सेंद्रिय शेती अडचणीत; कारण काय? 

वाढता दुष्काळ, कुपोषण, विविध आजार यामुळे पशुधनाची संख्या घटल्याने शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. मागणी वाढल्याने शेणखताचे भावदेखील वाढले आहेत. 

जमीन सुपीक व्हावी, यासाठी शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. बेसुमार रासायनिक खतांचा वापर केल्याने जमीन नापीक होत चालली आहे. शेतातील पिकांच्या उत्पादनात घट होत चालली आहे.

पूर्वीपासून शेतकरी जमीन सुपीक व्हावी, यासाठी शेणखताचा वापर करतात. अलीकडच्या काळात बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना शेणखत मात्र मिळत नाही. 

पशुधनाची संख्या कमी झाली आहे. यामुळे शेणखताचा तुटवडा एका ट्रॉलीच्या शेणखताचा भाव सहा हजारांपर्यंत गेला आहे. शेतकऱ्यांना हा भाव परवडत नाही. 

ज्यांच्याकडे पशुधन आहे, असे शेतकरी सतत शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आपल्या शेतात वापरतात. सध्या यांत्रिकीकरणामुळे शेतकरी बैलजोडी, म्हैस, गाय, शेळ्या, मेंढ्यांचा सांभाळ करीत नसल्यामुळे शेणखताचा तुटवडा जाणवत आहे.

जमिनीला पुरेशे शेणखत नसल्यामुळे आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत राखणे कठीण झाले आहे. जमिनीला शेणखत मिळत नसल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत चालले आहे.

ताटातील दूधही गायब.... अलीकडच्या काळात शेतकरी यांत्रिकीकरणावर शेती करीत असल्याने पशुधनाची संख्या घटली आहे.  बैलजोडीबरोबर दुधाळ जनावरेदेखील कमी झाली आहेत. 

पूर्वी शेतकरी, शेतमजूर यांच्याकडे दुधाळ जनावरे होती. शेतकऱ्यांसह शेतमजुराचे संध्याकाळचे जेवण दुधाबरोबर होत होते. पशुधनाचा सांभाळ न करण्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या जेवणाच्या ताटातील दूध गायब झाले आहे. 

सध्या ग्रामीण भागात ७० ते ८० लिटर रुपये दुधाचे भाव आहेत. साहजिकच मानवी शरीराला पोषक असलेले दूधदेखील आहारातून कमी झाले आहे.