डेंगीपासून बचावासाठी अशाप्रकारे काळजी घ्या 

महाराष्ट्रात डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात  आढळून येत आहेत. काहीजण दगावल्याच्याही बातम्या येत आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. 

डास वाढू नयेत, यासाठी आपल्या घरामध्ये व घरच्या आजुबाजूस सांडपाणी व कचरा साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.

घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर, पिंप, पाण्याच्या टाक्या  नीट झाकून ठेवावेत, आठवड्यातून एक वेळा कोरडी करून स्वच्छ धुवावे. 

डासांपासून संरक्षणासाठी लांब हाताचे व पाय घोळ कपडे वापरावेत. घराच्या परिसरात डास वाढू नयेत याची काळजी घ्यावी. नारळाच्या करवंट्या, टायर, यांची वेळीच विल्हेवाट लावावी. 

घरात फ्रिजच्या मागील बाजूच्या जाळ्या स्वच्छ ठेवाव्यात तसेच झाडांच्या कुंड्यामध्ये पाणी साचू देऊ नये. डासांची पैदास होईल, असे वातावरण नसावे. 

तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी अथवा खाजगी रुग्णालयामध्ये त्वरीत जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार घ्यावा. ताप अंगावर काढू नये. 

तापाच्या रुग्णांची रक्त तपासणी तातडीने सरकारी रुग्णालयात करून घ्यावी. वेळेत योग्य ते उपचार घ्यावेत.