खेळाडूंनो, तुम्ही 'पावडर प्रथिनां'चे सेवन करता का, मग इकडे लक्ष द्या 

शरीरसौष्ठव व खेळाडूंना सराव अथवा स्पर्धेमध्ये शरीराची ऊर्जा जास्त खर्च होत असते. ती भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. 

मानवी जीवनात पावडर प्रोटीनचा अतिरेक शरीराला धोकादायक ठरू शकतो. त्या अनुषंगाने आहारातील प्रोटीन महत्त्वाचे व आवश्यक आहे. 

तसेच पावडर प्रोटीन अथवा आहारातील प्रोटीन किती प्रमाणात घ्यावे, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे.

कृत्रिम प्रोटीन सप्लिमेंट्सच्या अतिसेवनामुळे किडनी आणि लिव्हरचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच किडनी निकामी होण्याची शक्यता असते. 

यामुळे नैसर्गिक अन्न सेवन करणे हाच एक उत्तम उपाय असून चिकन, मटण, मासे, अंडी, पनीर, उसळ, कडधान्य, ब्रोकोली, सोयाबीन, भाकरी,ओट्स,  फळे यातून योग्य ती प्रोटीन मिळतात. 

महत्त्वाचे म्हणजे तूप, ऑलिव्ह ऑइल, स्वयंपाकाचे कोकोनट ऑइल, नैसर्गिक चीज, बटर यांचे प्रमाण कमी ठेवा.

 व्यायामाप्रमाणे प्रथिने शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी गरजेचे आहे. प्रथिने स्नायू, त्वचा आणि हार्मोन्सना वाढविण्याचे काम करतात.

शारीरिक आराम, समतोल आहार आणि व्यायाम हे त्रिकुट व्यवस्थित साधणे महत्त्वाचे आहे.

शरीराला १ किलोग्रॅममागे एक ग्रॅम बॉडीवेट इतक्या प्रमाणात प्रथिने लागतात. फॅट्स हे २० टक्क्यांप्रमाणे शरीराला गरजेचे आहेत.