धांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत. जाधव सर गणितातील अनेक प्रमेये शिकवताना गणितज्ञांच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेये आम्हांला कधी किचकट वाटलीच नाहीत.

विज्ञान प्रदर्शन हा तर जाधव सरांचा जिव्हाळ्याचा विषय. आम्हां विदयार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत. आम्हांला ते विषय नेमून देत. आम्हांला विचार करायला लावत; उपक्रम शोधायला लावत. या प्रयत्नांत त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करीत असू.

आता दहावीचे वर्ष संपत आले आहे. माझ्या मनात सारखे येत आहे की, विज्ञान-गणिताची गोडी लावणारे जाधव सरांसारखे शिक्षक यानंतर मला भेटतील का ? … माहीत नाही. मात्र मला मनापासून वाटते की, यापुढे कदाचित असे सर मिळतील, न मिळतील; पण जाधव सर आम्हांला मिळाले, हे आमचे केवढे भाग्य !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *