मेथीदाणे सेवन: आरोग्यासाठी किती फायद्याचे जाणून घ्या
मेथीची भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. बहुमूल्य औषधी गुण आहेत.
मेथीदाणे अँनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणार्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी अमृतासमान आहेत.
एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत.
केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावली जाते. मेथीच्या दाण्याची पेस्ट डोक्याला लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा.
मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.
मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.
मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो.
अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.
उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या. रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चाऊन खाऊन टाका.